- संगणक किंवा मोबाईलच्या साह्याने माहितीची देवाणघेवाण करून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना सायबर गुन्हे असे म्हणता येईल.
भारतातील पहिला गुन्हा कधी आणि कोठे घडला? - देशातील पहिला सायबर गुन्हा जुलै 2003 मध्ये उघडकीस आला. तो "नायजेरिया 419' गैरव्यवहार नावाने ओळखला जातो. कोलकता येथील उद्योगपती पीयूष कांकरिया यांना बेनीनमधील एका बॅंकेचा संचालक असल्याची बतावणी करून बेन किम नावाच्या माणसाने आणि त्याच्या टोळीतील अन्य काही जणांनी फसविले. या गुन्ह्यात कांकरिया यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हावडा पोलिस ठाण्यात एक ऑगस्ट 2003 रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
सायबर गुन्ह्यांचे महत्त्वाचे प्रकार
- संगणक किंवा मोबाईलवरील अश्लील क्लिप - संगणक, इंटरनेट, मोबाईल यावर अश्लील दृश्ये, छोट्या क्लिप अपडेट करून त्याचा प्रसार करण्यात येतो.
- इंटरनेटच्या माध्यमातून बेकायदा वस्तुविक्री - अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि वन्य जीवांची कातडी इंटरनेटच्या माध्यमातून विकण्याचे प्रकार केले जातात. हे गुन्हे या प्रकारात मोडतात.
- ऑनलाइन सट्टा - परदेशातील सर्व्हरच्या साह्याने ऑनलाइन सट्टा खेळणारी हजारो संकेतस्थळे भारतात आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून हवाला व्यवहार, पैशांची अफरातफर हे याचेच काही प्रकार आहेत.
- स्वामित्व हक्क - यामध्ये बनावट सॉफ्टवेअरची निर्मिती व विक्री, संगणकावरील माहितीची चोरी यासह स्वामित्व हक्क कायद्याचा भंग, या सर्वाचा समावेश करता येईल.
- ई-मेल हॅक - एखाद्याचा ई-मेल हॅक करून त्यावरून संबंधित ई-मेलच्या संपर्क यादीतील लोकांना ई-मेल केले जातात. बऱ्याच वेळा अशा ई-मेलमधून पैशांचीही मागणी केली जाऊ शकते. काही वेळा ई-मेलच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची बदनामी करण्यात येते.
- बनावट नोटा किंवा प्रमाणपत्र निर्मिती - संगणक, स्कॅनर आणि प्रिंटरच्या साह्याने बऱ्याच वेळा बनावट नोटा, शालेय गुणपत्रके, स्टॅम्प यांची निर्मिती केली जाते.
- बदनामी - इंटरनेट, संकेतस्थळांच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी करण्याची घटना या प्रकारात मोडते. ऑर्कुट, फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांच्या साह्याने बदनामीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
- नेटवर्क हॅकिंग - संकेतस्थळे हॅक करून त्यातील माहिती चोरण्याचा, त्यावरून विविध संदेश प्रसारित करण्याचा प्रकार नेटवर्क हॅकिंगमध्ये मोडतो. संगणकाच्या हार्डडिस्कवरील माहितीही यामध्ये चोरली जाण्याची शक्यता असते.
- ई-मेल हल्ला - एखाद्या ई-मेल अकाउंटवर सातत्याने मोठ्या संख्येने मेल पाठवून त्याचा सर्व्हर नादुरुस्त करण्याचे काम या माध्यमातून केले जाते.
- व्हायरस हल्ला - संगणकाच्या फाइल्स किंवा ई-मेलच्या माध्यमातून व्हायरस पाठवून एखादा संगणक किंवा संपूर्ण नेटवर्क बंद पाडण्याचे काम व्हायरस हल्ल्यात केले जाते. याच पद्धतीने "ट्रोजन' हल्लाही केला जातो.
- क्रेडिट किंवा डेबिट कार्ड गैरव्यवहार - डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे, दुकानातून खरेदी करणे इत्यादी गुन्हे केले जातात. ते सर्वही सायबर गुन्ह्यांमध्येच मोडतात.
संस्थात्मक पातळीवर काय काळजी घ्यावी?
- अद्ययावत ऍण्टी व्हायरस आणि फायरवॉल संस्थेच्या नेटवर्कमधील संगणकांसाठी वापरले पाहिजेत. नेटवर्कवर कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे.
- वापरात नसलेल्या संगणकीय सेवा नेटवर्कमधून काढून टाकाव्यात.
- पासवर्ड तयार करताना अक्षरे आणि आकडे यांच्या एकत्रित वापर करावा.
- नेटवर्कमधील सेवांमध्ये एखादा संशयास्पद कोड किंवा प्रोग्रॅम आढळून आल्यास तातडीने संबंधित सेवा बंद करावी. संबंधित प्रोग्रॅम नेटवर्कमधून काढून टाकल्यानंतरच सेवा पूर्ववत करावी.
- व्हायरसच्या प्रसारासाठी सामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या फाइल्स ई-मेलमधील ऍटॅचमेंटमधून डाऊनलोड करता येऊ नयेत, यासाठी मेल सर्व्हरमध्ये आवश्यक उपाय योजावेत.
- व्हायरसचा शिरकाव झालेला संगणक नेटवर्कमधून बाहेर काढावा. जेणेकरून व्हायरसचा इतरत्र प्रसार होणार नाही.
- अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या ई-मेलमधील ऍटॅचमेंट उघडू नयेत, इंटरनेटवरील अनोळखी सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये, यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
- नेटवर्क सुरक्षेचे महत्त्व व्यवस्थापनाला पटवून देऊन संस्थेच्या अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात येईल, याची काळजी घ्यावी.
- कोणत्याही आपत्कालीन सायबर हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशी व्यवस्था केलेली असावी.
वैयक्तिक पातळीवर काय काळजी घ्यावी?
- कोणतीही बॅंक कधीही ई-मेलद्वारे कोणाचाही पासवर्ड किंवा अन्य वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे अशा ई-मेलला कधीही उत्तर देऊ नका. ई-मेलद्वारा आलेल्या संकेतस्थळांच्या लिंक्स बनावट असण्याची शक्यता असते. त्याचा वापर करताना पुरेशी काळजी घ्यावी.
- लॉटरी काढल्याशिवाय कोणालाही ती लागू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या ई-मेलला उत्तर देणे टाळा. त्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरू नका.
- नोकरी लागल्याच्या ई-मेलमध्ये ज्या कंपनीचे नाव दिले आहे त्याची पुरेशी माहिती करून घ्या. त्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तेथे दिलेल्या क्रमांकावर किंवा मेलवर संपर्क साधून तुम्हाला देण्यात आलेली ऑफर खरी आहे का, याची खातरजमा करा.
- डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणत्याही अनोळखी माणसाच्या हातात देऊ नका. कार्ड स्वाइप करायला दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर लक्ष ठेवा. ती व्यक्ती कार्ड नेमके कोठे स्वाइप करते आहे, याची खात्री करा. पासवर्ड कोठेही लिहून ठेवू नका.
- ई-मेल किंवा सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे पासवर्ड तयार करताना अक्षरे आणि आकडे यांचा एकत्रित वापर करा.
- सार्वजनिक संगणकांवर कधीही पासवर्ड किंवा अन्य वैयक्तिक माहिती "सेव्ह' करू नका.
- ब्राऊजरमधील टेम्पररी फाइल्स, हिस्टरी, कुकीज काम झाल्यावर आठवणीने डिलीट कराव्यात. तुम्हाला रोजच्या रोज लागणाऱ्या संकेतस्थळांच्या लिंक्स "फेव्हरिट',
- बुकमार्क'मध्ये "सेव्ह' करून ठेवाव्यात.
- अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या ई-मेलच्या ऍटॅचमेंट्स उघडू नका.
- संगणकावरील ऍण्टी व्हायरस अद्ययावत आहे का, याची खात्री करा. संगणकावर ऍण्टी फिशिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. बनावट ई-मेल आणि संकेतस्थळांच्या साह्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ नये, याची काळजी ऍण्टी फिशिंग सॉफ्टवेअरमुळे घेतली जाते.
- सर्व प्रकारचे पासवर्ड साधारणपणे तीन महिन्यांच्या अंतराने बदलावेत.
- अमेरिकेत सायबर गुन्ह्यांतर्गत झालेल्या फसवणुकीच्या रकमेत 2009 मध्ये दुपटीने वाढ झाली आहे. 2008 मध्ये 26 कोटी 46 लाख डॉलरची फसवणूक झाली होती, तर 2009 मध्ये 55 कोटी 97 लाख डॉलरची फसवणूक करण्यात आली.
- सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीतही अमेरिकेत 22 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 2008 मध्ये 2,75,284 तक्रारी, 2009 मध्ये 3,36,655 तक्रारी.
- 'स्कॅमर्स'च्या साह्याने ग्राहकांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, पासवर्ड यांची माहिती चोरून झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक 16.6 टक्के आहे.
- सायबर गुन्ह्यातील 65.4 टक्के आरोपी हे अमेरिकेतील आहेत, तर इंग्लंडमधील आरोपींचे प्रमाण 9.9 टक्के, नायजेरियातील आरोपींचे प्रमाण 8 टक्के, कॅनडातील आरोपींचे प्रमाण 2.6 टक्के इतके आहे.
- पैसे मिळवण्याच्या हेतूने सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
- सायबर गुन्ह्यांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
- ठराविक लक्ष्य निश्चित करून सायबर हल्ल्यांचे प्रमाण सध्या अधिक आहे.
- मोबाईलमध्येही फिशिंगचे प्रमाण वाढले आहे.
- सायबर गुन्ह्यांसाठी संघटित टोळीचा वापर, अमली पदार्थांच्या व्यापारापेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट.
- दहशतवादी संघटनांकडून संवादमाध्यम म्हणून इंटरनेटचा मोठा वापर केला जातो.
- बहुतांश सायबर गुन्ह्यांमध्ये माहितीची चोरी केली जाते.
भारतात प्रामुख्याने घडणारे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण
- लॉटरी लागल्याचा ई-मेल लोकांना पाठविला जातो. लॉटरीची रक्कम लक्षावधी डॉलरची असते. लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून मोठी रक्कम ठराविक ठिकाणी पाठविण्याचे आवाहन लोकांना केले जाते. लोकांनी पैसे भरल्यानंतर त्यांना कोणताच प्रतिसाद दिला जात नाही.
- परदेशात नोकरी मिळाल्याचा ई-मेल पाठविला जातो. त्यामध्ये मोठ्या रकमेच्या वेतनाचे आमिष दाखविले जाते. यामध्येही प्रक्रिया शुल्क म्हणून लोकांना पैसे पाठविण्याचे आवाहन केले जाते. पैसे पाठविल्यानंतर फसवण झाल्याचे लोकांच्या लक्षात येते.
- डेबिट किंवा क्रेडिट कार्ड "स्कॅमर'च्या साह्याने स्वाइप करून त्यातील माहिती चोरून लोकांची फसवणूक केली जाते. चोरलेल्या माहितीच्या आधारे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून त्याद्वारा विविध ठिकाणी खरेदी केली जाते. बनावट कार्डाच्या साह्याने प्रामुख्याने विमानाची तिकिटे खरेदी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.
- ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांवर एखाद्याची बदनामी करण्याचा मजकूर प्रसिद्ध केला जातो. ऐतिहासिक स्थळांची, महापुरुषांची बदनामीही या संकेतस्थळांवर करण्यात येते. काही वेळा एखाद्याचे अकाउंट "हॅक' करून त्याच्या संपर्क यादीतील मित्रमैत्रिणींना मदतीसाठी आवाहन केले जाते.
सायबर गुन्ह्यांतर्गत पुण्यात नोंदविण्यात आलेल्या तक्रारी
वर्ष
सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदविण्यासाठी?
- तुमचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले असल्यास तक्रार नोंदविताना पुढील माहिती तुमच्याकडे हवी.
- सर्व्हर लॉग
- हॅक केलेल्या संकेतस्थळांवरील वेब पेजेसची संगणकीय (सॉफ्ट कॉपी) आणि मुद्रित स्वरूपातील प्रत
- संकेतस्थळावरील माहितीत बदल केला गेला असेल, तर मूळ आणि बदललेल्या माहितीची संगणकीय प्रत
- संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्याचे, त्याचे "बॅकएंड' सांभाळण्याचे अधिकार कोणाकोणाला आहेत, याची माहिती
- कोणत्या व्यक्तीवर संशय असेल, तर त्याची माहिती
- संकेतस्थळ कधी हॅक करण्यात आले. संकेतस्थळांचा समूह असेल, तर अन्य कोणते संकेतस्थळे हॅक करण्यात आली आहेत का, याची माहिती
ई-मेलद्वारा अश्लील मजकूर पाठविण्यात आला असल्यास किंवा बदनामी करण्यात आली असल्यास
- बदनामीकारक ई-मेलच्या "हेडर्स'ची माहिती
- बदनामीकारक ई-मेलची संगणकीय आणि मुद्रित प्रत
- ई-मेलच्या "इनबॉक्स'मधून बदनामीकारक ई-मेल "डिलीट' करू नये
- बदनामीकारक ई-मेलमधील मजकूर तुमच्या संगणकावरही सेव्ह करून ठेवावा.
(स्रोत : सायबर गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई)
__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
MARKETPLACE
.
__,_._,___
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.