नमस्कार निलेश,
अतिशय सुरेख प्रयत्न आहे हा. या संकल्पास पक्षाकडूनही हार्दिक शुभेच्छा!
! कृपया पुढील महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष द्यावे.!
! मराठी शाळांना बंदी, इंग्रजी शाळांची चांदी!
महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांनी मराठीतून शिकू नये, वाचू नये, बोलू नये याचा कडेकोट बंदोबस्त राज्य शासन करत आहे. मराठी शाळांना परवानगी देण्यात येणार नाही. इंग्रजी शाळांना मात्र वर्षातून केंव्हाही प्रस्ताव पाठवला तरी परवानगी मिळेल... अशा प्रकारचे 'जी.आर.' / शासन निर्णय सरकार जाहीर करत आहे. महाराष्ट्रातच मराठी शाळा नाही चालवायच्या तर मग कुठे चालवायच्या? मराठी शाळांमधील विद्यार्थी, पालक, व शिक्षक या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. आपणही या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे व वर्तमानपत्रात लिहून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने या मराठी शाळांना नाकारणा-या सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध नोंदवावा.
नाशिक, पुणे येथे याबाबत निदर्शने झाली. यावेळी शाळा-शिक्षक-पालक- विद्यार्थी यांना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. आ. बाळा नांदगावकर यांनीही विधानसभेत मुख्यमंत्र्यांना याबाबतचा प्रश्न विचारला. पण सरकार थातूर-मातूर उत्तरे देत आहे व मराठीला नाकारण्याची भूमिका कायम ठेवत आहे. या प्रश्नांचे गांभीर्य व दूरगामी परिणाम लक्षात घेऊन प्रत्येक मराठी नागरिकाने याचा तीव्र निषेध करणे अत्यावश्यक आहे.
तसेच, प्रत्येकाने मराठी माध्यमाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
! पाणी वाचवा पाणी साठवा!
पाणी उपलब्धता व पुढील काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आत्तापासूनच पाण्याची बचत करावी तसेच पाणी साठवण्याच्या छोट्या मोठ्या योजना अमलात आणाव्यात.
सध्या राज्यात महागाई व भ्रष्टाचार वाढत आहे हे सरकारचे अपयश आहे. अशा सरकारला राज्यकर्ता म्हणून घेण्याचा काहीही आधिकार नाही. अशा निष्क्रिय सरकारचा जाहीर निषेध
धन्यवाद.
संकेतस्थळावरील इतर विभागांतील मजकूरही अवश्य वाचा.
जय महाराष्ट्र !
मनसे संकेतस्थळ प्रतिसाद कक्ष.
https://www.manase.org/Quoting निलेश पोटे <
nilesh_pote1980@yahoo.co.in>:
> नमस्कार मंडळी,
> "पुढारी" नावाच्या वर्तमानपत्रात एक छान बातमी छापून आलीय..
> कल्याणच्या "संकल्प" प्रतिष्ठानाने शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या नोटा चलनात याव्यात यासाठी लाखभर स्वाक्षर्याची मोहीम राबवली व
> ते निवेदन आपल्या मराठमोळ्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांना एका हजार रुपयाच्या नोटेच्या स्वरुपात दिले..
> ते देतानाचे एक छायाचित्र वर्तमानपत्रात आले आहे.. सोबत लिंक आहे जरूर पहावी...
> हे जर असे घडले तर पुन्हा "शिवराई" सुरु होईल....
> जसे जमेल तसे कोणाला काही सुचवून ह्या मोहिमेस हातभार लावता येयील का ? आपली मते कळवावीत. .. बघा सुचवा, कळवा ..
>
>
> moderator ... आपणास विनंती कि सोबत जोडलेली लिंक कृपया block करू नका ..सर्वाना निदान
> ती हजार रुपयाची महाराजांची प्रतिमा असलेली नोट पाहुद्या ...
>
>
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=124966&boxid=235716593&pgno=5&u_name=0>
> ॥ निलेश पोटे ॥
>
>
>
>
>
>
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.