"याहु" च्या एका ग्रूप मधे वाचण्यात आलेली एक छान लिखान . बघा आवडते का !!७.१२ च्या लोकल ची मुद्दामहून विंडो सीट पकड. घरी जायची ओढ असेल, पण तू घाई करू नकोस. वी.टी ते ठाणे जरा ट्रॅक च्या बाजूची बकाल झोपडपट्टी बघ, बघ 'राज साहेबांची' आठवण येते का? दरम्यान जरा डब्यातले संवाद ऐक, सगळे हिंदीतून बोलत असतील. तुझे मित्र,सगे, आप्त् पण. त्याला आक्षेप घे. तुझ्या समोर बसलेला उर्मट भैय्या तुझी खिल्ली उडवेल आणि सारा डब्बा तुझ्यावर फिदी फिदी हसेल. तेव्हा तुझ्या हाताच्या आवळलेल्या मुठी कडे बघ बघ 'राजसाहेबांची' आठवण येते का? ठाणे स्टेशन ला उतर, थोडा १ नंबर वरुन बाहेर ये रस्त्याच्या कडेला, फूटपाथ वर अनेक सी.डी चे स्टॉल दिसतील साहजिकच ते भैय्यांचे असतील. त्यातल्या त्यात जरा व्यवस्थित दिसणार्या भैय्या कडे जा, हळू आवाजात त्याला विचार ब्लू प्रिंट आहे का? तो बिनधास्तपणे मोठ्याने बोलेल, "साब अंग्रेजी दु के देसी? मराठी वाली लाने का भी सोच रहे है" तुझ्या तोंडात शिवी येईल, पण बाहेर पडणार नाही. बाहेर पडायची असेल तर……………………. बघ राज साहेबांची आठवण येते का? तिथे तुला एक तरुण दिसेल, फुटपाठवरच्या फेरीवल्याना न्याहाळताना. त्याच्या जवळ जा, त्याला विचार,"मित्रा काय झाल?" हो! हो तो मराठीत बोलेल, "काल शर्ट विकत घेतला ब्रॅण्डेड म्हणून पण फटका निघाला." फेरीवाल्याला शोधायचा प्रयत्न करू नकोस. त्याला घरी जायला सांग,तू पण निघ. पण निघण्या आधी त्या तुटपुंजया पगार घेणार्या मराठी तरुणाच्या डोळ्यात बघायला विसरू नकोस बघ, बघ 'राजसाहेबांची' आठवण येते का? सुन्न डोक्याने घरी जा, उशीर झाला म्हणून बायको आधीच चिंतेत असेल. फ्रेश हो, जेवण कर.टी.वी बघायची ईछा नसेलच. बायकोला जरा जवळ घे,तिची चौकशी कर. प्रॉब्लेम्स ती स्वतःच सांगेल. आता ती तुझ्या केसात हळूवार बोट फिरवेल म्हणेल, येत्या खर्चाला १००० रुपये जास्त देशील का? दूध वाला भैय्या, भाजी वाला भैय्या, इस्त्रि वाला भैय्या, वॉचमन भैय्या, लिफ्ट वाला भैय्या, झालच तर मूलाना शाळेत सोडणारा रिक्षा वाला भैय्या यानी जरा पैसे वाढवलेत. ती तुझी परिस्तिथि समजेल ताबडतोब ती चेहरा फिरवून निघून जाईल. तिच्या पाठमोरया आकृती कडे बघ, म्हण "हो १००० काय २००० देतो" पण तिला सांगू नकोस तुझ प्रमोशन आहे ते. तिच्या त्या भैय्या खर्चा कडे बघ. बघ 'राजसाहेबांची' आठवण येते का? आज तू खुश असशिल आज तुझ प्रमोशन असेल. किती वाढणार याची आकडेमोड काळ झोपेतच झाली असेल. ठरल्या प्रमाणे सर्व काही होईल, एक एक करता तुझा नंबर येईल. बॉस तुला लेटर देईल , ते नीट बघ! प्रमोशन चे नाही 'टर्मिनेशन' चे असेल ते. त्याला काही विचारू नकोस,उलट तोच सांगेल. "MR पाटील आता आम्हाला MR सिंह भेटलाय, तुमच्या पेक्षा जास्त वेळ थांबणारा, आणि तो ही अर्ध्या पगारात. मराठी येत नाही म्हणून काय झाल? हिंदी 'न चुका' करता येत" काही बोलू नकोस, तुझ्या समोर बॉस चा टेबल असेल. त्याच्या वर एक पपेरवेट ठेवला असेल. त्याच्या कडे निरखून बघ बघ,बघ 'राजसाहेबांची ' आठवण येते का? |
काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita
Monday, June 14, 2010
{http://www.kavyatarang.co.cc/} बघ ‘राजसाहेबांची ‘ आठवण येते का?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.