जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन Posted: 17 Aug 2010 07:39 AM PDT जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निःशंकपणे डोळे पूस. ठीकच आहे, चार दिवस- उर धपापेल, जीव गुदमरेल. उतू जणारे हुंदके आवर, कढ आवर. उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक घर कर मला स्मरून कर, हवे तर मला विस्मरून कर. | तुझ्या शिवाय जगण्याचा विचार आता करतो .... जीवन इथेच थांबलं बघ माझं आता मरन्याचा विचार करतोे ..... तुझ्या पासून दूर जाताना मन जड़ झाले होते चेहरा हसरा दाखवला तरी डोळे भरून आले होते ... |
माणूस वाचणारा कवी Posted: 17 Aug 2010 07:38 AM PDT माणूस वाचणारा कवी वेगवेगळे ग्रंथ वाचून विचारवंत होण्यापेक्षा माणूस वाचायला शिकणे आवश्यक आहे. कारण माणूस या शब्दाइतका पवित्र शब्द नाही. वास्तवाशी संवाद म्हणजे संघर्ष आणि संघर्षाचा संबंध संस्कृतीशी आहे. या संस्कृतीचा निर्माता माणूस आहे म्हणूनच माणूस प्रथम वाचला पाहिजे मगच ग्रंथ वाचले तरी चालतील,' या वास्तवतेची जाणीव करून देणारा आणि प्रत्येक कवितेतून सभोवतालच्या माणसांचे अंतरंग, त्यांच्या व्यथा, वेदना आणि कथादेखील आपल्या कवितेतून मांडणारा कवी म्हणजे नारायण सुर्वे! असा हा आधुनिक लोककवी! लोककवी तुकाराम अनेक विद्वानांच्या प्रबंधांचा विषय बनतो तसाच हा लोककवी अनेकांच्या प्रबंधांचा आणि माहितीपटाचा विषय बनला आहे. आयुष्यात कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने जगणार्या नारायण सुर्वे यांच्या जीवनावरील माहितीपट फोर्ड फाऊंडेशनने २३ लाख रुपये ख्रर्च करून तयार करावा हाही एक चमत्कारच म्हणावा लागेल. फोर्ड फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि ख्याल ट्रस्टने 'नारायण गंगाधर सुर्वे' या नावाने सुमारे ४५ मिनिटांचा एक माहितीपट तयार केला आहे. शांता गोखले यांची पटकथा, अरुण खोपकर यांचे दिग्दर्शन आणि किशोर कदम यांनी अभिनय केलेला हा चित्रपट म्हणजे सुर्वे यांच्या एकूण कवितेच्या प्रवासाचा धावता आढावा घेण्याचा केलेला एक असफल प्रयत्न म्हणावा लागेल. आपला जन्म नेमका कधी, कुठे आणि कोणत्या आईच्या पोटी झाला याची कोणतीही जाणीव नसलेला आणि तरीही या जगातून गेल्यावर आपले नाव राहणारच या सार्थ अभिमानाने काव्यामध्ये आपल्या हृदयाचा पीळ उलगडवून त्यात जीव ओतणारा कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा आपल्याला परिचय होतो. गिरणीच्या दारावर गंगाराम सुर्वे यांना सापडलेला बेवारशी पोर त्याच्या अज्ञात मातेने नाळ कापून जगाच्या पाठीवर अंधारात भिरकावून दिल्यावर गिरणीच्या संस्कृतीशी त्याच ओल्या नाळेने जोडला गेला, वाढला आणि गिरण संस्कृतीशी नाव जोडून मोकळा झाला. कळू लागले त्याच वयात हातात डबा घेऊन गिरणीत हरकाम्या म्हणून जाऊ लागलेल्या नारायणला या गिरणगावातील संस्कृतीनेच मोठे केले. साधा गिरणीतील हरकाम्या पोरगा सभोवतालच्या वातावरणात मोठा होत असतानाच कधी राजकीय चळवळीत उतरला हे त्याला देखील कळले नाही. त्याच्या कवितेत हेच सतत जाणवत राहिलं आणि जाणवत राहिलं ते सध्या हरवत चाललेलं संवेदनक्षम माणसाचं जीवन! 'प्रत्येकवेळी कोणतीही गोष्ट ठरवून झाली नाही पण दरवेळी प्रत्येक गोष्ट जमत गेली बुवा' अशी प्रांजळपणे कबुली देत आपल्या आयुष्याची ओळख करून देणार्या नारायण गंगाराम सुर्वे यांना तरी कुठे ठावूक होतं की आपण इतके 'ग्रेट' होऊ. गिरणी कामगार ते शाळेतला शिपाई आणि त्या शिपायापासून शिक्षक अशी स्थित्यंतरे जीवनात आलेल्या नारायणच्या कविता अनेक प्रस्थापितांनी धुडकावून लावल्या होत्या. जीवनातल्या प्रत्येक स्थित्यंतरात तो आजूबाजूचा माणूस वाचायचा प्रयत्न करीत होता. कधी त्याला डोंगरावर शेत असलेल्या आणि डोक्यावर कवळाचा भारा घेऊन जाणारी कातकरी बाई दिसली तर कधी मास्तरांना त्यांचंच नाव आपल्या पोराच्या बापाच्या जागी लिहिण्याची गळ घालणारी पण मुलाला मोठं करण्याची, चार बुकं शिकविण्याची जिद्द उराशी बाळगणारी शरीरविक्रय करणारी महिला भेटली. कधी त्याला विदेशात पैसा कमविण्यासाठी गेलेल्या आपल्या धन्याला 'तेव्हढं पत्रात लिवा' सांगून त्याचा आपल्यावर असणारा विश्वास सार्थ ठरविणारी गृहिणीही भेटली. स्वतः केवळ व्ह. फा. म्हणजेच व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकलेल्या कवीच्या कविता विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतात हा चमत्कार केवळ नारायण सुर्वे यांच्याच बाबतीत घडू शकतो. जीवनातील असा चमत्कार सुर्वे यांच्या आयुष्यात नेहमीच घडत आला आहे. 'डोंगरी शेत माझं गं' हे काव्य त्यांनी लिहिले खरे पण या काव्याचा जनक तेच आहेत हे सार्या महाराष्ट्राला कळण्यासाठी बराच काळ जावा लागला. डाव्या चळवळीमध्ये शाहीर अमरशेख यांनी हे गाणं जेव्हा ओठात खेळवलं आणि त्यांच्या कलापथकातील सुबल सरकार यांनी ते नृत्याद्वारे सादर केले तेव्हा नारायण सुर्वे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. त्या काळी गाजलेल्या या गाण्यावर जेव्हा ध्वनिमुद्रिका निघाली तेव्हा अनेक प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या. अर्थात सुर्वे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हादेखील याचीच पुनरावृत्ती झाली होती आणि तोही चमत्कार त्यांनी अनुभवला आहे. त्यांचे समकालीन असणार्या एका ज्येष्ठ नाटककाराने सांगितलेली आठवण अशी की, नारायण सुर्वे तेव्हा आपल्या कविता घेऊन प्रस्थापितांकडे जात असत, तेव्हा त्यांच्या अपुर्या शिक्षणाकडे आणि साध्या राहणीमानामुळे नाक मुरडणार्यांची संख्या काही कमी नव्हती. कै. विनायक भावे यांच्याकडेही सुर्वे अनेकदा आपल्या कविता घेऊन येत असत, पण मानवी स्वभाव कधीही न वाचलेल्या आणि इतरांच्या लिखाणाचे अनुकरण करण्यातच धन्यता मानणार्या भाव्यांना सुर्वे यांची कविता म्हणजे उघड्या गटारातील घाण वाटायची. भावे तेथेच राहिले आणि सुर्वे यांची कविता मोठी झाली, असे त्या नाटककाराचे म्हणणे आहे. सुर्वे यांनी प्रस्थापितांशी दोन हात केले ते आपल्या कवितेच्या माध्यमातून. त्याकाळी कविता ही केवळ कल्पनेवरच असायची त्याला सुर्वे यांनी छेद दिला. मर्ढेकरांना उद्देशून त्यांनी लिहिलेल्या कवितेमधून त्यांनी या कल्पनाविष्काराला छेद दिला. प्रस्थापितांच्या घरी आणि त्यांच्या मेळाव्यात जाऊन आपली कविता सादर करण्याचे धार्ष्ट्य त्यांनी दाखविले. सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला अभिनव प्रकाशन या डाव्या चळवळीशी संबंधित असलेल्या प्रकाशन संस्थेने. 'ऐसा गा मी ब्रह्म' या पुस्तकासाठी त्यांच्या हितचिंतकांनी वर्गणी जमवून अभिनवच्या वा. वि. भट यांना प्रकाशनासाठी लागणारे पैसे दिले. हाही या प्रांतातला एक चमत्कार म्हणावा लागेल. अर्थात कवी म्हणून मान्यता मिळाल्यावर सुर्वे यांनी प्रस्थापितांच्या अन्य प्रकाशन संस्थांकडे आपली दुसरी पुस्तके सोपवली हा भाग व्यवहाराचा झाला. सुर्वे यांचे बालपण ज्या वस्तीत गेले ती वस्ती, तो गिरणगाव आता नामशेष झाला आहे. त्यांची कविता ज्या संस्कृतीशी जोडली गेली ती संस्कृतीही हळूहळू लोप पावू लागली आहे. 'मी कामगार आहे, एक तळपती तलवार आहे,' असे सांगणार्या सुर्वे यांनी मुंबईच्या गिरणीची लावणी पेश करून गिरणी कामगाराच्या जीवनाचा क्रम सादर केला आहे. मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात व्यग्र असलेल्या चाकरमान्याची व्यथा 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड सादर करून कष्टकर्यांचे जीवन स्वतः जगलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मांडली तर कळू लागल्यापासून धागा कसा धरायचा आणि बॉबीन कशी भरायची हे शिकलेल्या नारायण सुर्वे यांनी 'सात वाजता सकाळी, भोंगा वाजवी भूपाळी' ही लावणी सादर करून गिरणगावाचे यथार्थ दर्शन घडविले आहे. आजही अनेक वयोवृध्द गिरणी कामगारांच्या ओठावर ही लावणी आपसूक येते आणि त्यांचे पाण्याने भरलेले डोळे बंद गिरण्यांच्या दाराकडे वळतात. आता भोंगा बंद झाला आणि कामगारांच्या पाळ्यादेखील बंद पडल्या पण सुर्वे यांची ही लावणी इतिहासात गाजून गेली. याच गिरणीच्या आयुष्यात त्यांना त्यांची जीवनसाथी मिळाली आणि तिथेच त्यांना मार्क्सही भेटला. 'असाच एकदा मोर्चात मार्क्स मला भेटला' असे सांगत आपण कम्युनिस्ट चळवळीशी कसे बांधले गेलो याचे वर्णन करणार्या सुर्वे यांना याच कम्युनिस्ट चळवळीने सांस्कृतिक चळवळीची उपेक्षा केली याचे वैषम्य वाटते. या देशातील सांस्कृतिक जडणघडणीकडे कम्युनिस्ट चळवळीने म्हणावे तेव्हढे लक्ष दिले नाही अन्यथा नारायण सुर्वे यांच्यासारखे अनेक कवी-कलावंत आजही डावी चळवळ फोफावण्यासाठी धडपडले असते. त्यांच्या 'मार्क्स' कवितेत अखेरीस ते म्हणतात, 'मला गर्दीत पाहून मार्क्स म्हणाला काय कविता-बिविता करतोस वाटते. मलादेखील गटे आवडायचा.' या वाक्यातच चळवळीकडून होणारी सांस्कृतिक उपेक्षा लक्षात येते. सुर्वे यांच्या 'माझी आई' ही कवितादेखील अशीच नोंद घेणारी आहे. आपल्या जन्मदात्रीचा पत्ता माहीत नाही पण बेवारशी असलेल्या एका अनाथाला पोटच्या पोराच्या मायेने उराशी घेऊन नंतर त्याचा प्रतिपाळ करणार्या त्या मायेचे वर्णन करणारी कविता सुर्वे जेव्हा सादर करतात तेव्हा डोळ्यातून पाणी न येणारा हृदयशून्य माणूस सापडणे कठीण! शिक्षकाच्या भूमिकेत असतानाही केवळ मुलांवर पाठ्यपुस्तकी संस्कार करण्यापेक्षा त्यांना माणूस वाचायला लावणारे सुर्वे आपल्या जीवनाचे सार कशात आहे, हेही मुलांना शिकवितात तेव्हा त्यांच्यातील माणूस म्हणून असणार्या संवेदना मनाला भिडल्याखेरीज राहत नाहीत. | तुझ्या शिवाय जगण्याचा विचार आता करतो .... जीवन इथेच थांबलं बघ माझं आता मरन्याचा विचार करतोे ..... तुझ्या पासून दूर जाताना मन जड़ झाले होते चेहरा हसरा दाखवला तरी डोळे भरून आले होते ... |
हंबरून वासराले चाटती जवा गायं : नारायण सुर्वे Posted: 17 Aug 2010 07:33 AM PDT हंबरून वासराले चाटती जवा गायं : नारायण सुर्वे हंबरून वासराले चाटती जवा गायं तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. आया बाया सांगत व्हत्या,व्हतो जवा तान्हा दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा पीठामंदी…..पीठामंदी पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय.. तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. कण्या काट्या वेचायला मायं जाई रानी पायात नसे वाहन तिझ्या,फिरे अनवाणी काट्याकुट्या…रं काट्याकुट्या काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायं तवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं… दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनं बास झालं शिक्षाण आता,होऊदे हाती कामं आगं शिकूनं शानं…गं शिकूनं शानं शिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायं तवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बापं थरथर कापे अन् लागे तिले धापं कसा ह्याच्या…रं कसा ह्याच्या कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं तवा मले गायीमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी नं भरल्या डोळ्यान…नं भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान कवा पाहील दुधावरची सायं तवा मले सायीमंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं रे हंबरून वासरले…… गो म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जनम घ्यावा गं माये तुझ्या पोटी तुझ्या चरणी…गं तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुझं पायं तवा मले पायामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं रे हंबरून वासरले चाटती जवा गायं तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं.. | तुझ्या शिवाय जगण्याचा विचार आता करतो .... जीवन इथेच थांबलं बघ माझं आता मरन्याचा विचार करतोे ..... तुझ्या पासून दूर जाताना मन जड़ झाले होते चेहरा हसरा दाखवला तरी डोळे भरून आले होते ... |
सत्य :: नारायण सुर्वे Posted: 17 Aug 2010 07:30 AM PDT तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ; तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी . पलिकडे खड़खड़नारे कारखाने खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र काटे ओलांडित चालले प्रहर भावंडासह कोनाडा जवळ केला आईने घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.
तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ; तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ खपत होतो घरासाठीच ..... विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर तुझ्या खांद्यावर --- तटतटलीस उरी पोटी तनु मोहरली गोमटी एक कौतुक धडपडत आले ; घरभरले हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी वाकलीस खणानारळांनी .
तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ; तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .
'नारायणा' - गदगदला. 'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला . ' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा ' गांगरलो , भोवंडून स्थीर झालो . तीच्या ओठावर ओठ टेकवून बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री , तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच.. | तुझ्या शिवाय जगण्याचा विचार आता करतो .... जीवन इथेच थांबलं बघ माझं आता मरन्याचा विचार करतोे ..... तुझ्या पासून दूर जाताना मन जड़ झाले होते चेहरा हसरा दाखवला तरी डोळे भरून आले होते ... |
दोन दिवस : नारायण सुर्वे Posted: 17 Aug 2010 07:27 AM PDT दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।
| तुझ्या शिवाय जगण्याचा विचार आता करतो .... जीवन इथेच थांबलं बघ माझं आता मरन्याचा विचार करतोे ..... तुझ्या पासून दूर जाताना मन जड़ झाले होते चेहरा हसरा दाखवला तरी डोळे भरून आले होते ... |
मना सज्जना! Posted: 17 Aug 2010 07:09 AM PDT - डॉ. जोसेफ मर्फी
ज्यावेळी तुमच्यातील अंतर्मनाच्या शक्तीची जाणीव होईल, त्यावेळी तुम्हाला तुमचं जीवन अधिक बलशाली बनविता येईल. तुम्ही तुमच्या जीवनात अधिक चांगलं आरोग्य, अधिक संपत्ती, अधिक आनंद मिळवू शकाल. परंतु, तुम्हाला अंतर्मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा, हे शिकायला हवं... ................
जगात अनेकांच्या जीवनांत अद्भुत चमत्कार घडल्याचं आपण पाहतो. तुमच्या जीवनातही असे घडू शकते. अर्थात त्यासाठी तुम्हाला अंतर्मनातील शक्तीचा वापर करणं आवश्यक आहे.
तुम्ही आसपास जर बारकाईनं पहिलं तर, तुम्हाला असं दिसून येईल की, एक माणूस आनंदी आहे, तर दुसरा दु:खी. एकाची आथिर्क भरभराट होत आहे, तर दुसरा आथिर्क संकटात. एक चिंतेत आहे, तर दुसरा सर्वकाळ आनंदानं बागडत आहे. एखाद्याकडे सुंदर घर, तर दुसरा झोपडपट्टीत. एखादा असाध्य रोगाचा बळी, तर दुसरा निरोगी... अनेक विरोधाभास माणसामाणसांत तुम्हाला दिसेल. असे विरोधाभास दिसण्यामागे काही कारणं आहेत का? होय, त्यामागे कारणं आहेत. नव्हे, तुम्हीच त्याला कारणीभूत आहात! ही कारणं शोधण्यासाठी मनाचं दार उघडायला हवं. या दारातून तुम्ही डोकावताच आत दडून असलेली अमोल संपत्ती दिसायला लागेल. अनेकांना या संपत्तीची जाणीव नसते. त्यांना अंतर्मनात डोकावून बघण्यास वेळ नसतो. त्यामुळे ते अंतर्मनात डोकवायला तयार नसतात. परिणामी त्यांना जे काही हवं असतं, ते मिळत नाही. साधा लोखंडाचा तुकडा घ्या, त्यात चुंबकीय शक्तीचा अंतर्भाव करून पाहा. त्या छोट्या तुकड्याला किती बळ प्राप्त होतं, ते तुमच्या लक्षात येईल. लोहचुंबकाचा हा छोटा तुकडा स्वत:च्या वजनाच्या बारापट अधिक वजनाचं लोखंड सहज उचलू शकतो. त्या चुंबकीयशक्तीमुळे त्याला किती बळ आलेलं असतं. परंतु, त्या लोहचुंबकातून चुंबकीय शक्ती काढून टाका आणि काय होतं ते पाहा. त्याला एखाद्या पक्ष्याचं साधं पीसही उचलता येणार नाही. लोखंड आणि लोहचुंबकाप्रमाणे माणसांचेही दोन प्रकार. एकामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. त्या आत्मविश्वासाच्या बळावर तो कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतो. त्याला वाटतं, आपण यशासाठी, जिंकण्यासाठी जन्मलो आहोत. त्याच्यात जणू चुंबकीयशक्तीच सळसळत असते. दुसऱ्या प्रकारच्या माणसांमध्ये उत्साह नसतो. त्याच्यातील जणू चुंबकीय शक्ती काढून घेतलेली असते. ते नेहमी भीती, संशयानं पछाडलेले असतात. एखादी संधी त्याच्याकडे अगदी चालून आली तरी त्यांना त्या संधीचा लाभ उठवून घेण्यात भीती वाटते. मी अपयशी ठरलो तर, माझे पैसे बुडाले तर, लोक मला हसले तर, अशा अनेक शंका त्यांच्या मनात घोंघावतात. अशी माणसं जीवनात यशस्वी होत नाहीत. त्यांच्या मनातील भीतीमुळे ती पुढे येत नाहीत. आहेत तिथेच राहतात. जर एखाद्यानं तुम्हाला विचारलं, जगातील सर्वांत गहन रहस्याचं नाव काय? तुम्ही त्यावर काय उत्तर द्याल? अणुशक्ती? परग्रहांवरील प्रवास? अवकाशातील कृष्णविवरं? नाही, या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं, साधं आहे. हे उत्तर तुमच्यातच आहे. त्याचं उत्तर आहे, तुमचं अंतर्मन. होय, जगातील सर्वांत गहन रहस्य आपलं अंतर्मन आहे! तुम्हाला अंतर्मनातील शक्तीची जाणीव होईल, त्यावेळी तुम्हाला जीवन अधिक बलशाली बनविता येईल. तुम्ही जीवनात अधिक चांगलं आरोग्य, अधिक संपत्ती, अधिक आनंद मिळवू शकाल. ही शक्ती बाहेरून मिळवावी लागत नाही. ती तुमच्या शरीरातच आहे. परंतु, तिचा वापर कसा करायचा, हे शिकायला हवं. तुम्हाला त्याची एकदा समज आली की तिचा सहज वापर करता येईल. अंतर्मनाची शक्ती म्हणजेच इच्छाशक्ती. या शक्तीद्वारेच शारीरिक आणि आथिर्कदृष्ट्या दुबळे झालेले अनेक सबळ बनले आहेत. संकटांवर मात करून पुन्हा उभे राहिले आहेत. यालाच आपण चमत्कार म्हणतो. असा चमत्कार आपल्या जीवनात घडावा, असं वाटत असेल तर अंतर्मनातील शक्तीचा वापर करण्यास शिकलं पाहिजे. त्यासाठी काही तत्त्वं आहेत. या तत्त्वांची माहिती असणं आवश्यक आहे. जसं दोन भाग हैड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन म्हणजे त्यापासून पाणीच बनणार. हे पाणी सर्वांच्या जीवनाचा आधार बनतं. तर एक भाग ऑक्सिजन आणि एक भाग कार्बन यांच्यापासून कार्बन मोनोक्साइड हा विषारी वायूच बनेल, या वायूमुळे सर्वांचं जीवन धोक्यात येईल. हे निसर्गनियम आहेत. आपल्या अंतर्मनासाठीही नियम आहेत. मनाचा नियम किंवा श्रद्धेचा नियम असं त्यास म्हणू शकतो. तुमच्या मनात जसे विचार निर्माण होतात, त्यानुसार तुमचं अंतर्मन काम करतं. त्यानुसार तुम्हाला अनुभव येतात, घटना घडतात. तुमच्या विचारांच्या या सर्व प्रतिक्रिया तुमच्या अंतर्मनात उमटत असतात. ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता, त्या गोष्टीमुळे हे घडत नसतं तर तुमच्या स्वत:च्या मनात जो विश्वास होतो, त्यामुळे हे घडतं. तुम्ही चांगला, शुद्ध विचार करत जा, जीवनातील शाश्वत सत्यावर व गुणांवर विश्वास ठेवत जा, मनातील भीती काढून टाका, अंधश्रद्धा बाजूला सारून चांगल्या पवित्र श्रद्धा मनात बाळगा, योग्य प्रार्थना करा, तुम्हालाही चांगलं जीवन जगता येईल, तुमच्या जीवनातही चमत्कार घडेल! ..........................................................
अनुवाद : जॉन कोलासो | तुझ्या शिवाय जगण्याचा विचार आता करतो .... जीवन इथेच थांबलं बघ माझं आता मरन्याचा विचार करतोे ..... तुझ्या पासून दूर जाताना मन जड़ झाले होते चेहरा हसरा दाखवला तरी डोळे भरून आले होते ... |
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा Posted: 17 Aug 2010 07:08 AM PDT दोन मिनिटे नक्की द्या! शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा
शाळेने पत्रक काढलं, 'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!' आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की, अगदी एक विजार,एक सदरा असेल, तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती. तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची. मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं, "मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, "सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे." मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?" "सर.त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो, तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी." मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली.पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल?की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, "पाहिलंस!हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे..." उत्तर पत्रिकेचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो... अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही..! असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता! शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले. 'मयूर जाधव, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे." मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर,त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे !" एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही. दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... "सर,रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." "अरे,काय बोलतोयस तुला समजतय का?" "चुकतही असेन मी. वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!" त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा,डोळ्यातलं पाणी ...... मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....? "सर,मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे." त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती. "अरे पण....?" "सर, विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर,मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज." अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, "ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?" "सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी Second Hand वापरतोय... खरयं! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत. सर...सर, सांगा ना, मी गरीब कसा?" मयूर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं. "खरयं मयूर.पण तुला या पैशाने मदतच......." "सर,मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! " "म्हणजे?" "<span style="font-size: 13.5pt; color: rgb(47, 47, 47); font | |
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.