Thursday, July 14, 2011

{ Marathi kavita } इस्लामी दहशतवाद मुंबईच्या छाताडावर नाचतो आहे

 

इस्लामी दहशतवाद मुंबईच्या छाताडावर नाचतो आहे


मुंबई पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरली आहे. रक्ताच्या लोटाने भिजली आहे. निरपराध्यांच्या करुण किंकाळ्यांनी थिजली आहे. दादरचा कबुतरखाना, गिरगावचा ऑपेरा हाऊस परिसर, झवेरी बाजारातील भीषण बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा जखमी आणि मृतांचे ढिगारेच पाडले. इस्लामी दहशतवाद मुंबईच्या छाताडावर नाचतो आहे आणि राज्यकर्ते जनतेला शांततेचे व संयमाचे आवाहन करीत आहेत.कालच्या हल्ल्यात जे मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना धीराने वागण्याचा संदेश देण्याच्या या पोपटपंचीने गेलेली माणसे परत येणार नाहीत. जे जखमी, कायमचे अपंग आणि जायबंदी झालेत त्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहता येणार नाही. तेव्हा कोणत्या धीराच्या गोष्टी आपण करीत आहोत.
मुंबईसारख्या शहरातील लोकांनी कसे जगायचे?
पावलोपावली धोका आहे.  गुलामांकडून जनतेच्या संरक्षणाची अपेक्षा ठेवता येत नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकांनी जेवढे रक्त सांडले नसेल त्याच्या कित्येक पट रक्त आज अतिरेक्यांच्या हल्ल्यात धो धो वाहताना दिसत आहे. निदान स्वातंत्र्यलढ्यातील रक्तातून ब्रिटिशांना 'चले जाव'चा संदेश तरी मिळाला व त्याच रक्ताने जो वन्ही चेतला त्यातून पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या. पण आज सामान्य निरपराधांचे रक्त का सांडत आहेत? ते बळी का जात आहेत? कोणामुळे जात आहेत?  हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यावर गोळ्या झाडणार्‍या अफझल गुरू आणि कसाबला फाशीची शिक्षा ठोठावूनही ते आजही जिवंत आहेत.
मतांच्या लाचारीसाठी मुस्लिमांचे झालेले लांगुलचालन हेच देशाच्या मुळावर आले आहे. आम्ही मुस्लिमद्वेष्टे नाही. आमच्या विचारांतही मुस्लिमद्वेष नाही. पण सरकारच्या मुस्लिम अनुनयाच्या धोरणांनीच आम्हाला मुस्लिमद्वेष्टे बनायला भाग पाडले. आताच्या कॉंग्रेस सरकारात मुस्लिम अनुनयाची एवढी घाण साचली आहे की, आमच्या तोंडातून आता जहरच बाहेर पडणार! .
         या राज्यात शाहिस्तेखानाची बोटे तोडायची नाहीत, अफझल खानाचा कोथळा काढायचा नाही! का, तर मुस्लिमांच्या भावना दुखवायच्या नाहीत म्हणून. पण हिंदूंच्या भावनांची दखल कोणी घ्यायची म्हटले तर त्याला धर्मनिरपेक्ष व एकात्मतेचा शत्रू ठरवून गुन्हेगार मानले जाते. तुमच्या त्या धर्मनिरपेक्षतेच्या चिंधड्या बुधवारी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर उडाल्या आहेत. दआमच्या देशात इस्लामी दहशतवाद्यांना कोण रसद पुरवत आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. इस्लामी दहशतवादी संघटनेने या देशातील भुसभुशीत जमिनीत असंख्य बिळे पाडून त्यात सापांची पैदास वाढवली आहे. या सापांचे विषारी फूत्कार देशाला खतम करीत आहेत. दुश्मन सीमापार नसून घरातच आहे. आधी घरातल्या सापांचे फणे ठेचा. त्यांना दूध पाजणे बंद करा व मगच परकीय हातांचा बंदोबस्त करा. मुंबई पुन: पुन्हा निरपराध्यांच्या रक्ताने भिजते आहे. या रक्ताच्या थेंबातून क्रांतीचा वणवा पेटल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत! नुसत्या श्रद्धांजल्या व पुष्पचक्रे वाहून काय होणार?

above article has taken from   http://www.saamana.com/
            


__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment