Saturday, October 16, 2010

*दूर कुठे क्षितिजावरती
सुर्य तो कलंडला,
नभी तारकांनी डाव
त्यांचा मांडला ,
मनात आठवणींचा पारिजात आज बहरला
हवी होतीस सखे आज तू सोबतीला ……..*

*गारव्याचा कृष्णरंगी शालू
रजनी तनु ल्याली ,
शरदाच्या शीतल चांदण्यात
वसुधा आज न्हाली ,
आस तुझीच या शांत मधुर रात्रीला
हवी होतीस सखे आज तू सोबतीला ……..*

*काळी उमलली कन्हेरीची
लाजून लाल रंगली ,
लाली तुझ्या ओठांची
बहुधा तिने चोरली ,
हक्क तुझ्यावर कळीचा मी पामर मुकलो स्पर्शाला
हवी होतीस सखे आज तू सोबतीला ……..*

*रेखिले मी नभी तुझे
रूप सुंदर देखणे,
गोडवा तुझ्या हास्यातला
उजळून टाकी चांदणे ,
पाहुनी ते चित्र गोजिरे तो शुक्रतारा लाजला
हवी होतीस सखे आज तू सोबतीला ……..*

*इच्छा खूप झाली
तुला पाहण्याची,
पण भिंत आडवी आली
तेथे दुराव्याची ,
स्वप्नात तरी दिसशील तू म्हणून डोके ठेवतो उशाला
हवी होतीस सखे आज तू सोबतीला ……..*

*ऐकू येईल मला कधी
नाद तुझ्या पैंजणांचा,
येईल कधी योग तो
तुला डोळेभरून पाहण्याचा,
विनवितो ऋषिकेश तुला हा "आज " "उद्या " नको यायला
हवी होतीस सखे आज तू सोबतीला ……..*

*-- http://www.picscrazy.com/image/AnushkaShetty10790.jpg,
शशी गराडे

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "मी मराठी....mee marathi." group.
To post to this group, send email to meemarathi@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to meemarathi+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/meemarathi?hl=mr.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.