Sunday, January 16, 2011

{http://www.kavyatarang.co.cc/} गुलदस्ता: मिश्किल संवादांची फोडणी

 


मिश्किल संवादांची फोडणी Bookmark and Share
Print E-mail
सुनील नांदगावकर - रविवार, १६ जानेवारी २०११
sunil.nandgaokar@expressindia.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it .
एखादी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची हुरहुर लागली असेल आणि त्याबद्दल माहिती मिळत नसेल आणि पुढे काय होणार याचा अंदाज येत नसेल तर ती बाब अजून गुलदस्त्यातच आहे असे म्हटले जाते. शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या 'गुलदस्ता' या नव्या मराठी चित्रपटात ही गुलदस्त्यातली गोष्ट काय आहे ते जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहात जायला हरकत नाही. सहज संवादात होणाऱ्या परंतु मार्मिक कोटय़ा आणि खटकेबाज संवादाच्या फोडणीमुळे हा चित्रपट पाहणीय ठरलाय.
द्राक्ष बायागतदार आणि वायनरीच्या मालकाचा मुलगा राजवर्धन चौगुले (मकरंद अनासपुरे) आणि त्याचा पत्रकार मित्र जितू देसाई (जितेंद्र जोशी) या दोन मित्रांची ही गोष्ट. जितू देसाई हा ओन्ली फॉर यू नावाच्या वृत्तवाहिनीचा वार्ताहर आहे आणि मॉडेल जान्हवी देशमुख हिची मुलाखत मिळविण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु, जान्हवी देशमुख (तेजस्विनी लोणारी) त्याला फारशी किंमत देत नाही. ती मुलाखत देत नाही म्हणून चळवळ्या पत्रकार असलेला जितू तिच्या बंगल्याबाहेरच ठाण मांडून बसतो. मग त्याचा पिच्छा सोडविण्यासाठी जान्हवी त्याला मुलाखत देते. कायम स्वप्नरंजनात रमणारा जितू आता जान्हवीची स्वप्नं बघू लागतो. राजवर्धनचे लग्नाचे वय उलटून गेले तरी सोज्वळ सूनच हवी या हट्टापायी त्याचे लग्न होत नाहीय. सून पसंत करण्यावरून राजवर्धनच्या आई-वडिलांची रोज भांडणे सुरू असतात. या भांडणांमुळे तो भंडावून गेलाय. आपल्याला आवडेल त्याच मुलीशी आपण लग्न करू असे तो सांगून टाकतो.
एकदा शहरात सगळीकडे मॉडेल जान्हवीची जाहिरातीची पोस्टर्स झळकतात. ती पोस्टर्स पाहून हिच्याशीच लग्न करण्याचे राजवर्धन ठरवतो आणि तिची माहिती काढण्यासाठी जितूला सांगतो. त्यामुळे राजवर्धन व जितू एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतात. मग दोघांमध्ये चढाओढ सुरू होते. गैरसमज आणि संशय यातून निर्माण होणाऱ्या गोंधळातून होणारे विनोद आणि मिश्किल, चुरचुरीत संवाद यामुळे चित्रपट हलकाफुलका विनोदी झालाय. दिग्दर्शकाएवढेच चुरचुरीत संवादाच्या फोडणीमुळे 'गुलदस्ता' हा पाहणीय चित्रपट बनला आहे.
दिग्दर्शक हेमंत देवधर यांच्याबरोबरच अरविंद जगताप यांच्या लेखनामुळे चित्रपटाची भट्टी उत्तम जमलीय. मॉडेल जान्हवी देशमुख ही व्यक्तिरेखा साकरणारी नवोदित अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिची मराठी चित्रपटातील ही पहिलीच भूमिका असून, संवादफेक करण्याची पद्धत सोडली तर मॉडेल म्हणून ती पडद्यावर चांगल्या प्रकारे वावरली आहे.
विनोदवीर अशी ख्याती असलेला मकरंद अनासपुरेने रंगविलेला बागायतदार फर्मास आणि जितेंद्र जोशीनेही  ब्रेकिंग न्यूजसाठी वाट्टेल ते करणाऱ्या न्यूज चॅनेलच्या पत्रकाराची भूमिका उत्तम साकारली आहे. न्यूज चॅनेलवाल्यांना ब्रेकिंग न्यूज देण्याची किती घाई असते, त्यासाठी ते कशा प्रकारे वागतात, याचीही झलक जितेंद्र जोशीने आपल्या हालचालींतून चांगल्या प्रकारे दाखवून दिली आहे. काहीही विचारले की 'गुरूजी असे म्हणतात.. ' या पालुपदाने सुरुवात करणाऱ्या जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेतील उदय टिकेकर लक्षात राहतो. एकंदरीतच आजच्या काळात बाबा-बुवांच्या कच्छपी लागलेल्या अनेक लोकांचे या भूमिकेद्वारे चित्रण करण्याचा प्रयत्न लेखकाने चांगला केला आहे. 'गुरूजी असे म्हणातात.. ' असे उदय टिकेकर संबंध चित्रपटात जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा विशिष्ट ठेका वाजतो. त्यामुळे सहजपणे विनोदनिर्मिती होते. याचा चांगल्याप्रकारे लेखक-दिग्दर्शकाने उपयोग करून घेतलाय. न्यूज चॅनेल्स ब्रेकिंग न्यूजसाठी किती टोकाच्या गोष्टी करतात हे प्रेक्षकांना माहिती असले, तरी त्याचा पटकथेत उत्तम पद्धतीने वापर केलाय. एकुणात फूल टाइमपास विनोदी असलेला 'गुलदस्ता' एकदा पाहायला हरकत नाही.
झी टॉकीज प्रस्तुत
गुलदस्ता
कार्यकारी निर्माते : नीलिमा लोणार, संजय ठुबे
दिग्दर्शक : हेमंत देवधर
कथा-पटकथा-संवाद : अरविंद जगताप
संकलन : विजय खोचीकर
छायालेखन : सुरेश सुवर्णा
संगीत : त्यागराज खाडिलकर
कलाकार : मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, तेजस्विनी लोणारी, उदय टिकेकर, मेधा भागवत, सागर तळाशीकर, मंगेश सातपुते, परी तेलंग, विशाखा सुभेदार, सयाजी शिंदे व अन्य.

-- 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Find useful articles and helpful tips on living with Fibromyalgia. Visit the Fibromyalgia Zone today!

.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.