Tuesday, December 14, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} दृष्ट लागण्याजोगे सारे.....

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

जुळलेले नाते अतुट घडे जन्मजन्मांची भेट
घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
 
 

गीत - सुधीर मोघे
संगीत - अरुण पौडवाल
स्वर - अनुराधा पौडवाल,  सुरेश वाडकर
चित्रपट-माझं घर माझा संसार (१९८६)
 


--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.