Sunday, January 16, 2011

{http://www.kavyatarang.co.cc/} सारखा भास होतो

सारखा भास होतो
कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल..
----------------------------------------------------------------------
आठवणीचा पाउस आज
आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
हृदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....
जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रू हृदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....
हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....
नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालून, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....
अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावी मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझीच वाट पाहत, जळले हृदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.....



--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png
dont_print_emails.jpgकृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.