माझी होशील का ?....
--


सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार

एकांत एकांत आशा निराशा
वाट पाहीली अन नको नको ती कालचक्र पाहीली
आता मला तिला पाहायचे आहे
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?......
सतत मी तिचा विचार करत असतो
क्षणाक्षणाला मी तिच्या प्रेमात पडत असतो
तिच्याशी बोलायला जावे तर ती हसत विषय बद्लत असते
माझ्या काळजाचे ठोके वाढतच असतात म्हणूनच मला तिला विचारायचय
तू माझी होशील का ?.....
प्रेम करणे कधी वेडेपण असते
प्रेमात पडणारे सुद्धा वेडेच असतात का ?
मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे
ती सुद्धा माझ्या प्रेमात पडेल का ?... म्हणूनच मला तिला विचारायचे आहे ....
तू माझी होशील का ?.....
--
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.