Tuesday, August 10, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} आई

आई
 
आई माझी आई
आई प्रेमाची सावली..
कधी रडू आलं की कुशीत घेऊन सामाझाणारी आई
कधी प्रेमाने दम देणारी आई,
 
आई माझी आई
आई प्रेमाची सावली....
कधी एकदा कामावरून घरी जाते आणि आईला पाहते 
आई प्रेमाची माऊली......
दिसली नाही तर रडू येत 
तिला पाहायला शिवाय माझी सकाळ होत नाही 
रात्री तिच्या  कुशीत शिरावा आणि सगळ जग
विसुरून झोपी जावं...
 
आई माझी आई
आई प्रेमाची सावली...
सकट आलं की स्वतावर घेणारी आई....
बाळाला कुशीत घेऊन खेळवणारी आई......
 
आई माझी आई
आई प्रेमाची सावली
कधी तिला बर नसलं की डोळ्यातून अश्रू हाउ लागता
कधी एकदा ती चागली होते आणि घर भिरते,
आई आपल्यासाठी देवाजवळ सतत प्रार्थना करत राहणारी आई
 
आई हे देवच रूप,
आई ही  दुधाची साय,
आई ही सुखादुखाची साथ,
आई ही गुलाबच फुल-काटे टोचू न देणारी,
आई ही प्रेमाचं सागर,
आई ही चांदण्याची  रात्र,
आई ही चंद्राची कोर,
आई ही पौर्णिमेचा चंद्र
आई ही पाय वाट
 
 
सुरेखा

 
Surekha Ghadshi

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.