Breking News...This is Real one...
महाकवी नामदेव ढसाळांच्या "गोलपिठा" या जगविख्यात काव्यसंग्रहातील कविता याठिकानी आठवते, ती खालिलप्रमाणे.
आमच्या आळीतून जाताना....
हे महाग्यानी लोक
हिंडताहेत मशाली पेटवून
गल्लीबोळातुन, आळीआळींतून
जेथे उंदीर उपाशी मरतात-
त्या आमच्या खोपटांतील
काळोख़ , म्हणे यांना कळतो
पाणचट गवशीसारखे हेही एक थेर
ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार कळत नाही
त्यांनी पेटलेल्या माण्सांना
छप्पन-टिकली बहुचकपणा
अजुनही दाखवावा
अरे धूर्तांनो,
ज्यांना तुमची नसन नस कळलीय
त्यांच्याशी तरी इमान राखा
आणि ज्यांना उजेड दिसत नसेल
त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा;
आमची ना नाही
मात्र एक:
आमच्या आळीतून जाताना
त्या विझवूनच पुढे जा
आज आम्हाला या खोपटा-खोपटांतून
पुर्ण सूर्य दिसतोय...
Warm regards.
Prashant Gangawane
http://www.freado.com/users/28611/prashant-gangawane
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.