Monday, September 19, 2011

Re: { Marathi kavita } बहतीं हवाँ सा था वों

 

Bahot Khub likha hai yaar aapne............
Na jane jite ji enhi baaton par dhyan dene ko man manjoor nahi hota......
Pan nakkich apan aplyatla he balpan japayla havey.........routine madhe harvat chalalela he apla aplyashich gutun jana aaj aplyala hava ahe...............Janiv karun dilyabaddal dhyanyavaad !!!!!!!!!!


From: Swanand Divashikar <swanand11may@gmail.com>
To: Kavyatarang@yahoogroups.com; marathi-vishwa@googlegroups.com
Sent: Mon, 5 September, 2011 12:51:54 PM
Subject: { Marathi kavita } बहतीं हवाँ सा था वों

 

The person you are with most in life is yourself and
if you don't like yourself you are always with somebody you don't like ! 


त्या दिवशी माझ्या पावणे तीन वर्षांच्या पुतण्याबरोबर - अमृतबरोबर - खेळत होतो. 
खेळ साधाच. गादीवर एक उशी ठेवली होती. अमृतने उभं राहून आणि मी ढोपरावर उभं राहून स्वतःला उशीवर झोकून द्यायचं. असं पडायचं की उशीवर नाक आपटायला पाहिजे. एकदा अमृत आपटायचा, एकदा मी. अमृत हसून हसून बेजार झाला होता. मलाही मजा येत होती. 
हा खेळ खेळताना एक गोष्ट लक्षात आली. 
अमृत स्वतःला बिंधास झोकून देत होता. उशीवर नाक आपटल्यावर हसत होता. मी काय करत होतो, मी स्वतःला झोकून द्यायचो. पण उशी जवळ यायच्या आत स्वतःचे दोन्ही हात उशीच्या बाजूला टेकवत होतो आणि तोंड 'बेमालुमपणे' एका बाजूला फिरवत गालावर आपटत होतो. तसं पाहिलं तर, मऊ मऊ उशीवर तोंड आपटून मी काही रक्तबंबाळ वगैरे होणार नव्हतो. पण कशाला रिस्क घ्या ! माझा conditioned मेंदू माझ्या शरीराला जणू हाच संदेश देत होता. साधं उशीवर पडताना आपला मेंदू इतकी काळजी घेतोय तर बाकी मोठे निर्णय घेताना वगैरे मेंदू स्वतःचा इन्शुरन्स काढत असेल ! 
यालाच 'एजिंग प्रोसेस' म्हणत असतील का
निसर्ग प्रत्येक माणसाकडून वय वाढल्याची ही किंमत मोजून घेत असेल का
आत्ता उशीवर नाक आपटून खिदळणारा अमृत काही वर्षांनी 'अनुभव कमावून' माझ्यासारखाच चाचपडत जगेल का
जगजीत सिंगच्या एका गज़ल मधील ओळी आठवल्या - 
लोग हर मोड़ पे रुकरुक के सम्हलते क्यूँ है, इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यूँ है ! 
पण काही माणसं याला अपवाद असतात. निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून ती माणसं मनाने 'लहान मुल'च राहतात. 
काय असेल याचं रहस्य ?.......... 
***********************************************
'उशीच्या खेळाला' आठवडा लोटला होता. 
ऑफिसमधून घरी चाललो होतो. मोबाईलवर रेडियो ऐकत होतो. 
'3 Idiots' मधलं माझं आवडतं गाणं लागलं होतं – 'बहतीं हवाँ सा था वों'... 
रेडियोवरचं गाणं संपलं. पुन्हा ऐकायचं म्हणून मोबाईल मध्ये स्टोअर केलेलं गाणं ऐकू लागलो. 
पुन्हा एकदा... पुन्हा एकदा... पुन्हा एकदा... पाच वेळा ऐकलं. 
स्वानंद किरकिरेचे शब्द आता डोक्यात घुमू लागले होते. 
.... आणि अचानक गाणं ऐकता ऐकता बंद झालेले माझे डोळे खाडकन उघडले. 
बहतीं हवाँ सा था वों
उडती पतंग सा था वो
कहाँ गया उसे धुन्ड़ो... 
मला असं वाटलं की प्रत्येक मोठया माणसाने स्वतःसाठी म्हणायचं हे गाणं आहे ! 

स्वानंद किरकिरे यांनी सिनेमासाठी हे गाणं लिहिलं आहे. सिनेमात त्याला एक विशिष्ट संदर्भही आहे. 
परंतु माझी खात्री आहे की हे गाणं लिहिताना स्वानंद यांना हाच अर्थ अभिप्रेत असेल की प्रत्येक माणसाने आपल्यात लपलेला 'रांचो' शोधावा आणि तो जपावा. 'कहाँ गया उसे धुन्ड़ो'... असं म्हणताना दुसऱ्या कुणाला शोधायचं नाहीये तर दुनियादारीच्या धबडग्यात हरवलेल्या 'स्वतःलाच' शोधायचं आहे. 

हे अख्खं गाणं कविता वाचावी तसं वाचा. ज्या माणसाला ते शोधत आहेत त्या माणसाचं वर्णन त्यात आहे. तो माणूस तसा होता आणि आम्ही असे आहोत. तो तसं करायचा आणि आम्ही असं करतो, वगैरे. त्या गीतातला "वो" म्हणजे 'पाच वर्षांचे तुम्ही' आहात. आणि "हम" म्हणजे 'आजचे तुम्ही' आहात. 
गाणं वाचा  प्रत्येक शब्द वाचता वाचता स्वतःला शोधा


बहतीं हवाँ सा था वों
उडती पतंग सा था वों
कहाँ गया उसे धुन्ड़ो.....

हम को तो राहें थी चलाती
वो ख़ुद अपनी राह बनाता
गिरता, सम्भलता
मस्ती में चलता था वों
हम को कल की फ़िक्र सताती
वो बस आज का जशन मनाता
हर लम्हे को खुलके जीता था वों

सुलगती धुप में छावोंके जैसा
रेगिस्तान में गावोंके जैसा
मन के घाव पे मरहम जैसा था वों 
हम सहमेसे रहते कुवेंमे
वो नदियांमे गोते लगाता
उल्टी धारा चीर के तैरता था वों
बादल आवारा था वों,
यार हमारा था वों

कहाँ गया?....उसे धुन्ड़ो.....!


--स्वानंद किरकिरे

भेटलात स्वतःला ? कसं वाटलं
प्रामाणिकपणे सांगा, 'मोठं' होण्याच्या नादात हातातून बरंच काही निसटून गेलं असं नाही वाटलं
लहान होतो तेव्हा किती 'प्युअर' होतो आपण ! शाळेची चार बुकं काय शिकलो आणि केवढी पुटं चढत गेली आपल्यावर ! 
आपल्यात लपलेला 'तो' कसा होता त्याचं वर्णन त्या गाण्यात आहेच. आणि आपण आता तसे उरलेलो नाही हेही एव्हाना आपल्याला कळले आहे. 
काळाची चाके मागे फिरवून पुन्हा लहान होणे आता शक्य नाही. लहानपणी आपल्या गाठीशी जितका मोकळा वेळ होता तो मिळणं तर आता बाप जन्मात शक्य नाही. मग प्रश्न उरतो, आपण करायचं काय ? जुन्या आठवणी काढून रडत बसायचं? आपल्या करत असलेल्या नोकरी धंद्याला नावं ठेवत ते 'फुरसत के रात दिन' आठवून झुरत बसायचं ? की आपल्या समोर वाढणाऱ्या लहान मुलांचा हेवा करत जगत राहायचं
मला विचाराल तर यातलं काहीही एक न करता आपल्याला पुन्हा लहान होता येईल ! 
या जादुई फॉर्म्युलाचं उत्तर एका वाक्यात दडलेलं आहे. 
आजपासुन 'स्वतःवर' प्रेम करायला शिकायचं ! 
मध्यंतरी एक सुंदर एसेमेस आला होता.. त्यातली एक ओळ खूप आवडली होती. – 
'ख़ुदही को फोन लगाओ, तो सारी लाईने व्यस्त है' ! 
आपण इतरांशी होणाऱ्या संवादात इतके बुडून गेलो आहोत की आपल्याला स्वतःशीच बोलायला वेळ नाही. 
कसं जडणार आपलं आपल्यावर प्रेम
'तुका म्हणे होय मनासी संवाद' सुरु झाला की तुम्हालाच पटू लागेल एक नवी ओळख, तुमची तुमच्याशीच. 
तुम्हाला उमगू लागेल की तुमचा खरा पिंड काय आहे, तुमची खरी स्वप्ने काय आहेत ते. 
एकदा ते उमगलं की अर्धी लढाई जिंकलीत म्हणून समजा.. मग I don't 'find' time ही नेहमीची एक्सक्युज नसेल. You will 'make' time for doing the things which you always loved to do or wanted to do. स्वतःचा अभिमान वाटेल अशा गोष्टी करून दिवस भरू लागला की 'वो बस 'आज' का जशन मनाता' ही ओळ तुम्ही अक्षरशः जगू लागाल ! 

एक सांगायचं राहिलं. गाण्याची एक प्रिंट-आउट घ्या. तुम्ही सर्वात मस्तीखोर दिसत असाल असा एक लहानपणीचा फोटो त्या गाण्याबरोबर  चिकटवा. तुमच्या ऑफिस डेस्कवर किंवा तुमच्या बेडरूम मधल्या भिंतीवर फोटो चिकटवलेला हा प्रिंट-आउट लावा. हा प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या 'ध्येया'ची सतत आठवण करून देत राहील!

एकदा का जगण्याचा असा 'रियाझ' सुरु झाला की या गाण्याचा खरा भावार्थ तुमच्यामध्ये 'इन-प्रिंट' होऊ लागेल आणि मग या 'प्रिंट-आउट' ची गरज भासणार नाही ! 

स्वानंद किरकिरे यांना या गाण्यासाठी जितके पुरस्कार मिळाले असतील त्यापेक्षा 'हा' पुरस्कार कितीतरी पटीने मोठा असेल !

__________________________________________________________________

 

 

Thanks & Regards

Swanand Divashikar

Software Engineer (Data Conversion & MaxSql)

First Insight Software Solutions (I) Pvt. Ltd

Email : swanandd@first-insight.com

Contact No :- (020) 25821890/91   Ext :-253

Website :- <http://www.first-insight.com>

 



 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
MARKETPLACE
A bad score is 598. A bad idea is not checking yours, at freecreditscore.com.

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.

.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.