बाबा तू गेलास आणि मी गळून पडले
सारे अश्रूच संपून गेले, इतकी रडले...
रंग भरले होतेस आमच्या जीवनी, पण
काळाने सर्व बेरंग करुन सोडले...
"बाबा" हेच शब्द उच्चारले पहिल्यांदा
कधी तुझ्या अंगाईने होते निजले...
तुझ्या प्रेमाचा वर्षाव सुखद होता
गेलास तू ,मी दु:खाच्या पावसात भिजले...
कधी भरवलास घास चिऊ, काऊचा
तुझ्या बोटाला धरुन चालयला शिकले...
माया इतकी केलीस माझ्यावर की
आता त्या प्रेमाला कायमची मुकले...
तुझी खुप आठवण येते रे "बाबा"
तू ईथेच असल्याचे भास होतात
स्वप्नांत येतोस तू नेहमीच
तुझ्या मायेचे हात डोक्यावर फ़िरतात...
--
सारे अश्रूच संपून गेले, इतकी रडले...
रंग भरले होतेस आमच्या जीवनी, पण
काळाने सर्व बेरंग करुन सोडले...
"बाबा" हेच शब्द उच्चारले पहिल्यांदा
कधी तुझ्या अंगाईने होते निजले...
तुझ्या प्रेमाचा वर्षाव सुखद होता
गेलास तू ,मी दु:खाच्या पावसात भिजले...
कधी भरवलास घास चिऊ, काऊचा
तुझ्या बोटाला धरुन चालयला शिकले...
माया इतकी केलीस माझ्यावर की
आता त्या प्रेमाला कायमची मुकले...
तुझी खुप आठवण येते रे "बाबा"
तू ईथेच असल्याचे भास होतात
स्वप्नांत येतोस तू नेहमीच
तुझ्या मायेचे हात डोक्यावर फ़िरतात...
--
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.