मी आपल्या गल्लीचा दादा,
ती माझ्या ह्रदयाची राणी...
व्हॅलेंटाईन ला तिला एकIने छेडलं,
व्हॅलेंटाईन ला तिला एकIने छेडलं,
अन् गल्लीत सुरु झाली आणा-बाणी...
मी त्याला धू-धू-धुतला,
त्याचा माज सारा काढून टाकला...
ती हळूच गॅलरीत आली,
खांबाआड लपून बसली...
अन् माझ्याशी नजर भिडता,
ती गालात खुदकन हसली...
झाली माझी कॉलर 'टाईट',
अंगी इश्काचं भिनलयं वारं...
तिचं रोज-रोज गॅलरीत दिसणं,
मला वाटू लागलं आहे प्यारं...
एकदा गाठलं तिला मी जिन्यात,
तशी लाजून लाल-लाल झाली...
चावली बोटं तिनं दातांनी,
अन् डोळे झुकवले खाली...
मी ठसक्यात हात तिचा धरला,
डायरेक्ट मागणी तिला घातली...
ती हळूच हो म्हणाली आणि,
पोरगी पटली रे पटली...
पोऽऽरगीऽऽऽऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽ रेऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽऽऽ!!!!!
--
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.