Monday, August 15, 2011

{ Marathi kavita } ‘संस्कृत’चे माहात्म्य ओळखा !

 

'संस्कृत'चे माहात्म्य ओळखा !

    कालीदास, भवभूती आदी महाकवींची प्रतिभा संस्कृतमध्ये फुलली. संस्कृतमध्ये चैतन्य आहे. संस्कृतमधील लिखाणाचा अर्थ कळला नाही, तरी तिच्यातील चैतन्य व सात्त्विकता यांचा फायदा होतो. संस्कृतमध्ये चैतन्य असल्यामुळेच संस्कृत मंत्र उच्चारल्यावर वाईट शक्तींना त्रास होतो. संस्कृत ही वाणी, मन व बुद्धी यांची शुद्धी करणारी भाषा आहे. आपल्या प्राचीन संस्कृत भाषेचे महत्त्व ओळखा !  विद्याथ्र्यांनो, हिंदु संस्कृतीचा 'संस्कृत भाषा'रूपी चैतन्यमय वारसा टिकवण्यासाठी संस्कृत शिका, तसेच शाळेमध्येही 'संस्कृत' विषय शिकवण्यासाठी आग्रह धरा !' 

१. संस्कृत ही ईश्वरनिर्मित भाषा !

               आपल्या वैदिक परंपरेने विश्वनिर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास जतन करून ठेवला आहे. प्रथम सर्वत्र शून्य होते. मग '' असा ध्वनी अवकाशात निनादला. शेषषायी श्रीविष्णु प्रगट झाला. त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटला. त्यानंतर प्रजापति, मातृका, धन्वंतरी, गंधर्व, विश्वकर्मा आदी निर्माण झाले. त्याच वेळी विश्वाचे ज्ञानभांडार ज्यात सामावले आहे, असे वेद ईश्वराने उपलब्ध करून दिले. वेद संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत ही 'देववाणी' आहे. वेद जसे अपौरुषेय म्हणजे ईश्वरप्रणीत आहेत, तशीच संस्कृत भाषाही ईश्वरनिर्मित आहे. तिची रचना आणि लिपी ईश्वराने निर्माण केली आहे; म्हणून त्या लिपिलाही 'देवनागरी' म्हणतात. संस्कृत भाषेची सर्व नावेही ती देवभाषा असल्याचे स्पष्ट करतात, उदा. 'गीर्वाणभारती' हे नाव पहा. त्यातील 'गीर्वाण' या शब्दाचा अर्थ 'देव' असा आहे. 

          ईश्वराच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मानवाच्या निर्मितीनंतर मानवाला आवश्यक ते सर्वकाही त्या ईश्वरानेच दिले. एवढेच नव्हे, तर मानवाला काळाप्रमाणे पुढे ज्याची आवश्यकता भासेल, तेही द्यायची त्याने व्यवस्था केली आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ईश्वराने मनुष्यप्राण्याला मोक्षप्राप्तीसाठी उपयोगी पडणारी आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेली अशी एक भाषा तयार केली. तिचे नाव 'संस्कृत' !

          आद्यमानव मनु आणि शतरूपा यांंना ब्रह्मदेवाने संस्कृत शिकवले. ब्रह्मदेवाने आपल्या अत्री, वसिष्ठ, गौतमादी मानसपुत्र ऋषींना वेद शिकविले, संस्कृत शिकविले.

 २. दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली.

            त्रेतायुगामध्ये जिवाची शब्दातीत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून जिवाला ज्ञान प्राप्त होऊन मोक्षप्राप्ती सुलभतेने व्हावी, यासाठी दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली.

३. द्वापारयुगापर्यंत संस्कृत हीच विश्वभाषा !

 

             सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग या तीन युगांमध्ये संस्कृत हीच विश्वाची भाषा होती. त्यामुळे तिला 'विश्ववाणी'ही म्हणतात. अगदी कौरव-पांडवांच्या काळापर्यंत संस्कृत हीच विश्वातील एकमेव भाषा होती !


अ. २६.४.२००७ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे ग्रीस या देशी गेले होते. तेथील एका स्वागत-समारंभात ग्रीसचे राष्ट्रपती कार्लोस पाम्पाडलीस यांनी 'राष्ट्रपतिमहाभाग ! सुस्वागतं यवनदेशे !', या संस्कृत वाक्याने आपल्या भाषणाचा प्रारंभ केला. आपल्या भाषणात त्यांनी संस्कृत ही प्राचीन भारताची भाषा असून या भाषेचा संबंध ग्रीक भाषेशीही असल्याचे सांगितले.

आ.   जुलै २००७ मध्ये 'अमेरिकी सिनेट'चा प्रारंभ वैदिक प्रार्थनेने झाला. गेल्या २१८ वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच ही गोष्ट  घडली. 'ॐ शांतिः शांतिः शांतिः ।' अशी संस्कृतमधील प्रार्थना म्हणून संस्कृतला 'मृतभाषा' म्हणणार्‍या नेहरू-गांधी कुटुंबाला अमेरिकी सिनेटने चपराकच लगावली आहे.

इ. अमेरिकन विद्यापिठांतही संस्कृतचे अध्ययन आणि अध्यापन गेली अनेक वर्षे चालू आहे. तेथील वॅâलीफोर्निया विद्यापिठात १८९७ सालापासूनच संस्कृत शिकवले जात आहे.

ई. २७ ऑगस्ट २००७ पासून चालू होणार्‍या वॅâलीफोर्निया सिनेटचा प्रारंभ संस्कृत मंत्रोच्चाराने झाला. नंतर न्यू जर्सी सिनेटचाही प्रारंभ संस्कृत मंत्रोच्चाराने झाला.

उ.  मेरिलँड (अमेरिका) विद्यापिठातील विद्याथ्र्यांनी 'संस्कृतभारती' या नावाचा एक गट तयार केला असून त्यांनी एक संकेतस्थळही (www.speaksanskrit.org) चालू केले आहे.

ऊ. ११ एपिल २०१० या दिवशी अमेरिकेतील सेनेटचा प्रारंभ संस्कृत श्लोकपठणाने झाला.

 

            जगातील सर्व उदात्त विचारांचा उगम संस्कृत भाषेत असून, संस्कृत ही अत्यंत परिपूर्ण, शास्त्रशुद्ध आणि हजारो वर्षे उलटली, तरी तशीच्या तशी जिवंत राहिलेली एकमेव भाषा ! पाश्चात्त्य विद्वान आणि विद्यापिठांचे अभ्यासक

१. ॐकार:

१. `श्रीमद्‌भागवत सांगते, "समाहित ब्रह्माच्या हृदयकोशापासून नाद (अव्यक्‍त शब्द) प्रकटतो. दोन्ही कान बंद करून आत तो ध्वनी ऐकायला येतो. त्या अनाहत नादाची उपासना करून योगी मोक्षाचे अधिकारी होतात.

२. ॐकार त्याच परमात्म्याचा वाचक आहे.

३. त्या ॐ कारापासून सर्व वाक्प्रपंच आविर्भूत झाला. तो ॐ कारच सर्व मंत्राचे तसेच सर्व वेदांचे बीज आहे. त्या ॐ काराच्या `, , ' वर्णापासून सत्त्व, रज, तम; ऋक्, यजु, साम; भू:, भूव:, स्वर्लोक; स्वप्न, जागृत आणि सुषुप्‍ती अशा अवस्था निर्माण होतात. ब्रह्मदेवाने या `' बिजापासून वर्णमाला उत्पन्न केली. त्याने या अक्षरापासूनच यज्ञाकरता भू:, भुव:, स्व:, महा:, जन, तप, सत्यम, अशा सात व्याह्रती आणि प्रणव यांसह वेद प्रकाशित केले.' – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)

वेदधर्माचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक :

      वेद म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञानाचा पाया. एकूण चार वेद आहेत आणि ते म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या वेदांमध्ये नेमकं काय लिहिलंय, हे किती जणांना ठाऊक आहे? वेदांचं योग्य उच्चारण अनेक जण करीत असतील, पण त्यातील ज्ञानसंपदेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न कितीजण करतात? वाचकांची जिज्ञासा चाळवली जावी, म्हणून वेदांमध्ये नेमकं काय आहे? याची चुणूक दाखवायचा प्रयत्न केला आहे.

      `सनातन हिंदु धर्माचा मुख्य ग्रंथ वेद. अपौरुषेय, अनादी, अनंत वेदांतून हिंदु धर्म निर्माण झाला. हिंदु धर्माची पुन्हा सुव्यवस्थित, सुरक्षित घडी बसवायची असेल, तर हिंदु समाजाचे वेदांकडे लक्ष वेधून घ्यायला हवे. वेदरक्षणाकरताच भगवंताचे वराह, राम, कृष्णादी अवतार झाले. त्या वेदांचे रक्षण व्हायला हवे. वेदज्ञान, वेदांचे अध्ययन, वेदांची महती, वेदांची कीर्ती, वेदज्ञान काश्मीरपासून कोचीनपर्यंत आणि बाणकोटापासून जगन्नाथपुरीपर्यंत सर्व आबालवृद्धांना झाले पाहिजे. वेदमंदिरात प्रवेश करा. तुम्हाला सनातन धर्म मिळेल. त्यातील एकेक दालन, त्यातील एकेक चौक, त्यातील एकेक सभामंडप इतका विलोभनीय, इतका शृंगारलेला, इतका विशाल आहे की, आम्हा हिंदूंच्या शेकडो पिढ्या आनंदाने आयुष्य काढतील. या वेदप्रसादाने सृष्टीनिर्मितीपासून ते या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे संरक्षण केले आहे. वेदांच्या या दुर्भेद्य गडाला भगदाडे पाडण्याचा प्राचीन काळी काय थोडा प्रयत्‍न झाला ? (संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)

      संपूर्ण वेदवाङ्मय धर्माचा मूलस्त्रोत आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय धर्म आहे. वेदविहित पवित्र कर्तव्य कर्म हे धर्माचे स्वरूप आहे, जे कालाधीन आहे. 'काल' सूर्याधीन आहे. सूर्यामुळे दिवस व रात्र हा कालविभाग होतो. सूर्यच सृष्टी, स्थिती, संहाराचे मूळ कारण आहे. सूर्यामुळेच सृष्टी, स्थिती व संहार होतात. म्हणून सूर्यदेव ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूप आहेत.

ऋग्वेद सांगतो, "सूर्यदेव आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करतात." 
यजुर्वेद सांगतो, "सूर्य देव समस्त भुवनांना उज्जीवीत करतात." 
अथर्ववेद सांगतो, " हृद्रोग व श्वास रोग यांचा उपशम करतात."

      वेदांवर भाष्य करणारे 'सायणाचार्य' यांच्या समालोचनावरून वेदांचा अर्थ लावता येतो. वेद जाणून घेता येतात. अधिक माहितीसाठी ६ वेदांगे आणि ४ उपांगे आहेत ज्यामुळे वेद नीट समजून घेण्यास मदत होते. शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ यांच्या शास्त्राशी संबंधीत वेदांग म्हणजे निरूक्त! ऋग्वेदातील ऋग् समजून घेण्यासाठी निरूक्त पहाणे आवश्यक आहे.

वेदांमध्ये मिळालेल्या या काही गोष्टी,

१) प्रकाशाचा वेग- ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ५०, ऋचा ४.
२) विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य ही संकल्पना- यजुर्वेद (तैत्तिरीय संहिता), स्कंध ३, प्रपाठक ४, अनुवाक् १०, मंत्र ३.
३) पृथ्वीचा उपग्रह चंद्र ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १८९, ऋचा ८.
४) जन्मवेळी काढलेली बाळाची नाळ- अथर्ववेद, काण्ड १,सूक्त ११.

वेदांनी आमची संस्कृती घडविली, रक्षिली, चिरंतन केली. (संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)

केंब्रीज विद्यापीठात आपल्या शांत खोलीत बसून प्राध्यापक अभ्यासात गढून गेलेले आहेत. अचानक एक त्रस्त आणि प्रक्षुब्ध सैनिक येतो आणि सरळ सरळ त्यांच्यावर आरोप करतो की जर्मनीविरुध्द लढणारे त्याच्यासारखेच अनेक सैनिक युध्दामुळे निर्माण झालेल्या नैराश्यामुळे दुःखी आहेत आणि तुम्हाला त्याचं काहीच कसं सोयरसुतक नाही?

प्राध्यापक त्या तरुण सैनिकाला शांतपणे विचारतात," कशासाठी लढतो आहेस तू? "

झट्कन उत्तर मिळतं, "अर्थात देशाच्या संरक्षणासाठी! "

सुज्ञ प्राध्यापक पुढे विचारतात, " स्वतःचं रक्त सांडण्याइतकं महत्वाचं असं काय आहे त्यात? "

" देशाची भूमी आणि त्यातील नागरिक."

प्राध्यापक अजुन खोदून-खोदून विचारतात तेव्हा उत्तर मिळतं,

" हे नाही. मी माझ्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी लढतो "

प्राध्यापक पूर्वीच्याच शांतपणाने सांगतात,

" याच संस्कृतीत माझंही योगदान आहेच! "

 

सैनिक थंडावतो. प्राध्यापकापूढे आदराने नतमस्तक होतो आणि देशाच्या सांस्कृतिक ठेवीसाठी अधिक प्राणपणाने लढण्याची शपथ घेतो.


      दूसरे महायुद्ध शेवटच्या टप्प्यावर आलेले असतांना इंग्रज सैनिक अंतिम यशासाठी आपले योगदान देत होते तेव्हाचा प्रसंग आहे हा! यावरून पाश्चात्यांनाही आपल्या स्वतःच्या संस्कृतीची किती चाड आहे हे कळते. आपल्या म्हणजे भारतीयांच्या मनीही अतिप्राचीन अशा या भारत देशाच्या सांस्कृतिक परंपरेबद्दल नितांत आदर आहे. आधीच सांगायचं तर आपल्या या सांस्कृतिक ठेवीचं जतन करण्यासाठी संस्कृत शिकणं निकडीचं आहे.


      सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं की संस्कृतीजतन करण्यासाठी संस्कृत शिकणं निश्चितच आवश्यक आहे. आपली संस्कृती ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे, ते समजण्यासाठी, उमजण्यासाठी संस्कृत शिक्षणाशिवाय  दुसरा पर्याय नाही. संस्कृत कमीशन रिपोर्टचा दाखला देऊन कोर्टाने उर्द्धृत केले की या देशातील नागरिकांमध्ये कितीही भिन्नता असली तरी एका बाबतीत मात्र कमालीचं साधर्म्य आहे. ते म्हणजे आपल्या सांस्कृतिक परंपरेबद्दल वाटणारा अभिमान आणि हीच तर संस्कृतची परंपरा आहे!

श्लोक अर्थासहित

१. नमस्ते शारदे देवि वीणापुस्तकधारिणि ।

    विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ॥


अर्थ : 
हाती वीणा आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वती देवी तुला वंदन करून मी अभ्यासाला प्रारंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.

२. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।

     निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

अर्थ :

 

वाईट मार्गाने आचरण करणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्यांची प्रभा लाभलेल्या हे देवा श्रीगणेशा माझी सर्व कार्ये नेहमी निर्विघ्नपणे पार पडू देत.

३. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।

     रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥

अर्थ :

 

भूतलावर अवतरित होऊन भक्तजनांचे मनोरथ पूर्ण करणार्‍या, रामचंद्र, प्रजापती, रघुनाथ, नाथ, सीतापती रामश्रेष्ठाला मी वंदन करतो.

४. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

     वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥

अर्थ :

 

मनाप्रमाणे वेगाने धावणार्‍या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियांचे दमन केलेल्या, बुद्धिमंतांमध्ये सर्वांत श्रेष्ठ असलेल्या, वानरसेनेतील मुख्य, वायुपुत्र, श्रीरामदूत मारुतीला मी शरण आलो आहे.

५. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।

      प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम: ॥

अर्थ :

 

वसुदेवपुत्र कृष्णाला , सर्व दु:ख हरण करणार्‍या परमात्म्याला , शरणागतांचे क्लेश दूर करणार्‍या गोविंदाला नमस्कार असो.

६. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

     गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

अर्थ :

 

गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमन करतो.

७. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

     शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

अर्थ :

 

सर्व मंगलमय गोष्टींतील मांगल्यरूप, कल्याणदायिनी, सर्व इष्ट फळ देणार्‍या, शरणागतांस आश्रय देणार्‍या, त्रिनयने, गौरी, नारायणी तुला नमस्कार असो.

८. शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।

     सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥

अर्थ :

 

शरण आलेल्या दीन दुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या, सकल विश्वाचा ताप दूर करणार्‍या हे देवी नारायणी (दुर्गे) तुला माझा नमस्कार असो.

९. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।

     तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।

अर्थ :

 

अखंडमंडलाकार सृष्टीला व्यापून ज्यांनी (आम्हाला) त्यांच्या चरणांशी घेतले त्या श्रीगुरूंना आमचा नमस्कार असो.

१०. नमः सर्वविदे तस्मै व्यासाय कविवेधसे ।

      चक्रे पुण्यं सरस्वत्या यो वर्षमिव भारतम् ॥

अर्थ :

 

सर्वज्ञ, कवींमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या, आपल्या प्रतिभेने मेघवृष्टीसमान महाभारत नावाचे पुण्यदायी काव्य करणार्‍या भगवान श्रीवेदव्यासांना नमस्कार असो.

सुभाषिते अर्थासहित


१.  विद्यारत्नं महद्धनम् ।
    अर्थ : विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे.

२. सा विद्या या विमुक्तये ।
    
अर्थ : मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय.

३. सत्यं कण्ठस्य भूषणम् ।
    
अर्थ : सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.

४. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । 
    
अर्थ : शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.

५. संघे शक्तिः कलौ युगे ।
    
अर्थ : कलियुगामध्ये एकजुटीत शक्ती आहे.

६. आचार्यदेवो भव ।
    
अर्थ : आचार्यांमध्ये देव पहा.

७. मातृदेवो भव ।
    
अर्थ : मातेला देवाप्रमाणे पहा.

८. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।
    
अर्थ : आई आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.

९. गुरुशुश्रूषया विद्या ।
    
अर्थ : विद्या ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.

 

१०. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् |
     अर्थ :

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.