Friday, August 20, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} आनंदाचा झरा!

 


 










 

आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहज प्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंग मनात आपोआप निर्माण झाले पाहिजेत. झऱ्याप्रमाणे तो मनात पाझरला पाहिजे,


ीवनात यशस्वी होणं, हीसुद्धा सहज    प्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनी यशस्वी बनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंदही मिळत नसतो. आनंदानं उंच उंच झोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हा तरुणांनी हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे! 

................
 

एक तरुणी रस्त्यानं एकटीच चालत होती. चेहरा उदास होता. स्वत:वरच नाराज होती. आसपास वसंताचा    फुलोरा फुलला होता. प्रत्येक झाड नवी, कोवळी, हिरवी, पोपटी पालवी लेवून चैतन्यानं सळसळत होतं. पक्ष्यांचा गोड किलबिलाट चालू होता, परंतु तिचं त्याकडे लक्ष नव्हतं. ती स्वत:च्या विचारात होती. तिच्या मनात शल्य सलत होतं की आपण संुदर नाही. 'माझ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड्स आहेत. परंतु, मलाच नाहीत. त्या सर्व आनंदी आहेत. मी सुंदर नसल्यानं मला बॉयफ्रेंड नाही.' 

या विचारांमध्ये ती गढली असतानाच वाऱ्याची झुळूक आली, तिच्या कपाळावरील बटा उडू लागल्या, नाचू लागल्या. तिच्या कानात हळूच, प्रेमानं गुंजारव करत झुळूक तिला म्हणाली, 'माझ्या मुली, तू माझ्यासमवेत उडत चल, विचारांमध्ये गुंतून खिन्न बनून बसू नको. मग तूही फुलत जाशील.' केवळ देहाच्या सौंदर्याकडं पाहात बसू नको, असं समजावण्याचा प्रयत्न ती करू लागली. 

वाऱ्याची ती झुळूक इकडून तिकडे, तिकडून इकडे, अशी सर्वत्र पिंगा घालत होती. एका जागी थांबायला तयार नव्हती. जीवन विशाल आहे. एका जागी, एका विचाराला तू चिकटून राहू नको. शरीर आणि मनानं चालत राहा, फिरत राहा. हेच जीवन आहे. झुळूक तिला पटवण्याचा प्रयत्न करू लागली, 'हे बघ, मी आनंद मिळवण्यासाठी इकडून तिकडे फिरत नाही, तर आनंदानं बेहोष होऊन सर्वत्र फिरत आहे. माझ्या मनात निर्माण झालेला आनंद व्यक्त करत आहे, आनंदाचा झरा माझ्या मनातच आहे. माझं मन आनंदानं इतकं भरून गेलं आहे, की मला काय करू आणि काय नको, असं झालं आहे. माझं हे नृत्य, नाच, पिंगा त्याचं प्रतीक आहे. आनंदापोटी हे घडत आहे. आनंद मिळविण्यासाठी मी हे करत आहे, असं तुला वाटत असेल, तर ते चूक आहे. आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहजप्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंग मनात आपोआप निर्माण व्हावेत. जीवनात यशस्वी होणं, हीसुद्धा सहजप्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनी यशस्वी बनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंद मिळत नसतो. आनंदानं उंच उंच झोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हा तरुणांनी हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे!' 

तुमच्या अंगी असलेली प्रवृत्ती अधिक महत्त्वाची आहे. अंगी योग्य वृत्ती असेल तर तुमचं मन नेहमीच प्रफुल्लित राहील. तुमच्यापुढं निर्माण होणाऱ्या समस्या कधी मोठ्या नसतात, तुम्ही मोठे असतात. समस्यांचे बळी बनता कामा नयेत, तर या समस्यांवर विजय मिळविता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. 

एखादी सोपी गोष्ट अवघड बनू शकतं. त्यास दुसरं कोणी जबाबदार नसतं, तर तुमचा दृष्टिकोन जबाबदार असतो. तुमच्या अंगी चांगली, विधायक प्रवृत्ती असेल तर अवघड कामही आव्हान ठरू शकतं! तुम्ही वागण्याची पद्धत बदला. 

एका पब्लिक स्पीकिंग क्लासमध्ये तरुणांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षकानं सांगितलं, 'तुमच्या बोलण्यात स्वर्गाचा जेव्हा उल्लेख येईल, त्यावेळी तुमचा चेहरा आनंदानं धगधगला पाहिजे, तळपला पाहिजे. डोळे चमकले पाहिजेत, ओठ थरथरले पाहिजेत.' हे ऐकून एका युवकानं शंका विचारली, 'नरकाचा उल्लेख आला तर चेहऱ्यावर कसे भाव हवेत?', त्यावर प्रशिक्षकानं उत्तर दिलं, 'त्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरील नेहमीचे भाव पुरसे आहेत!' 

एक लक्षात घ्या, विधायक विचार हा जीवनाचा फार मोठा ठेवा असतो. तुमचं मन, विचार बदला. मनात नेहमी चांगले विचार राहू द्या. निराशावाद्याला कधीच चांगली संधी सापडत नाही आणि आशादायी माणसाला अडचणींमध्येही संधी सापडते. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, त्याचवेळी संधीचा दुसरा दरवाजा उघडतो. जीवनावर विश्वास ठेवा. तुमचं जीवन सहज, हलकं, तरंगतं, कसं बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे, जीवनाशी झगडत राहू नये, तुम्ही लहरींशी लढत बसू शकत नाहीत, परंतु, लहरींवर तरंगू शकता. 

तुम्ही मनातील भावना बदलू शकता. तुमच्या जीवनाचा दर्जा, तुमच्या मनात सातत्यानं निर्माण होणाऱ्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना खालावत जातात, त्यावेळी त्यात बदल घडवून आणा. जीवनातील आनंदी घटना आठवा. 

जीवनमूल्यांमध्येही बदल घडवून आणा. जीवनातील चांगुलपणा आणि समाज यांना जोडणारी मूल्यं जोपासा. अनेकजण अपयशाला, मरणाला, असुरक्षिततेला, नकाराला भितात. दृढनिश्चयानं पुढे या, मग तुम्हाला समजेल की, अपयश म्हणजे दुसरं काही नसून पुढं सरकलेलं यश आहे. अपयश हे यशासाठी घातलेलं खतपाणी आहे. तुम्ही तुमच्या जीवनात ऊर्जा आणली तर ही ऊर्जा तुम्हाला मनातील अपयशाची भीती घालविण्यास मदत करील. तुम्ही भीतीचं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की, भीती ही नेहमी विचारांची चालना आहे आणि विचार म्हणजे मानसिक शब्दांना मिळणारी चालना आहे. अशा या भीतीचे, भीतीदायक विचारांचे गुलाम होऊन बसता. जर तुम्हाला धाडसाची आवड असेल तर असुरक्षिततेतून मार्ग काढण्याचे आव्हान तुम्ही सहज पेलू शकाल. मग तुम्हाला अशा या असुरक्षितेतही गंमत वाटेल. 

अनुवाद : जॉन कोलासो

 

 




Kalpesh Umarane
System Engg.
Direct Consulting Gruop
Pune.
Ph.9975612353





__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.