Sunday, December 26, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} << अंगाई कन्येची >>


<< अंगाई कन्येची >>
कवी व संगीत: गोविंद देशमुख

मीट ना डोळे, माझ्या बाळे, का तू कुठे रमते !
मुली ग, झोप का, ना येते !! ० !!

टकमक, टकमक, कुठे पाहते !
चुळूमुळू सुळूसुळू, खेळ खेळते !
तू हसली तर, विश्व ही हसते, गोड किती दिसते !
मुली ग, झोप का, ना येते !! १ !!

तुरुतुरु, सुरुसुरु, पडत रांगणे !
लटपट, झटपट, झुलत चालणे !
गोड बोबडे, तुझे बोलणे, हृदयी ग भिड़ते !
मुली ग, झोप का, ना येते !! २ !!

तव निद्रेतच, रात्र लोटते !
निजली असता, तू देवी भासते !
नीज ना बाळे, गीत मी गाते, अंगाई गाते !
मुली ग, झोप का, ना येते !! ३ !!

होशील घरची, लाजवंती तू !
आचरणी हो, शीलवंती तू !
भाग्यवंती हिज, कर रे देवा, विनती मी करते !
मुली ग, झोप का, ना येते !! ४ !!


--

--
Animated-Walking-Monkey-Happy-New-Year-2011-Champagne-Bottle-01.gif
newyearglitter21.gif
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.