Thursday, December 30, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} मृगजळांच्या पुरात


मृगजळांच्या पुरात , जग वाहते आहे
वास्तवास सोडून, स्वप्नात राहते आहे

लोभस आकर्षणांची, गर्दी अफाट मोठी
सुंदर आवरणात, आत भरलेली खोटी

आनंदाचा नाटकी , वर चढवीला मुलामा
राबतोस त्यासाठी, कुठवरी तू गुलामा

पळतात वाट सारे, थांबनार ना कोणी
पाठीवर कर्जाच्या, घेती अजुन गोणी

वाल्मिक कधीच गेला, सगळेच झाले वाली
पापाचे रांजण भरले, पुण्याचे भांडे खाली

जगण्यास वेळ कोठे, चिंता घोर आहे
लालसेत बुडालेला, लहान थोर आहे

मृगजळांचा हा पूर, कधी तरी ओसरेल
वाईट हेच आहे , त्या आधी जन्म सरेल
-हरीश दांगट

--
Animated-Walking-Monkey-Happy-New-Year-2011-Champagne-Bottle-01.gif
newyearglitter21.gif
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.