Monday, August 15, 2011

{ Marathi kavita } लोकशाहीचे चौसष्टावे घर : माय इंडिया - माझा भारत

 


भारतीय लोकशाहीच्या वाटचालीला जशी यशाची लखलखती किनार आहे, तसेच काळोखाचे अस्तरही आहे. ते दूर करण्यासाठी गरज आहे ती मने बदलण्याची; त्याचप्रमाणे 'भारत' 'इंडिया'तील दरी बुजविण्याची. 
----------
भारताच्या स्वातंत्र्याचं आणखी एक पान आज सुरू होत आहे. आतापर्यंत लिहिलेल्या चौसष्ट पानांवर नजर टाकली की अनेक कटू-गोड आठवणी पाहायला मिळतात. विविधतेने नटलेल्या आणि विविधतेत विभागल्या गेलेल्या देशाने अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीत आपले स्वातंत्र्य, आपले सार्वभौमत्व टिकवून ठेवले, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. कशी का असेना, लोकशाही राबवली आणि दुसरी आणीबाणी येऊ दिली नाही, हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या बरोबरीने आणि आपल्यानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक शेजारी राष्ट्रांतील लोकशाहीच्या गळ्यावर कधी हुकूमशाहीने, तर कधी लोकशाहीचा बुरखा पांघरलेल्या एकाधिकारशाहीने नखे ओढली; लोकशाहीला सातत्याने तलवारीच्या पात्यावर नाचविले. आपल्याकडे तसे झाले नाही. अनेक गोष्टींत आपण स्वावलंबी झालोत. कुणाच्याही मदतीशिवाय महासंगणक बनवू शकलो आणि कारगिलवर शत्रूला धूळही चारू शकलो. महासत्ता होण्याचं स्वप्नही बाळगू शकलो. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात चकाकणाऱ्या या जशा गोष्टी आहेत, तशा अनेक पानांवर काळोखाचे ठिपकेही जमा झाल्याचे दिसते. "इंडिया' आणि "भारत' यातील अंतर वाढत चालले आहे. विकासाच्या दहा-बारा "इंडिया' आहेत आणि भारत काळोख चुकविण्यासाठी "इंडिया'च्या दिशेने धावतो आहे. विस्थापित होतो आहे. 
"
इंडिया'त बर्गर खाऊन ओव्हरवेट झालेली बाळे आहेत; तर भारतात कुपोषणामुळे कुणा अभागी मातेच्या गर्भाशयातच मरणारी बाळे आहेत. "इंडिया'त मॉल आहेत, तर भारतात कोणत्या तरी कार्डावर सडलेला तांदूळ आहे. "इंडिया'त प्लास्टिक करन्सी आहे, तर भारतात रोजगार हमीवरील मजूर आहेत. "इंडिया'त "आयआयटी' आहेत, तर भारतात शेवटच्या आचकाउचका देणाऱ्या "आयटीआय' आहेत. "इंडिया'त कंपनी फार्मिंग सुरू आहे; तर भारतात फार्मिंग परवडत नाहीत म्हणून आत्महत्या घडत आहेत. "इंडिया'त ओठ रंगवून फिरणारं प्रायव्हेटायजेशन आहे, तर भारतात सहकार क्षेत्र सलाईनवर आयसीयूमध्ये आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत असा एकसंध होण्याऐवजी दुभंगतो आहे. उद्या "इंडिया' महासत्ता होणार की "भारत', हाही महत्त्वाचा प्रश्‍न आहे. त्याचा विचार लाल किल्ल्याने आणि मोबाईलच्या स्क्रीनवरून आंदोलन चालविणाऱ्यांनीही केला आहे. 

गेले वर्ष भारताच्या बदनामीचे वर्ष होते, असे म्हणावे लागेल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराची रोज नवनवीन प्रकरणे बाहेर पडत आहेत आणि सरकारसह लोकशाहीचा चेहराही काळवंडतो आहे. दुसरं स्वातंत्र्य, दुसरा गांधी यासारखी भाषा सुरू झाली. आंदोलने सुरू झाली आहेत. खेळात भ्रष्टाचार, फोनमध्ये भ्रष्टाचार, खिचडीत भ्रष्टाचार, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार; मंत्री, न्यायाधीश आणि दक्षता आयोगाकडूनही भ्रष्टाचार घडला. उघडकीस आला. भ्रष्टाचाराचे मजले "आदर्श'च्या इमारतीला लाजवतील असे आहेत. आता आपल्याला हवा आहे पारदर्शी कारभार करणारा देश. लोकशाहीला लोकांपर्यंत पसरविणारा देश. लोकशाही चौसष्ट घरे चालली हे जरी खरे असले तरी ती कशी चालली, हेही महत्त्वाचे आहे. नुसत्याच चालण्याला अर्थ राहत नाही, तर तिने कोणत्या आणि कशा पाऊलमुद्रा सोडल्या, हेही महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारविरोधातील वाढती आंदोलने हे कोणत्या "इंडिया'चे लक्षण आहे? कुणामुळे हे असे झाले, याचा विचार आपण करणार की नाही? अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रचंड पाठिंबा हे कशाचे लक्षण आहे, याचा विचार करणार की नाही? अण्णांनी लोकांच्या ओठावर आणि आयुष्यात सळसळणाऱ्या एका गंभीर विषयाला हात घातला म्हणून त्याना पाठिंबा मिळाला, हे एक सत्य आहे. राजकारणी अशी आंदोलने चालवू शकत नाहीत. कारण त्यांची विश्‍वासार्हता राहिलेली नाही. लोकपाल विधेयकासाठी खालपासून वरपर्यंत पाठिंबा मिळतोय याचा अर्थच व्यवस्था कुजत आहे आणि त्याची दुर्गंधी सुटलेली आहे. पण एखादा कायदाच सारे काही करू शकत नाही. 

त्याची भूमिका पूरक असते. क्रांती लोकांच्या मनात असते आणि कायदा तिच्या मार्गात हिरवा झेंडा घेऊन उभा असतो. तो क्रांती करत नाही; पण झालेल्या क्रांतीला कवचकुंडल देऊ शकतो. प्रश्‍न मने बदलण्याचा आहे आणि त्यासाठीचा कार्यक्रम कुणाकडेही नाही. आपण कल्पना करूया की अण्णांना दहा-वीस कोटी लोकांचा पाठिंबा आहे. हे खरे मानून अशीही कल्पना करूया, की या सर्व लोकांनीच लाल किल्ल्यावर किंवा आंदोलनस्थळी स्वतः कधीही भ्रष्टाचार न करण्याची प्रतिज्ञा केली तर काय होईल? कदाचित कायद्याची गरज भासणार नाही. शिकलेसवरलेले लोक मतदानासाठी का जात नाहीत? का होते मतांची आणि लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री? सर्व प्रकारच्या आंदोलनांचे आणि पंतप्रधानांनाही खडसावणाऱ्या स्वातंत्र्याचे अभय देणारी संसदीय लोकशाही आपल्याला नकोच आहे का? लोकशाहीने चौसष्टाव्या घरात प्रवेश केल्यानंतर तरी या प्रश्‍नांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. तो तसा झाला तर दुसरं स्वातंत्र्य, दुसरा गांधी, लोकपाल या साऱ्या गोष्टी पुढे येत आहेत, हे कळायला लागेल. आम्हाला वाटतं या साऱ्या गोष्टींसाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य सर्वांत सुंदर आहे.

संबंधित बातम्या

·         तमाशा झाला अनाथ (अग्रलेख)

·         मुंबईकरांनो, आता तुम्हीच करा तुमचे संरक्षण!

·         घरभेद्यांचे घातक उद्योग

·         वित्तीय स्थैर्याला आधार महानियंत्रकाचा

·         वाढत्या गृहकर्जांबाबत हवी सावधानता!

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
MARKETPLACE
A bad score is 598. A bad idea is not checking yours, at freecreditscore.com.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment