Thursday, January 6, 2011

{http://www.kavyatarang.co.cc/} ऐ बघ ना मी आता आलोय..

ऐ बघ ना मी आता आलोय..

तुझ्याच प्रेमात मी पूर्णपणे न्हालोय
माझी चुक झाली तुला नाही ओळखू शकलो
तुझ्या मनातील प्रेम मी नाही जाणू शकलो..

अग वेडे किती प्रेम केलेस तू माझ्यावर ..??
त्या प्रेमावर मी खरा नाही उतरु शकलो.
नेहमी माझ्या मागे पुढे फिरालिस,
एक कवच बनुन तू माझ्या पुढ्यात रहिलिस,
प्रत्येक अड़चणिंमध्ये माझ्या सोबत रहिलिस.

तुला मी माझे सर्व सुख दुःख सांगितले,
पण तुला कधीच काही नाही विचारले.
स्वताच्या दुखांना तू लांबच ठेवलेस
माझे दुःख तू स्वताचे समजलेस
स्व दुःख सोडून तू माझ्या सुखात शामिल झालीस
माझ्यासोबत आनंदात बेधुंद रहिलिस ..

मी दुसऱ्या मुलीच्या पाठी फेऱ्या मारत होतो,
तुला आपली एक ख़ास मैत्रिण मानत होतो.
हे सर्व काही तू जाणत होतीस..
मग का ग..?? का तू असे केलेस..??
तुझ्या मनातील माझ्या प्रेमाला का तू लपवलेस?
एकदा तरी मला का नाही सांगुन बघितलेस..??

मी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर
का तू असे हे वेगले पाउल उचललेस..???
माझ्या सुखाची तुला एवढी कलाजी होती ना ग,
मग तुला आता काही झाल तर मी राहीन का ग..??
बघ आता मला माझी चुक समजली आहे,
तुझ्या मैत्रीमध्येच खरे प्रेम दडलेले आहे.
मग का तू अशी निजपत पडली आहेस,
मला माहित आहे तू खूप रडली आहेस.

तुला मी नेहमी यापुढे खुश ठेवीन
तुझ्या सुख दुखाना मी आपल मनिन
आता एकदातरी डोळे उघडून बघ ना
उठून लगेच माझ्या कुशीत येउन बघ ना.
मला आता तरी माफ़ कर ना ...

ऐ बघ ना मी आता आलोय..
तुझ्या अन तुझ्याच प्रेमात मी पूर्णपणे न्हालोय...:( :(
--



--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png
dont_print_emails.jpgकृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.