Wednesday, August 24, 2011

[Aapali_marathi_kavita] मीडियावर प्रचंड नाराज

 

मणिपुरातील मानवाधिकार कार्यकर्ते मुख्य प्रवाहातील भारतीय मीडियावर प्रचंड नाराज आहेत. राष्ट्रीय मीडियाने इरोम चानू शर्मिलापेक्षा भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण करीत असलेले अण्णा हजारे यांना वारेमाप महत्त्व दिल्यामुळे ते कमालीचे नाराज आहेत. सुरक्षा दलांच्या मानवाधिकार उल्लंघनाच्या   निषेधार्थ इरोम चानू शर्मिला गेल्या ११ वर्षांपासून उपोषण करीत आहे.  

शर्मिलाचे थोरले बंधू आणि मानवाधिकार कार्यकर्ते सिंघजित सिंह यांनी सांगितले की, उत्तर-पूर्वेतील लोकांची नेहमीच उपेक्षा आणि भेदभाव केला जातो. उर्वरित भारत आमच्याकडे हीनतेच्या दृष्टिकोनातूनच पाहतो, अशी आमची भावना झाली आहे. अण्णा हजारेंचे उपोषण राष्ट्रीय मीडियामध्ये चर्चेचा विषय होतो आणि ११ वर्षांपासून उपोषण करीत असलेल्या आमच्या शर्मिलाची हा मीडिया साधी दखलही घेत नाही  

इरोम चानू शर्मिला मणिपूरची 'पोलादी महिला' म्हणून प्रसिद्ध आहे. सुरक्षा दलाकडून १० लोकांची हत्या करण्यात आली त्या घटनेची ती प्रत्यक्षदर्शी आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या मानवाधिकाराच्या या उल्लंघनाच्या निषेधार्थ तिने २ नोव्हेंबर २००० पासून उपोषण सुरू केले आहे. सुरक्षा बल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करावा, अशी शर्मिलाची मागणी आहे. हा कायदा कोणतीही कायदेशीर कारवाई न करताच सुरक्षा बलांना गोळी मारण्याचे अधिकार प्रदान करतो. उपोषण सुरू केल्यानंतर काही दिवसांतच शर्मिलाला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने तिची सुटका केली तेव्हापासून शर्मिलाचे उपोषण सुरू आहे. उत्तर-पूर्वेकडील राज्यांत काहीही घडले तरी त्याकडे अपवादानेच लक्ष दिले जाते. याबाबत भारतीय जनतेचे वर्तन भेदभाव करणारे आहे, अशा शब्दांत अन्य एक मानवाधिकार कार्यकर्ते बबलू लोइटांगबम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शर्मिला सध्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात आहे. तिथेही तिचे उपोषण सुरू आहे. तिने अन्न घेण्यास नकार दिल्यानंतर तिला लसीद्वारे अन्न देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून होत आहे. सिंह म्हणाले की, अण्णांचा जन्म मणिपुरात आणि शर्मिलाचा जन्म दिल्लीमध्ये झाला असता तर परिस्थिती उलट राहिली असती. मानवाधिकारासाठी लढा देणारे अन्य एक कार्यकर्ते तुषार सिंह म्हणाले की, उर्वरित भारतापासून वेगळेपणाच्या या भावनेमुळेच उत्तर-पूर्वेतील राज्यांत दहशतवाद वाढण्यास खतपाणी घालत आहे.





--

Warm regards.
Prashant Gangawane
Ph.D.(Tech) Research Scholar
Dept. fiber and textile processingTechnology
I.C.T.(UDCT)
Matunga,
Mumbai-400019
Mobil: 09322906318


__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.