Friday, August 19, 2011

{ Marathi kavita } Baayako बायको

 

Baayako बायको
बायको 'बायको' या शब्दाशी ओळख पहिल्यांदाच झाली, ती परीकथांमधून. राजाची 'बायको' म्हणजे राणी; वाघीण किंवा सिंहीण ही सुद्धा अनुक्रमे वाघाची नि सिंहाची 'बायको'च असायची. अगदी रामायण-महाभारतापासून ते...बायको
'बायको' या शब्दाशी ओळख पहिल्यांदाच झाली, ती परीकथांमधून. राजाची 'बायको' म्हणजे राणी;
वाघीण किंवा सिंहीण ही सुद्धा अनुक्रमे वाघाची नि सिंहाची 'बायको' असायची.

अगदी
रामायण-महाभारतापासून ते अलीकडच्या परीकथांपर्यंत सगळीकडे राक्षससुद्धा कोणाला पळवायचे असले, की नेमका 'बायको'लाच पळवायचा.
त्यामुळे 'बायको' ही जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे, अशी बालमनाची पक्की समज़ूत झालेली.

परिणामी, "यावर्षी वाढदिवसाला काय घ्यायचं बंड्याला?", असं आजीने विचारलं की मीही बिनधास्त "आजी, आपण मला बायको घेऊया का?" म्हणत असे.

मुंजीच्या
वेळी मामालाच "मुलगी बायको म्हणून दे नाहीतर चाललो काशीला!", असे धमकावून सांगायची संधीमिळाली खरी, पण माझ्या परमप्रिय प्रतापी मामेबहिणीकडून बार्बी, मोटारगाड्या आणि भातुकलीवरून गालावरउमटवून घेतलेली बोटं आणि ओरखडे (वेळीच!) आठवले आणि 'काशी नको, पण ही महामाया आवर' स्थितीतमामाही स्वस्तात सुटला.

अशा 'बायको'ला राक्षस का नि कसा पळवतो, याचं राहून राहून आश्चर्य वाटायचं.
परीकथांचे दिवस संपले आणि बायको ही संकल्पनाही हळूहळू बदलत गेली.


एक पळवायची गोष्ट या स्थानावरून 'बायको'ला बढती मिळाली आणि ती उटीच्या बॉटनिकल गार्डनवरच्याउतरत्या हिरवळीवरून सलमान खानबरोबर

लोळत येणारी 'मैंने प्यार किया' मधली भाग्यश्री पटवर्धन (पटवर्धन!),

'कयामत से कयामत तक' मधल्या आमीर खानला मागून धावत

येऊन
मिठी मारणारी जुही चावला किंवा झालंच तर ज्याचं नावही आज़ आठवत नाही
अशा तद्दन टुकार चित्रपटातली,

मिथुन चक्रवर्तीने झोपेतच हात पकडला म्हणून (आनंदाने!!!) दचकलेली रती अग्निहोत्री, अशा निरनिराळ्याहव्याहव्याशा!) रुपात समोर यायला लागली. 'हम आपके हैं कौन' मधली सोज्वळ माधुरी हीच बायको

आणि 'सबसे बडा खिलाडी' मध्ये कितीतरी मादकपणे 'भरो, मांग मेरी भरो' गाणारी ममता कुलकर्णी (कुलकर्णी!!) ही ('मांग मेरी भरो' म्हणाल्याने कितीही वाटली तरी) बायको नाहीच, हे सुद्धा व्यवस्थित समज़ायला लागलं.


( शाळेतलं आपलं पहिलं क्रश म्हणजेच आपली बायको, या समज़ुतीतून मग कविताबिविता लिहिणं, तिच्याचसाठीमधल्या सुटीत मैदानात भटकणं,

ती शाळेत यायच्याआधी नि शाळा सुटल्यावर तिच्या बसस्टॉपवर घुटमळणं असली मजनुगिरी;

आणि याचंच थोडं 'ज़ाणकार'(!) रूप म्हणजे कॉलेजात साज़रे केलेले व्हॅलेंटाइन डेज़, रोझ डेज़, भेट म्हणून दिलेलीचॉकलेटं वगैरे सगळं.

बहुभार्याप्रतिबंधक
कायदा वगैरे गोष्टींच्या अस्तित्त्वाचीही ज़ाणीव

नसल्याने या सगळ्या गोष्टी केवळ एकाच मुलीपुरत्या मर्यादित न ठेवता आज़वर 'बायको'साठी म्हणून निश्चित केलेल्या निकषांवर खरी उतरणारी किंवा उतरवली ज़ाणारी कुणीही मुलगी लैलाच्या भूमिकेत चपखल बसायला लागली आणि आयुष्यातलं बायकोचं स्थान पटकावायला कित्येक पर्याय उपलब्ध झाले.



तेही वय मागे पडल्यानंतर मात्र मित्रमैत्रिणींसोबत दंगामस्ती नि उनाडक्या करण्याबरोबरच बायको 'कशी' हवी, 'का' हवी अशा अनेक प्रश्नांवर 'गंभीर' या प्रकारात मोडणाऱ्या चर्चा होऊ लागल्या.


'दिल चाहता है' मध्ये 'जो खुद जिये और मुझे जिने दे, ज़्यादा इमोशनल-विमोशनल ना हो' म्हणून आमीर खानने 'बायको'ला आणखी एक 'डायमेन्शन' ('मिती' हा काय बोअर शब्द आहे!) दिलं. सासूसुनांच्या मालिकांमधून स्मृती मल्होत्रा ज़शी बायको असू शकते,

तशीच सुप्रिया पिळगावकरही बायको असू शकते, हे सुद्धा ज़ाणवलं.

मग मला समज़ून घेणारी, माझ्या आवडीनिवडींशी बऱ्यापैकी मिळत्याज़ुळत्या आवडीनिवडी असणारी, मतमतांतरांचा आदर करणारी नि त्याबरोबरच स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करू शकणारी, सुखदु:खात साथ देणारी, उच्चशिक्षित नि नोकरी करणारी, माझ्या आईबाबांचा आदर असणारी पण तरीही बऱ्यापैकी 'मॉड' (म्हणजे काय ते अज़ून माहीत नाही!)


वगैरे वगैरे 'स्टिरिओटिपिकल' अपेक्षा असणं ओघाओघाने आलंच. माझ्या मित्रमंडळींपैकी अनेकांनी तर पदवीधर झाल्याझाल्या आपापली 'प्रकरणं' रीतसर 'अप्रूव्ह'ही करून घेतली.
मायदेशापासून हज़ारो मैल दूरवर आमच्या इनबॉक्समध्ये चक्क मित्रमैत्रिणींच्या लग्नाच्या


आमंत्रणपत्रिका येऊन पडू लागल्या! नको त्या वेळी आपल्यालाही या दिव्यातून कधी तरी ज़ावं लागेल, अशी भयानक ज़ाणीवही झाली. पण त्याचबरोबर 'मुलगा गझलाबिझला, कविता लिहितो म्हणे', 'पुढे आणखी शिकायचं म्हणतोय हो, बघा बुवा काय ते!', झालंच तर 'बाकी सगळं ठीक आहे,

पण तसं बऱ्यापैकी दिसण्याइतकं (!) पोट आहे (?!)' असे (अगदी आमच्या खात्यापित्या घराण्यावर ज़ाणारे!) अनेक शेरेही मिळणारच, याची खात्री झाली,


की लगोलग सुरक्षिततेची भावनाही निर्माण व्हायची. बायको हे किती अजब रसायन आहे, हे आज़वर इतरांच्या अनुभवांवरून, बोलण्यावरून,
(अगदी प्रसाद शिरगावकरांच्या 'बायको नावाचं वादळ' सारख्या भन्नाट साहित्यकृतींवरूनसुद्धा) लक्षात आलंच होतं. म्हणजे उद्या मी (ज़र!) गज़रा घेऊन आलो(च!), तर तो माळून मला स्वतःबरोबर मटार सोलायला बसवणारी बायको आवडेल,


की नाटकाला ज़ाऊया म्हटल्यावर "डार्लिंग, किटी पार्टीला ज़ाऊया का आज़चा दिवस?" विचारणारी बायको आवडेल, हे ज़ोवर ठरवता येत नाही,

हॉटेलात जेवल्यावर माझ्याच ग्लासातून रोझ मिल्कशेक पिणारी बायको हवी की शँपेनचा ग्लास उंचावून 'चिअर्स' करणारी बायको हवी,

हे ठरवता येत नाही (म्हणजे 'विच ऑफ़ द टु इज़ (मोअर?) बेअरेबल, हे ठरवता येत नाही! ऍक्सेप्टेबल काय आहे, हा वेगळाच मुद्दा आहे), थोडक्यात तोवर आपण 'सेफ़' आहोत, ही ज़ाणीवच सुखावह वाटते. आपण म्हणावं की "मला झोप येते आहे गं बाई!", आणि बायकोने म्हणावं "नाटकं करू नकोस जास्त, ज़रा पिल्लूचा युनिफ़ॉर्म कपाटातून काढून हँगरला लावून ठेव उद्यासाठी";

रविवारी दुपारी मस्तपैकी सोलकढी-भात नि फ़्राय पापलेटच्या जेवणानंतर चटईवर पडल्यापडल्या आपण तिच्या अंगावर हात टाकावा आणि उतू गेलेल्या दुधाच्या वासानं तिने दचकून स्वयंपाकघरात धाव घ्यावी; लग्नाआधी "आज़ संध्याकाळी कुठेतरी ज़ाऊया का"वर मी चालू केलेला फोन तास-दीड तासाने "चल बॉस आला,


मी ठेवते" वर संपवणाऱ्या बायकोनेच, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी घेतलेली साडी बोहारणीला द्यायचे दिवस आले की मात्र गाडीवरची गवार घेताना "आठ रुपे में देनेका है तो बोल" म्हणताना दाखवलेले व्यवहारचातुर्य दाखवावे, आणि प्रसंगी तिनेच घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, म्हणून हॉटेलात घेऊन ज़ावं;


पोराबरोबर क्रिकेटची मॅच बघताना बायकोने मस्तपैकी भजी तळावी,


तीही इंडियाच्या टीमचा नि आम्हां बापलेकांचा उद्धार करतच, आणि इतकंच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याची विकेट पडल्यावर आमच्या जल्लोषात तिनेही सामील व्हावं;


अशा अनेकानेक 'माफ़क' अपेक्षा पूर्ण करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बायको, ही व्याख्या सर्वमान्य आहे की नाही,

फ़ारच आदर्शवादी आहे की वास्तववादी वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत, तोवर निवांत असे पानभर लेख खरडण्यास आपण पूर्ण मोकळे असतो, हे लक्षात ठेवावे नि वेळेचा असा सदुपयोग करावा.
मुंबई विद्यापिठाच्या अभियांत्रिकीच्या


एखाद्या पेपरात उपटलेला अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्नसुद्धा सुसह्य ठरावा, असे हे यक्षप्रश्न ज्या परीक्षेत येतात, त्या परीक्षेत केट्या घेत पुढे ज़ाण्यापेक्षा (बरे, महत्त्वाचा मुद्दा असा की तशा त्या कधी क्लिअरसुद्धा करता येत नाहीत )


विषय फ़र्स्ट अटेंप्टच क्लिअर करावा किंवा ज्ञानशाखाच बदलून घ्यावी, अशा टोकाच्या भूमिकेचाही विचार 'मार्केट'मध्ये येऊ घातलेल्या तरुणांच्या डोक्यात घोळल्यास नवल ते काय! पण तरीही आमच्याच एका बंधुराजांकडून



त्यांच्या स्वतःच्या साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा "अगर शादी ऐसा लड्डू है, जो खाए वो पछताए, जो ना खाए, वो भी पछताए, तो बेटर है की खाकेही पछताओ", हे ऐकले त्यावेळी मात्र 'बायको'वर गेले दोन तास इतके मोठे पारायण खरडले,



ते खरडण्याचे मला त्यावेळी कसे काय सुचले नाही, असे वाटून गेले आणि त्याचवेळी कोणत्याही विषयावर टोकाची भूमिका घेऊन चालत नाही, हे पटले. 'बायको'सारख्या नाज़ूक पण तरीही ज्वलंत विषयावर तर नाहीच!


SOurce = ORKUT email forwards!!

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.