Monday, August 15, 2011

{ Marathi kavita } हल्ली हा असा का वागतो?

 

हल्ली हा असा का वागतो?

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ज्ञ

Friday, August 12, 2011 AT 12:00 AM (IST)

http://www.esakal.com/esakal/20110811/images/5272334645818117480/5077472637166020631_Org.jpgवय सात ते चौदा. म्हटलं तर काहीच न कळण्याचं; म्हटलं तर वेगवेगळे अर्थ लावण्याचं. या वयात शाळेतले ताणतणाव, गृहपाठ, परीक्षेचं दडपण, सहाध्यायी मित्रांचा ताण, घरगुती समस्या इत्यादी अनेक बाबतींत मुलांना मदतीची गरज असते. काही दिवस मुलं रडवेली, तणावपूर्ण, अस्वस्थ झाली आहेत आणि आपल्या समजावण्यानं परिस्थिती बदलत नाही, असं जाणवल्यास तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

गौतम, वय वर्षं आठ. सध्या आईबरोबर राहतो. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर विलक्षण अबोल झालाय. एकटा एकटा राहतो, अभ्यासातही मागे पडत चाललाय. श्रीधन, वय वर्षं सात. टीव्हीवरील बॉंबस्फोटाच्या बातम्या, दृश्‍यं पाहिल्यापासून सतत भीतीच्या दडपणाखाली असल्यासारखा जाणवतो. त्याला कसं समजवायचं कळत नाही. भोवतालचं सगळंच जग वाईट आहे, असं त्याला वाटतंय. खूप असुरक्षित वाटतंय. सारिका, वय वर्षं अकरा. समजूतदार मुलगी; पण एकाएकी आक्रस्ताळेपणा करायला लागलीय. उलटून बोलायला लागलीय. मोबाईल फोनच्या अक्षरशः अधीन झालीय.... ही आणि अशी अनेक उदाहरणं आसपास दिसू लागलीयत. मानसोपचार तज्ज्ञ या आणि अशा अनेक समस्यांमध्ये मदत करू शकतात.

लहानपण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यात मुलांचा व्यवस्थित, बौद्धिक, मानसिक, भावनिक व शारीरिक विकास व्हायला हवा; म्हणजे पौगंड, तारुण्य व प्रौढावस्थेतील अनेक समस्या आपण टाळू शकतो.मानसोपचारतज्ज्ञ मुलांना व पालकांना ताणतणाव, तसेच वेगवेगळ्या भावनिक व वागणुकीच्या समस्यांना योग्य रीतीनं सामोरं जायला शिकवतात. शाळेतले ताणतणाव, गृहपाठ, परीक्षेचं दडपण, सहाध्यायी मित्रांचा ताण इत्यादी अनेक बाबतींत मुलांना मदतीची गरज असते. काही मुलांना, पालकांविषयी, तसंच घरगुती समस्यांविषयी बोलून मोकळं व्हायचं असतं. त्यातल्या काही समस्या गंभीर असतात, उदा. घटस्फोट, घरातलं आजारपण.. या सगळ्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांची वागणूक, मूड, झोप, भूक, शैक्षणिक प्रगती तसंच समाजात, नातेवाइकांत मिसळणं इत्यादींवर परिणाम दिसू लागतो. गेले काही दिवस मुलं रडवेली, तणावपूर्ण, अस्वस्थ झाली आहेत आणि आपल्या समजावण्यानं परिस्थिती बदलत नाही, असं जाणवल्यास तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

मानसोपचार तज्ज्ञाकडे मुलांना कधी न्यावं?

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.