" आजची नववधू"
नववधू प्रिया मी घाबरते ।ध्रु।
साडी नेसणे मला न जमते ॥ नववधू...
नको मला ती शालू पैठणी ।
सलवार कमिज अन ती ओढणी॥
बर्मुडा अन टॉप घालूनी ;
सांग सख्या कशी मी दिसते॥ध्रु॥१॥
अरे तुरेचे ते आपुले बोलणे।
आहो जाहो आदराने म्हणणे॥
पदर डोक्यावर घेऊन वावरणे;
सख्या मला ते मुळी ना जमते॥ध्रु॥२॥
पदर धरुनी उगी लाजणे।
पदरा आडूनी लाडिक बघणे॥
रुसण्याचे ते नाटक करणे;
असे सख्या मज मुळी ना कळते॥ध्रु॥३॥
नको कपाळा कुंकू लावणे।
गळ्यात मंगळसूत्राचे लोढणे ॥
हातात बांगड्या हिरव्या भरणे;
सख्या मला ते मुळी ना शोभते॥ध्रु॥४॥
विनोद
९८२२४१९७८८
__._,_.___
.
__,_._,___
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.