कॉंग्रेस आणी मिडीयाच्या जवानीचा घोटाळा
कालपासून महाराष्ट्रातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नागोबा 'शीला'च्या जवानीवर हलूडोलू लागले आहेत..
राजकारण्यांचे राहू द्या हो पण 'शीला की जवानी'मुळे 'मीडिया'सही अचानक जवानीचे भाले फुटले व हे भाले ते स्वत:लाचxxx मध्ये खुपसून घेत आहेत. खरे तर वृत्तपत्रांतील 'हिट हॉट' जाहिराती पाहिल्या की कोणत्याही सभ्य कुटुंबाला ओशाळल्यासारखेच वाटते. करून करून भागली आणि देवपूजेला लागली असाच सगळा प्रकार
अनेक वृत्तवाहिन्या आज 'शीला की जवानी'वर तुटून पडल्या. पण या वाहिन्यांवर अनेक 'हॉट' जाहिरातीही रोकडा पैसा घेऊन दाखवल्या जातात. जपानी ऑइलचे दोन थेंब टाकताच टोपलीत झोपलेला चॅनेलवाल्यांचा नागोबा फणा काढून कसा डोलू लागतो व त्यामुळे जवानीचा जोश कसा उसळून येतो ते पाहिले की कुटुंबाच्या माना खाली जातात. या मंडळींनी पूर्ण कपड्यांतील दोन गाण्यांना संस्कृतीच्या नावाखाली आक्षेप घ्यावा यासारखा दुसरा विनोद नाही.टीव्ही चॅनल्सवरील कार्यक्रमांत पांचट रंग उधळायाचेच धंदे जास्त.अगदी मसाजपासून इतर सर्व प्रकारच्या धंदेवाईक जाहिराती घेऊन संस्कृतीचे जे गोलपीठे निर्माण केले आहेत त्यांच्या कानांना शीला की जवानी व जलेबी बाईचे गाणे असह्य व्हावे हे ढोंग नाही तर काय!
'जलेबी बाई' किंवा 'शीला की जवानी'सारखी गाणी व्यासपीठावर वाजवून त्यावर कलावंतांनी नृत्याविष्कार केला. या गाण्यांमुळे म्हणे परंपरेस, संस्कृतीस काळिमा फासला. राष्ट्रवादीचे बछड्यांनी एकच टीकेचा सूर लावून विचारले, 'अबब! हे काय? पापम्! पापम्!! महापापम्...!!!' ' युवा सेनेच्या कार्यक्रमात दोन गाणी वाजवून त्यावर तरुणाईची पावले थोडी थिरकली तर कसले आले पाप आणि संस्कृतीचा र्हास?
संस्कृतीच्या गप्पा निदान कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या 'मुन्ना-मुन्नी'वाल्यांनी शिकवू नयेत.क्रिकेटच्या मैदानांवर अर्धनग्न चीअर्स गर्ल्स नाचवून पैशांचा पाऊस पाडणारे हे सर्व लोक. यांना चीअर गर्ल्स चालतात. मैदानांवर या चीअर गर्ल्स नाचू लागल्या की यांच्या तोंडास मैदानावरच पाणी सुटते .
अरे, पोरांनी दोन गाणी वाजवली असतील. तर बिघडले कुठे?अनेकदा सीमेवरील सैनिकांसाठी जे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात त्यातही अशा गाण्यांची फर्माइश असतेच व अशा ठसकेबाज गाण्यांमुळे 'सैनिक' कुचकामी होतो, बंदूक चालवायला विसरतो, युद्धावर जाण्यास नकार देतो असे घडत नाही. दोन क्षणांचा तो विरंगुळाच असतो.
चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट म्हणताना आम्हास संकोच वाटत नाही.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या जवानीचे घोटाळे तर एवढे आहेत की एक ग्रंथही अपुरा पडेल.
जलेबी खायला त्यांना दात नाहीत. मधुमेहाने शरीर पोखरले म्हणून गोड खाता येत नाही. गोवर्या स्मशानात गेल्या तरी माज कायम आहे. तो उतरवण्याचा जोश आणि जवानी फक्त शिवसेनेत आहे हे विसरू नये.
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.