ती एक कळी उमलणारी
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार

कृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.
दवबिंदू सोबत हसणारी,
मधुलिकांना खुणावणारी,
भ्रमरांना भुलवणारी,
हृदयी स्वप्न रंगवून
वाऱ्यावर झुलणारी.
ती एक कळी उमलणारी....
क्षणात रुसणारी,
क्षणात हसणारी
स्वच्छंदे जगू पाहणारी,
रिमझिम पावसात चिंब भिजणारी,
ती अवखळ, ती खोडकर,
ती निरागसं , ती सुंदर,
ती एक कळी उमलणारी....
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.