Thursday, August 26, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} सामना मधील अग्रलेख जरूर वाचा...

 

 

 

 

आपल्या देशाला मुसलमानी आक्रमणापासून अजिबात धोका नसून बाटग्या हिंदूंपासूनच सर्वात जास्त धोका आहे.


हिंदूंनो, तुम्ही दहशतवादीच आहात!
हिंदूंना बदनाम करण्याची एकही संधी आमच्या देशातील बेगडी निधर्मी सोडीत नाहीत. मग तो बेगडी कॉंग्रेसवाला असो, डावा असो नाहीतर दुसरा एखादा यादव कुळातला राजकीय पक्ष असो. हिंदुस्थानातच हिंदूंच्या तोंडावर ओरखडे मारून मुसलमानांना खूश करायचे हाच एकमेव धंदा सध्या बनला आहे. या धंद्यात देशाचे लुंगीपुचाट गृहमंत्री चिदंबरम यांनी नवा अध्याय सुरू केला आहे. दिल्लीत पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना चिदंबरम यांनी जाहीर केले आहे की, 'देशात भगव्या दहशतवादाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अनेक बॉम्बस्फोटांमध्ये हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे.' देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडी हे असले बिनबुडाचे विधान शोभत नाही. देशभरातील बड्या पोलीस अधिकार्‍यांसमोर चिदंबरम यांनी हे विधान करून नेमका कोणता संदेश दिला आहे, तर हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांवर नजर ठेवा आणि त्यांची हयगय करू नका. बिहार, प. बंगाल विधानसभा निवडणुका आता येत आहेत. त्यामुळे मुसलमानांना खूश करण्यासाठी हिंदूंच्या सणसणीत मुस्कटात मारण्याचा हा प्रकार आहे. अर्थात अशा कितीही थपडा खाल्ल्या तरी झोपी गेलेला हिंदू समाज कधी जागा होईल काय? हा आमच्यासारख्यांपुढे प्रश्‍नच आहे. अर्थात हिंदूंना जागे करण्याचे क्रतच आम्ही निखार्‍याप्रमाणे तळहातावर घेतले असल्याने आम्हास अशा हिंदुत्वविरोधी लुंगीपुचाटांचे मुखवटे टराटरा फाडावेच लागतात. चिदंबरम यांनी देशातील दहशतवादाबाबत हिंदूंना दोष दिला आहे. हिंदूंनी म्हणजेच भगव्यावर निष्ठा ठेवणार्‍यांनीच दहशतवादाचा उद्रेक चालवला असल्याचे टाकाऊ मत त्यांनी मांडले आहे ते कशाच्या आधारावर? की फक्त चिदंबरम यांच्या 
लुंगीत हिरवे वारे 
शिरले म्हणून त्यावर विश्‍वास ठेवायचा? चिदंबरम यांचा हिंदूंबद्दलचा द्वेष, विखार नवीन नाही. 'हिंदू दहशतवाद' असा उल्लेख त्यांनीच राज्यसभेत डिसेंबर 2009 मध्ये केला होता. 'जेहादी दहशतवाद' आणि 'हिंदू दहशतवाद' खपवून घेणार नाही असे ते त्यावेळी म्हणाले होते. हिंदू दहशतवाद असा थेट उल्लेख करणार्‍या चिदंबरम यांनी इस्लामी दहशतवाद असा शब्दप्रयोग मात्र केला नाही. त्यावेळी त्यांची जीभ का अडखळली? जे असत्य आहे त्याचा डांगोरा पिटायचा आणि जे धडधडीत सत्य आहे ते मात्र दडपण्याचा प्रयत्न करायचा. किती ही लुंगीपुचाटगिरी? देशातील बॉम्बस्फोटांत हिंदू दहशतवादाचा हात असल्याचा गलिच्छ आरोप देशाच्या गृहमंत्र्यांनी करावा यासारखे हिंदूंचे दुर्दैव नाही. हा आरोप करायला जामा मशिदीचा इमाम धजावला नाही, या देशातील कट्टर धर्मांध मुसलमानांचे नेतेदेखील असा आरोप करीत नाहीत; मात्र चिदंबरम यांनी तो करून धर्मांधांच्या हातात आयतेच कोलीत दिले आहे. आमचे दादा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे नेहमी सांगत की, आपल्या देशाला मुसलमानी आक्रमणापासून अजिबात धोका नसून बाटग्या हिंदूंपासूनच सर्वात जास्त धोका आहे. मुसलमानांनी आमचे जेवढे नुकसान केले नसेल त्यापेक्षा कित्येक पट जास्त नुकसान या आपल्यातल्याच बाटग्यांनी केले आहे. इतिहासकाळापासून त्याचे पुरावे आहेत. ते आम्हाला आज द्यायचे नाहीत, पण चिदंबरम यांनी त्याच बाटगेपणाच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. मालेगावच्या एका स्फोटाच्या निमित्ताने साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय यांना अटक केली. हासुद्धा मुसलमानांना खूश करण्याचाच एक राजकीय बनाव होता. दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीत मुसलमान अतिरेकी मारले गेले व ते अतिरेकी असतानाही त्या पोलीस चकमकीचा अनेक मुसलमान संघटनांनी निषेध केला. त्याचा परिणाम मुसलमानी व्होट बँकेवर होऊ शकतो. त्यामुळेच मालेगाव स्फोटांचे धागेदोरे ओढून ताणून हिंदू संघटनांपर्यंत पोहोचविण्यात आले हेच सत्य आहे आणि उघडपणे करता आले नाही तरी शरद पवार व आर. आर. पाटील हे एकमेकांच्या हातावर टाळी देत हे सत्य खासगीत मान्यही करतील. हेमंत करकरे आता शहीद झाले. त्यामुळे या तपासाबाबत व राजकीय दाबदबावाबाबत बोलणे योग्य नाही. दुसरा विषय 'सनातन' संस्थेचा. त्यांचे काही कार्यकर्ते तुरुंगात आहेत व तपास सुरू आहे. तेथेही मारून मुटकून वैद्यबोवा बनविण्याचाच प्रकार जास्त दिसतो. दिवाळीत 
सुतळी बॉम्ब फोडले म्हणून 
हिंदूंच्या पोरांनाही उद्या दहशतवादी ठरविले तरी आश्‍चर्य वाटायला नको. इतकी हिंदूंविषयी घृणा कॉंग्रेसवाल्यांच्या मनात ठासून भरली आहे. त्या चिदंबरमना आम्हास विचारायचे आहे की, काय रे बाबा, तुझा जन्म हिंदूच्या पाळण्यात झाला की मक्केत झाला ते आधी जाहीर कर. कावीळ झालेल्यांना सगळे पिवळे दिसते तसे चिदंबरमना सगळे हिरवे दिसते आहे. कश्मीरात सध्या पाकड्यांनी हिंसेचा आगडोंब उसळवून सरकारची राखरांगोळी केली आहे. ही हिंसादेखील हिंदू दहशतवाद्यांनीच केली काय? कश्मीरातील शिखांना सक्तीच्या धर्मांतराची धमकी देणारेही हिंदूच आहेत काय? प. बंगालात माओवाद्यांनी रक्ताचे सडे पाडले आहेत. रेल्वेगाड्या उडवून शेकडो निरपराध्यांना कुत्र्याच्या मौतीने मारले जात आहे. नक्षलवाद्यांनी तर पोलीस व जनतेचे बळी घेण्याचे सत्र नव्याने सुरू केले आहे. त्यामुळे भेदरलेल्या चिदंबरम यांनी त्या दहशतवादापुढे अक्षरश: गुडघेच टेकले व चर्चेसाठी पायघड्या घातल्या आहेत. या हिंसाचारातही लुंगीपुचाट गृहमंत्र्यांना हिंदू दहशतवादाचाच हात दिसत असेल तर त्यांनी मुंबईत यावे. आम्ही त्यांच्या डोळ्यांवर विशेष शस्त्रक्रिया प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून करून घेऊ. तुमच्या नजरेस सदान्कदा हिरवे हिरवे का दिसते ते एकदा तपासून घ्यावेच लागेल. कारण असेच हिरवे फार काळ दिसू लागले तर या देशाचा अखंड पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही व भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, धिंग्रा, चापेकर बंधू यांना हिंदू दहशतवादी म्हणून घोषित करून दाऊद इब्राहीम, अबू सालेम, अफझल गुरू, मोहम्मद अजमल कसाब हे हिंदुस्थानातील नवे क्रांतिकारक, महात्मे म्हणून जाहीर केले जातील. त्यातील काही जणांना भारतरत्न देण्याच्या शिफारसी आपल्याच सहीने केल्या जातील. या देशातील हिंदूंचे हे नेहमीचेच दुर्दैव आहे. येथे हिंदूंनाच खतम करून मुसलमानांचा 'जय' करणारे आपल्यातलेच बाटगे जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्वत:च्याच हिंदुस्थानात हिंदूंना कोणी विचारणार नाही. मुंबईतील बॉम्बस्फोटांत, कसाबच्या हल्ल्यात, जर्मन बेकरीच्या स्फोटात तडफडून मेलेल्या हिंदूंनो, तुम्ही अतिरेकी आहात. दहशतवादी आहात. येथे राहायचे असेल तर 'महात्मा' कसाब व 'धर्मात्मा' अफझल गुरूंची माफी मागा.

 






__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.