Thursday, August 18, 2011

{ Marathi kavita } राहुल गांधी हरवलेत होsss!

 

मटा ऑनलाइन वृत्त मुंबई

http://maharashtratimes.indiatimes.com/thumb.cms?msid=9600190&width=230&resizemode=4

http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=3000949



'
आपण यांना पाहिलंत का ?' मध्ये हरवलेल्या व्यक्तीचं वर्णन ज्या स्टाइलमध्ये केलं जातं, त्याच स्टाइलमध्ये ' सामना ' नं आज काँग्रेसचे ' युवराज ' राहुल गांधी यांची माहिती प्रसिद्ध करून ते हरवल्याची जाहिरात दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभागी झालेले राहुल गांधी पवना गोळीबार प्रकरणी चकार काढायला तयार नसल्यानं शिवसेनेनं आपल्या ' स्टाइल ' मध्ये त्यांचा समाचार घेतलाय.

रंगः गोरा
वयः ४१ वर्षे, तरीही अविवाहित
धंदाः काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार
अंगात पांढरे कपडे, मध्येच बाह्या वर करतात...
काश्मिरी सफरचंदासारख्या गालावर देवदासासारखी कायम वाढलेली दाढी...
कायम असंबद्ध बोलून वाद ओढवून घेण्याची खोड...
अधूनमधून शेतकरी किंवा दलितांच्या झोपडीत राहायला जाण्याचे झटकेही येतात...

अशा ' मार्मिक ' शब्दांत राहुल गांधी यांचं वर्णन, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर आहे. ' हरवले आहेत, गुमशुदा की तलाश ' या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध झालेय. वरील वर्णनाच्या व्यक्तीचा महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी जिवाच्या आकांतानं शोध घेत असल्याचं त्यात म्हटलंय.

या जाहिरातीतला प्रत्येक शब्द राहुल गांधींवर वार करणारा आहे. मायावती सरकारविरुद्ध शेतक-यांच्या महापंचायती भरवण्याच्या ' पंचायती ' करणारा काँग्रेसचा हा कनवाळू गांधी जैतापूरमध्ये शेतक-यांवर गोळीबार झाल्यानंतर महाराष्ट्रात आला नाही, अशी टिप्पणी त्यात करण्यात आलेय. पवना जलवाहिनी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणा-या शेतक-यांना काँग्रेस सरकारने गोळ्या घातल्या, त्यात चार आंदोलक मरण पावल्यानंतरही शेतक-यांचा हा ' मसीहा ' इथे अवतरला नसल्याचंही त्यात नमूद केलंय. या व्यक्तीचा अता-पत्ता लागल्यास जरूर कळवावे, माहिती देणा-यास यथोचित इनाम दिले जाईल, असंही त्यात जाहीर करण्यात आलंय.

राहुलजी, तुम्ही हरवल्यापासून महाराष्ट्रातील शेतक-यांना अन्नपाणी गोड लागेनासे झाले आहे. त्यामुळे असाल तिथून, असाल तसे निघून या, तुम्हाला कोणी रागावणार नाही, अशी एक टिपही या जाहिरातीत टाकण्यात आलेय. राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यावरून बरीच चर्चा सुरू आहे.

पवना गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील काँग्रेसचा एकही नेता त्या ठिकाणी गेलेला नाही. अगदी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मावळ तालुक्यात पाय ठेवलेला नाही. त्यामुळे भडकलेल्या विरोधकांनी थेट राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. त्यामुळे आता काँग्रेसची नेतेमंडळी काय हालचाल करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

दरम्यान, काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरू असल्यानं राहुल गांधी त्यांच्यासोबत असल्याचं समजतं. तिथून परतल्यानंतर ते संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेतील, असं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं.

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
MARKETPLACE
A better credit score can save you thousands. See yours at freecreditscore.com.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.