तेरा दुणे सव्वीस?
स्फोटांच्या तारखांचा पाढा
मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट व हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांनी निवडलेल्या तारखांमध्ये सूत्रबद्धता असल्याचे दिसते. विशेषत: १३ आणि २६ या आकड्यांभोवती या कारवाया फिरताना दिसतात. भारताच्या सार्वभौम संसदेवरील हल्ल्याची तारीख १३ डिसेंबर २००१ही होती, तर साऱ्या देशाला हादरवणारा मुंबईवरील दहशतवादी हल्ला २६ नोव्हेंबर २००८ रोजी झाला होता. २००८-०९ या वर्षभरात १३ मे रोजी जयपूर येथे, २६ जुलै रोजी अहमदाबाद येथे, १३ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर १३ फेब्रुवारी २००९ रोजी पुणे बॉम्बस्फोटांनी हादरले.
तारखांबरोबरच शुक्रवार, शनिवार आणि मंगळवार या तीन वारांना दहशतवाद्यांनी पसंती दिलेली दिसते. सर्व देशालाच दहशतवादाच्या खाईत लोटणारी १२ मार्च १९९३ रोजीची विध्वंसक स्फोटमालिका शुक्रवारी झाली होती. बेंगळुरू येथील स्फोट शुक्रवारीच झाले. २३ नोव्हेंबर २००७ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी, लखनौ, फैजाबाद येथील स्फोटमालिका आणि उत्तर प्रदेशातीलच रामपूर केंदीय रिर्झव्ह पोलीस शिबिरावर १ जानेवारी २००८ चा हल्ला या शुक्रवारच्याच घटना आहेत. अहमदाबादमधील २६ जुलैचे स्फोट, २९ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्लीत तीन ठिकाणी झालेले स्फोट, पुन्हा १३ नोव्हेंबर २००८ला दिल्लीतच झालेले ५ स्फोट हे सर्व शनिवारी झाले. ७ मार्च २००६ रोजीचे वाराणसी रेल्वेस्टेशन व संकटमोचन मंदिर येथील आणि त्याच वषीर् जुलैमध्ये मुंबईत झालेले रेल्वे बॉम्बस्फोट मंगळवारी झाले होते
· Recent Posts
- एसटी महागली
- ३५ टक्के बायकांना नव-याची मारहाण
- भारतातील वॉटरगेट
- अल्प मुदतीसाठी गुंतवणूक पर्याय
- ड्रायव्हिंग लायसन्स मराठीत अशक्य
- अॅन्ड्रॉइड आणि जावा
- मोबाईलचे हाय फंडू पर्याय
- 'मनी' ऑर्डर करा मोबाइलवरून
- मोबाइलम् धनसंपंदा
- 'शीलाच्या आयचा घो… मुन्नीच्या नानाची टांग'
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.