Tuesday, January 4, 2011

{http://www.kavyatarang.co.cc/} सुविचार

सुविचार 

१) भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

२) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.

३ ) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

४ ) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

५ ) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.

६ ) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.

७ ) जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

८ ) आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

९ ) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !

१० ) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.

११ ) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

१२ ) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.

१३ ) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.

१४ ) आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

१५ ) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.




--
Animated-Walking-Monkey-Happy-New-Year-2011-Champagne-Bottle-01.gif
newyearglitter21.gif
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.