Monday, October 3, 2011

मराठी युवा // Fwd:



---------- Forwarded message ----------
From: madhuri gayawal <gayawal.madhuri@gmail.com>
Date: 2011/10/1
Subject:
To: sagar sawant <sagar.28june@gmail.com>, kavyatarang.marathikavita@gmail.com, Chets <risbud.chetan@gmail.com>, deepak khande <deepakkhande55@gmail.com>


समिधा
फुलं कोमेजली की त्यांचा
उपयोग नाही होत कुणाला
ना देवासाठी वाहायला
ना केसांमध्ये  मळायला...
मन कोमेजले की काय होते नक्की
फुलबाग पण नाही दिसत फुललेली
आणि चांदण्यांची रात्र
का वाटते जीवाला जाळणारी ....
मनाचं   तर काही कळतंच नाही
हलक्याशा धगीनेपण याचे
जळून जातात नाजूक  पापुद्रे
अगदी शब्दांनीही होरपळतात  मनाचे कोपरे ...
माहित नसते प्रेमातही असतो दाह
सुदंर सहवासानंतरही  असतो
जीवघेणा निराशेचा डोह आणि
 होमात समिधा होऊन जळणं ...
मनाचे काय सगळे सहन करते बिचारे
कैफियत त्याची कुणी ऐकणारे आहे?
चुकांना असते स्वतःच ते साक्षी
आणि स्वतःच भोगते शिक्षा होऊन आरोपी....
-माधुरी



--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

--
-----------------------
कलर्स टि व्ही वरील 'वीर शिवाजी' ह्या शिवचरित्रावर असलेल्या (आणि नावातच फसलेल्या) मालिकेत असे काही प्रसंग दाखवले जातायेत ज्यांच्या महाराजांच्या आयुष्याशी कवडी मोलाचाही संबंध नाहीये. केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने तयार केलेली हि मालिका महाराजांचे चुकीचे विचार पसरवत आहे. मार्केटिंग, टि आर पी, जाहिराती, बिझनेस अश्या शब्दांची शौर्य, स्वराज्य, गनिमी कावा, महाराज अश्या शब्दांवर घुसखोरी सहन करू नका. महाराजांचे खरे व अचूक विचार जगभरात पोहोचवावेत हाच मूळ उद्देश ह्या मालिकेने ठेवावा.
-----------------------
मराठी युवा ला आता भेट फेसबुक वर आणि मिळवा महाराष्ट्र अपडेट्स...
http://www.facebook.com/marathiyuva
---------------------
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान...
--
"मराठी युवा" Google Group मध्ये येण्यासाठी तुमच्या मित्रांना कळवा
http://groups.google.com/group/marathiyuva/subscribe

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.