हरवला आहे.
ए. सी. ऑफिस, स्वतंत्र केबीन,फटाकडी सेक्रेटरी, दिवसभर मिटींग्सच मिटिंग.
मिटींग्समुळे खूप भेटी राहील्या आहेत,
सगळ्या मिटींग्स सोडून ज्याला भेटाव.
असा लंगोटी यार मात्र हरवला आहे.
हरवला आहे.
भरपूर पगार, उदंड सेव्हिंग.
मनसोक्त शोपिंग, सामानाचा ढीगच ढीग.
सामानाच्या ढीगाखाली खूप गोष्टी दडल्या आहेत,
चूक करून ज्याच्या आड़ लपाव,
असा आईचा पदर मात्र हरवला आहे,
हरवला आहे.
दिवसाआड़ पार्टी, कधी पब तर कधी डिस्को,
धुंद रात्र मस्तीची, प्याल्या प्याल्यातुन झींगच झींग,
चिअर्सच्या चित्कारातून, खूप आवाज विरून गेले आहेत,
ज्या आवाजाने हृदयाला साद घालावी,
असा आरतीचा गजर मात्र हरवला आहे,
हरवला आहे.
कारच्या वेगात, सायकलची फेरी हरवली आहे,
होटेलींगच्या खाण्यात फोडणीची पोळी हरवली आहे,
तारांकीत क्रुझच्या आरामात, पंढरीची वारी हरवली आहे,
पिकनीक स्पॉटच्या गर्दीत, मामाचा गाव हरवला आहे,
बंद दाराच्या अपार्टमेन्टमध्ये, शेजार हरवला आहे,
डिजे, व्हीजेच्या गोंगाटात, वासुदेवाची मुरली हरवली आहे,
साठ फूटी सिमेंटच्या रस्त्यात, वडाची सावली हरवली आहे,
कॉन्व्हेंटच्या अटटाहासात, बाराखडी हरवली आहे,
हाय, हेलो, थ्यंक यु मध्ये, साधीभोळी अनौपचारीकता हरवली आहे.
फायद्या तोट्याच्या गणितात , उत्स्फुर्तता हरवली आहे,
नीलाजरया रिमिक्स मध्ये, नीरागसता हरवली आहे,
धकाधकीच्या दिनक्रमात, निवांत गप्पा हरवल्या आहेत,
चौकोनी कुटुम्बात, नाती हरवली आहेत,
सिमेंटच्या जंगलात, माती हरवली आहे,
आम्ही धावणार करीअरच्या मागे, बाकी कशाची खंत नाही,
कशा कशाचा हिशेब मांडू?
ह्या चकचकीत मोडर्न जगण्यात, जिंदगीच हरवली आहे.
जिंदगीच हरवली आहे.
Prithvi9860431926--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Marathi Songs" group.
To post to this group, send email to marathi-songs@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to marathi-songs+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/marathi-songs?hl=en.
काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita
Thursday, August 25, 2011
Re: [Marathi Songs] हरवला आहे.
NICE
2011/8/26 Prithvi Kunjir <kunjirprithvi@yahoo.com>
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.