Monday, September 13, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} ____प्राचीन काळातली गोष्ट____

 

From: marathikuldaivat@googlegroups.com [mailto:marathikuldaivat@googlegroups.com] On Behalf Of vinod shinde
Sent: Wednesday, May 12, 2010 11:26 AM
Subject: प्राचीन काळातली गोष्ट

 

ही गोष्ट फार प्राचीन काळातली आहे. तिच्यात अलिकडील काळातील स्थळांशी वा पात्रांशी साम्यस्थळे सापडल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
लाखो वर्षांपूर्वी भरतखंडात एक महाअरण्य होते. सर्व प्रकारचे प्राणी त्यांत रहात होते. पण त्यावर वर्चस्व होते ते माणसांचे! जंगलातल्या इतर प्राण्यांना याची फार खंत होती. स्वतंत्र होण्यासाठी त्यातील अनेकांनी माणसांशी अपेशी झुंज दिली होतीत्यांत प्राणार्पणही केले होतेपण ते व्यर्थ गेले होते. हळुहळू माणसांना या प्रदेशाचा कंटाळा आला होता. तरी वरकरणी तसे न भासवता त्यांनी काढता पाय घेण्याचे ठरवले होते. तुमच्या स्वातंत्र्यलढ्याला मान देउन तुमची चांगली व्यवस्था लावून मगच आम्ही जातो असा पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु जाताना त्यांनी जंगलाचे दोन असमान भाग केले. एका भागांत सदैव वखवखलेल्या मांसाहारींची सोय झाली. दुसरा भाग अर्थातच बहुसंख्यीय शाकाहारी प्राण्यांसाठी असावा अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शाकाहारींचा पहिला राजा हत्तीसमाजाचा होता. त्याचे नांव हत्तेरु. तर या हत्तेरुला मोठेपणा मिरवण्याची खूप हौस होती. त्याच्या बरोबरीचे अनेक हत्ती तशाच विचारांचे होते. त्याने असे फर्मान काढले की ज्या मांसाहारींना इथेच रहायचे आहे त्यांनी खुशाल इथे रहावेशाकाहारी त्यांना त्रास देणार नाहीत. याचा परिणाम फार गुंतागुंतीचा झाला.




अनेक लबाड लांडगेशिकारी कुत्रेकांही वाघ सिंह मागेच राहिले. त्यांना खुष ठेवण्यासाठी त्यांची खास बडदास्त ठेवण्यात आली. तरसांना शिकार करता येत नसल्यामुळे प्रत्येकाने आपल्या शिकारीतला वाटा त्यांना द्यावा असा ठराव पास झाला. वाघ सिंहांनीही खास अधिकार मागून घेतले. बाकीच्यांच्या पदरात मात्र बहुसंख्य असुनही कांहीच पडले नाही. ते बिचारेस्वतंत्र झाल्याच्या आनंदात "गेले घ्यायचे राहुनी" असा विचार करुन गप्प बसले.
हत्तेरु व त्याचा कळप दिवसाचा बराच वेळ पाणवठ्यावर जलक्रीडा करण्यात घालवायचे. सगळा कारभार त्यांनी गाढवांवर सोपवला होता. सामान्य प्राण्यांचा वाली कोणीच नव्हता. कोल्ह्यांनी या परिस्थितीचा फारच फायदा करुन घेतला होता. लांड्ग्यांनी हरणांवर हल्ला केला तरी हे कोल्हे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करायचेगप्प बसून मजा बघायचे. पण कधी या हल्ल्यांना कंटाळून शाकाहारी प्राण्यांनी प्रतिहल्ला केला की जंगलभर नुसती कोल्हेकुई सुरु व्हायची. मग हत्ती सर्व प्रकरणाची चौकशी करुन हरणांना शांततेचा उपदेश करायचे आणि अन्य मोठ्या आकाराच्या शाकाहारींना ताकीद द्यायचे. माणसांनी केलेले कायदे पाळायला प्राणी बांधील नव्हतेच! वानरसेना सुरवातीच्या काळात अलिप्तपणे झाडावरची फळे खाण्यात आणि हत्तेरुचे नेमके काय चुकले यावर चर्चा करण्यातच धन्यता मानत होती.
एके दिवशी हत्तेरु मरण पावला. सर्व प्राण्यांना अल्पकाळ चिंता वाटली. परंतु हत्तींनी हत्तीराला महाराणी केले. तिने हत्तेरुच्या तुलनेने बरा कारभार केला खरापण सत्तालोलुप खुषमस्कर्‍यांची एक फौजच तिच्याभोवती तयार झाली. सर्व प्राण्यांना एकमेकांशी भांडत ठेवून आपली सत्ता मजबूत करण्यात ती यशस्वी झाली. याचा परिणाम काय होईल याचा फारसा विचार न केल्याने जंगलाचे आस्तित्वच धोक्यात येण्याची वेळ आली. पुढे फार उन्मत्त होऊन तिने सिंहांमधे भांडणे लावून दिली. तेंव्हा ते सहन न होऊन काही सिंहांनी ती बेसावध असताना तिला एकटे गाठून ठार केले. हत्तीराच्या मृत्युनंतर जंगलभर एकच हाहाकार उडाला. हत्तीसमाज तर गलितगात्रच झाला. त्यांनी एकदोन नेते सिंहासनावर बसवले खरेपण ते सगळेच शेणाचे पुतळे ठरले! हत्तीराचा मुलगाहत्तीव हा तर फारच अननुभवीत्या बिचार्‍याचा या साठमारीत निष्कारण बळी गेला.
हत्तेरुच्या पश्चात माकडांनी सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण हत्तीरासमोर त्यांची डाळ शिजली नव्हती. हत्तीराच्या नंतर मात्र त्यांनी शाकाहारी का मांसाहारी हा एक जुना वाद उकरुन काढला. वर्षानुवर्षे हत्तींच्या गैरकारभाराला कंटाळलेल्या प्राण्यांना त्यांत तथ्य दिसू लागलेथोडे कुतुहलही वाटले. कोल्हे मात्र माकडांना तीव्र विरोध करत होते. पण कोल्हे हे बर्‍यावाईट सर्वच गोष्टींना विरोध करतात हे प्राण्यांना माहिती होते. तसेच कोल्हे कधीकाळी सत्तेत आले तर सर्वांनाच उपासमारीचे भय होते. अशा स्थितीत एकदा तरी माकडांना संधी द्यावी या विचाराने बहुसंख्य प्राण्यांनी त्यांचे समर्थन केले. माकडे सत्तेवर आली पण त्यासाठी त्यांना काही नाराज हत्तीघोडे,गेंडेजिराफ वगैरेंचे सहाय्य घ्यावे लागले. सामान्य प्राणीही आता जरा बरे दिवस येतील या आशेने हरखून गेले.
पण कसचे कायमाकडांनी सत्तासुरा चढताच माणसांनी त्यांच्यासाठी केलेल्या सर्व म्हणी खर्‍या करुन दाखवल्या!
सारे जंगल अशांत झाले. हत्तींच्या राज्यात कांही नाराज प्राणी, "यापेक्षा माणसांचे राज्य बरे होते" असे बोलून दाखवत. माकडांच्या धुमाकुळात तर यापेक्षा हत्तींचा गैरकारभार बरा होता अशा निर्णयाप्रत सर्व प्राणी आले. पण हत्तींमधे प्रचंड फाटाफूट झाली होती. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. फक्त लांडगेकोल्हे व शिकारी कुत्र्यांचे फावले होते. माकडांना पर्याय मिळेपर्यंत सर्व प्राणी माकडांच्या हातातले कोलीत काढून घेण्याच्या प्रयत्नांत होते. माकडांचा प्रमुख एक वयोवृद्ध कपिराज होता. तो हताश झाला होता कारण त्याचे कोणीच ऐकत नव्हते. शेवटी कंटाळून त्यानेही नाचावयास सुरवात केली. मग तर सगळी वानरसेना उत येऊन सूरपारंब्या खेळायला लागली. कावळे नेहमीप्रमाणे कांवकांव करुन या गोंधळात भर घालू लागले. ऊंच झाडावर बसल्यामुळे सर्व बातम्या त्यांना आधी समजतत्याला तिखटमीठ लावून त्या चिवडण्यातच ते धन्यता मानत. वाईट बातम्या ओरडून पसरवणारे हे कावळे चांगल्या बातम्यांमधे फारसा रस दाखवत नसत.
अस्वले या सार्‍या अराजकात अलिप्त राहून नदीकाठी मासे खाण्यात मग्न होती. शेवटी एकदाचा हत्तींनी पुढाकार घेऊन माकडांना पिटाळून लावले. सर्व प्राणी भयभीतपणाने आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची वाट पाहू लागली. पण हत्तींमधला कलह पुन्हा एकदा उफाळून आला. वाघ सिंहांमधल्या मारामार्‍या चालूच राहिल्या. माकडांनी आगी लावायला सुरवात केली.
मूठभर बलवान प्राणी सुखी झाले होते त्या जोरावर सगळ्या जंगलाची खूपच प्रगती झाली असल्याचा हत्ती,कोल्हे व कावळ्यांना साक्षात्कार झाला!!
सामान्य प्राण्यांच्या मते मात्र,
जंगलावरचे वखवखलेल्या प्राण्यांचे छुपे हल्ले चालूच राहिले.
कमजोर प्राण्यांची उपासमार चालूच रहिली.
बलवान प्राण्यांसाठी वेगळा न्याय चालूच राहिला.
जखमेवर मीठ चोळावे तशी "जंगल मे मंगल" ही घोषणा ऐकत रहावी लागली.
जंगलात खर्‍या अर्थाने सुराज्य यावे ही सामान्य प्राण्यांची अपेक्षा फोलच ठरली !!!
त्यांना बिचार्‍यांना कुठे माहित होते की माणसांच्या राज्यातही हेच चालते ??

माकडांना पिटाळून लावल्यावर कांही दिवस हत्तींमध्ये साठमारी चालली. पण कुठल्याही परिस्थितीतजंगलाची सत्ता गमवायची नसल्यामुळेत्यांनी अखेर आपापसात जुळवून घेतले. माकडे परत सत्तेवर दावा सांगतील या भीतिने त्यांना कोल्ह्यांची व लांडग्यांची मदत घ्यावी लागली.
थोड्याच दिवसांत जंगलवासीयांना आपण काय चूक करून ठेवली आहे याचा बोध झाला. पण आता फार उशीर झाला होता. कोल्हे हे मांसाहारीच असल्यामुळे त्यांना शाकाहारी प्राण्यांपेक्षा वखवखलेल्या हिंस्र पशूबद्दल जास्त कळवळा होताचकारण त्यांचे आस्तित्वच त्यावर अवलंबून होते. हत्तींना मात्र त्यांच्याबद्दल जवळीक वाटण्याचे काहीच कारण नव्हते. पण माणसांनी सोडून जातानाशाकाहारी व मांसाहारी यांच्यात जी भांडणे लावून दिली होती ती त्यांच्या पथ्यावर पडली होती. ही भांडणे कधीही मिटू न देण्यातच त्यांचे सत्तेवर टिकून राहण्याचे रहस्य दडलेले होते. तशात त्यांना हत्तेरुहत्तीरा यांच्या परंपरेत अगदी शोभून दिसेल अशी नवी हत्तीण - 'हत्तीयामिळाली होती. ती जरी दुसर्‍या जंगलातून आली असली तरी हत्तीराच्यासहवासांत तिने हत्तेरू कळपाच्या एकूणएक चाली व युक्त्या आत्मसात केल्या होत्या. हत्तीसमाजात घराणेशाही ही एक अत्यंत आवडती प्रथा होती व या सगळ्या निकषांवर हत्तीयाही त्यांना अगदी तारणहार वाटत होती. त्यामुळे हत्तीयाला त्यांनी उस्फूर्तपणेएक सोंडेनेआपली'राणीघोषित केले. नाही म्हणायला काही तुरळक'महत्वाकांक्षीहत्तींनी तिला विरोध केला पण बहुमत तिच्या बाजूला आहे हे लक्षांत येताच बंडखोरांचा नेता'हत्तारयाने लगेच तिच्याशी जुळवून घेतले आणि तिच्याचदरबारात तो मानाच्या जागी झुलू लागला!
हत्तीया अत्यंत धूर्त व हुशार होती. तिने सर्वांचेच पाणी चांगले जोखले होते. तसेच जंगलातल्या भोळ्याभाबड्या प्राण्यांना कसे मुठीत ठेवायचे यांत ती निष्णात झाली होती. 'हत्तारव्यतिरिक्त प्रत्येक प्राणीसमूहाचे प्रमुखसत्तेची लालूच दाखवून तिने आपलेसे केले होते. त्यामुळे अत्यंत लबाडअस्वलेगेंडेपाणघोडे व काही जिराफझेब्र्यांना तिने मंत्रीपद दिले होते. चारा खाऊन माजलेल्या एका'वळू'ला सुद्धा या पंगतीत मानाचे स्थान मिळाले होते.स्वतः मात्रजबाबदारी न घेतातिने काही सिंहांना उच्चपद देऊ केले होते. 'हत्तुलया आपल्या लाडक्या बछड्याला पुढे आणण्याचा तिचा प्रयत्न चालूच होता. जुन्या परंपरेप्रमाणे सर्व हत्ती या हत्तुलबाळाचे कौतुक करण्यात एकमेकांची स्पर्धा करत होते. हत्तुलला या जंगलाची काहीच माहिती नव्हतीअनुभव तर नव्हताच. तो कुठेही बेतालपणे बडबडत फिरत असे. मग त्यातून होणारा गोंधळ निस्तरण्यासाठी हत्तीसमाजाची तारांबळ उडायची. हत्तीयाने धोरणीपणे हत्तुलला पुढे केले असले तरी तिच्याकडे आणखी एक राखीव पर्याय होताच. पण त्याची एवढ्यात वाच्यता न करण्याइतकी ती हुशार होती.
एकंदरीतचइतक्या वर्षांच्या गैरकारभाराला सरावलेल्या हत्तीसमाजाकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा कशी ठेवणारत्यातून काही दाखवण्यापुरते चांगले काम करायचा प्रयत्न केला की कोल्हे त्यांत लगेच कोलदांडा घालायचे. या कोल्ह्यांच्या निष्ठा 'बाहेरअसल्यामुळे त्यांना या जंगलाच्या भवितव्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. किंबहुना एक दिवस बाहेरून कुमक मिळवून या जंगलावर कोल्ह्यांचेच राज्य आणण्याचे त्यांचे मनसुबे होते. समान ध्येय असल्यामुळे कोल्हे व लांडगे एकमेकांना धरून होते तर समान ध्येय असूनही काही वाघांमध्ये 'सवतासुभानिर्माण झाला होता. "आपणच काय ते खरे व दुसरे ते कागदी" असे दोन्ही गटांना मनापासून वाटत असल्याने निरपराध बोकडांवर हल्ले होत होते. सिंहसंप्रदाय अलीकडे तसा शांत होता. त्यांचाच एक ज्ञातिबांधव उच्चपदी बसल्याने स्वतःचे वेगळे जंगल स्थापण्याच्या त्यांच्या चळवळी थंडावल्याहोत्या.
माकडे झालेल्या पराभवापासून काहीच शिकली नव्हती. संधीची वाट पाहून व्यूहरचना करण्याऐवजी ती एकमेकांनाच दात विचकून ओचकारत होती. वयोवृद्ध'कपिराजतर अगदीच निस्तेज झाले होते. त्यांचा प्रतिस्पर्धी 'हुप्प्यापरत सत्तेची स्वप्ने पाहत बसला होता. अतिनिराशेमुळे काही माकडे हिंसक बनली होती तर काही चक्क मांसाहारी झाली होती. सामान्य प्राणी भयभीत झाले होते तर हिंस्र प्राणीरानटी कुत्रे व तरसे खूष होती. दिवसेंदिवस जंगलातले गवत व घनदाट झाडी कमी होऊ लागली होती. लांबच्या वस्तीतल्या माणसांचे लक्ष परत एकदा जंगलाकडे गेले होते. जंगलाच्या अस्तित्वालाचधोका निर्माण झाला होता.पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नव्हते. मूठभर शहाणे प्राणीयाकडेजंगलवासीयांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण हत्तीबेदरकारपणे आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतीलअसे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. अगतिकपणे त्यांनी आपली सर्व भिस्त त्या सर्व शक्तिमान परमेश्वरावर ठेवली होती. आणि म्हणूनच ते आजपर्यंत जिवंत होते!
टीप : या कथेत कुणालाही कसलेही साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे.

--
Some people are meant
for something more...
:Vinod  9881300981

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.