राष्ट्रद्रोही प्रशांत भूषणला चोपला
प्रशांत भूषण हे पाकिस्तानचीच 'वकिली' करीत आहेत. या पाकिस्तानी वकिलास चोपल्याबद्दल बेगडी निधर्मीवाद्यांनी दु:खाचे उसासे का सोडावेत?
कश्मीरच्या बाबतीत इतके गंभीर विधान करूनही अण्णा त्यावर 'ब्र' काढीत नाहीत. भूषण यांना मारल्याचा निषेध होतो, पण भूषण यांनी देशाच्या अखंडतेविरोधात जे अतिरेकी विचार मांडून दहशतवादी संघटनांना बळ दिले त्यावर अण्णा नाहीत. कश्मीरच्या किंवा देशाच्या बाबतीत राष्ट्रद्रोही विचार मांडणे हा भूषण यांचा अतिरेक आहे व या अतिरेकावर हल्ला करून त्यांना वठणीवर आणणे ही क्रांती आहे. अण्णा रामलीलावरून बोलत होते, 'मशाल जलती रहनी चाहिए.' ते खरे आहे, पण त्याच मशालीने देशाच्या सार्वभौमत्वाला भस्मसात केले जाणार असेल तर कसे चालेल?
अण्णा हजारे यांचे ठीक आहे हो, पण त्यांच्या गोतावळ्याबाबत सगळा आनंदीआनंदच आहे. प्रशांत भूषण यांना काही प्रखर हिंदुत्ववादी तरुणांनी बेदम चोपले आहे. लाथाबुक्क्यांनी तुडविले. प्रशांत भूषण यांना हा प्रसाद मिळत असताना हे तरुण 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' अशा गर्जना करीत होते. प्रशांत भूषण यांना बराच मुका मार लागला आहे व त्यांच्या मुक्या माराचे मुके घेत अनेकांनी मारहाणीचा निषेध केला आहे.
प्रशांत भूषण यांना मारणारे कोण होते? ते तरुण म्हणजे कोणी चोर, लुटारू, गुंड नव्हते, ते प्रशांत भूषण यांच्या तिजोरीची लुटमार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या कचेरीत घुसले नव्हते, तर प्रशांत भूषण यांनी कश्मीरसंदर्भात जे बेताल व देशद्रोही वक्तव्य केले त्याचा जाब विचारण्यासाठी ते तेथे गेले व बहुधा हाथापाई झाली. प्रशांत भूषण यांचे तोंड अलीकडे भलतेच सुटले आहे. या महाशयांनी असे वक्तव्य केले की, 'कश्मीर खोर्यातून सैन्य तत्काळ हटवायला पाहिजे. लष्कर आणि बंदुकांच्या बळावर फार दिवस कश्मिरी जनतेस असे दाबून ठेवता येणार नाही.' याहीपेक्षा भयंकर विधान असे की, 'कश्मीरचे भविष्य ठरविण्यासाठी तेथे जनमत संग्रह करणे गरजेचे आहे.' या भूषण महाशयांनी ही जी देशद्रोही मुक्ताफळे उधळून देशाच्या दुश्मनांना बळ दिले त्याबद्दल त्यांच्यावर फुले उधळून त्यांचा सत्कार करावा असे कुणास वाटत असेल तर ते चूक आहे.
कश्मीरात सैन्य आहे म्हणून हिंदुस्थानचे एवढे तरी नियंत्रण आहे. हे सैन्यच काढून घेतले व तेथे ढिलाई केली तर कश्मीर हातचा गेलाच म्हणून समजा आणि कश्मीरचे भवितव्य ठरविण्यासाठी जनमत घेण्याची भाषा करणे म्हणजे जे पाकड्यांना हवे तेच बोलणे. पाकिस्तानही म्हणत आहे की, कश्मीरात जनमत घ्या. कारण कश्मीर खोर्यातून लाखो हिंदूंना पाकड्यांनी ठार केले किंवा परागंदा होण्यास भाग पाडले ते यासाठीच की उद्या हा जनमताचा प्रकार झालाच तर मतदानासाठी एकही हिंदू शिल्लक राहता कामा नये व तशी सर्व तजवीज पाकिस्तानने व तोयबा, अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांनी करून ठेवली आहे. त्यामुळे प्रशांत भूषण हे पेशाने वकील असले तरी पाकिस्तानचीच 'वकिली' ते करीत आहेत.
पाकिस्तानला कश्मीरचे पूर्ण इस्लामीकरण करायचे आहे व त्याच बळावर कश्मीर स्वतंत्र इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. कश्मीरात उरल्यासुरल्या हिंदूंना राहणे व जगणे मुश्कील झाले आहे. त्यांचे हालहाल होत आहेत. सतत मानहानी आणि छळ यामुळे हिंदूंनी पलायन केले व निर्वासितांच्या छावण्यांत ते राहात आहेत.
कश्मीरातील हिंदूंच्या यातनांवर ना 'टीम अण्णा' त्यांचे तोंड उचकटत ना तिस्ता सेटलवाड! कश्मीर हे हिंदुस्थानचे शिरकमल आहे. ते तोडण्याची भाषा मात्र प्रशांत भूषण करतात. याचा धिक्कार अण्णा हजारे यांनी केला नाही, पण भूषण यांच्या मारहाणीचा निषेध मात्र केला. देश तुटू द्या. कश्मीर स्वतंत्र राष्ट्र होऊ द्या, पण भूषण यांना मारणारे देशद्रोही आहेत असे कुणाला वाटत असेल तर ते देशाचे दुर्दैवच म्हणायला हवे.
पाकिस्तान कायमचा नष्ट व्हावा, पाकिस्तान संपल्याशिवाय हिंदुस्थानला सुख, चैन, शांतता मिळणार नाही, ही लोकभावना आहे. संपूर्ण हिंदुस्थानातील बॉम्बस्फोट, हिंसाचाराचे मूळ पाकिस्तान आहे व 'कश्मीर'चा तुकडा तोडून हिंदुस्थानची तिसरी फाळणी करण्याचे कारस्थान आहे. या कश्मीरप्रश्नी कोणतीही तडजोड स्वीकारू नये, अशी देशाची भावना असताना हे भूषण महाशय देशाच्या विरुद्ध भूमिका घेत पाकिस्तानच्या बांंगेत स्वत:चा सूर मिसळवतात. अण्णा हजारे यांना मध्यंतरी पाकिस्तानात जाण्याचा झटका आलाच होता व भूषण यांना पाकिस्तानसाठी कश्मीरवर पाणी सोडायचे आहे.__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.