Friday, September 16, 2011

Re: { Marathi kavita } मला शाळेत न्या ना

Nice poem.
Thank u.

On 8/20/11, Prithvi Kunjir <kunjirprithvi@yahoo.com> wrote:
> आमच्या मकरंद पंतांना सुचलेली आणि त्यांनी मग लिहून काढलेली हि एक कविता
>
> मला शाळेत न्या ना
> बाबा, मी आता मोठा झालो
> किलबिल वर्गातून बालवाडीत गेलो
> माझ्या इवल्या पाठीवर नवीन दप्तर द्या ना
> बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
>
> तुमची जुनीच स्कूटर परत नव्याने हसतेय
> पाव्हणं नवीन आहे म्हणून अलगद धक्के सोसतेय
> शाळेत नेताना मला पुढयात घ्या ना
> बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
>
> मी शाळेत पुन्हा एकदा 'नमस्ते बाssssई' म्हणीन
> मधल्या सुटीत रोज मुरांबा पोळी खाईन
> माझं 'ध्यान' पाहून तुम्ही खुदकन हसा ना
> बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
>
> ते खेळण्यांच दुकान अजूनही तिथेच आहे
> तिथले काका तसेच हसरे आणी प्रेमळ आहेत
> मी धावेन तिकडे, मला उचलून घ्या ना
>  बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
>
> घरचा अभ्यास मी अजूनही नाहीच केलाय
> शाबासकी म्हणून आईने धम्मकलाडू ही दिलाय
> ससा कासवाची कविता परत माझ्यासाठी गा ना
>  बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
>
> रिमझिम आठवणीत सरलेत दिनरात्र
> मुर्दाड बनलोय मी अन थकलीयेत तुमची गात्र
> ते आधारचं बोट पुन्हा हातात द्या ना
>  बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

--
Sent from my mobile device

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.