Friday, August 19, 2011

[Marathi Songs] " मी अण्णा हजारे आहे " बायको जेंव्हा बोलत असते

बायको जेंव्हा बोलत असते

बायको जेंव्हा बोलत असते तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका सारं सारं...स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

गरजून बरसून झाल्यानंतर थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

--
" मी अण्णा हजारे आहे "
" वंदे मातरम"
"भारत माता कि जय "
"जय हिंद "
" जय महाराष्ट्र"
मित्रानो काही तांत्रिक कारणाने आपल्या ग्रूप चा फोटो बदलू शकत नाही. तुम्ही सगळे समजून घ्याल हीच अपेक्षा
" मी मराठी - मित्रमराठी "

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.