दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! जुळलेले नाते अतुट घडे जन्मजन्मांची भेट घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! | ||||||||||||||
| ||||||||||||||
| ||||||||||||||
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.