कोणतीही गोष्ट करायची म्हंटली
कि होतो आमच्यात वाद सुरू
संसाराचे असेच असते
एक थांबला कि दुसरा होतो सुरू
बरेच वेळा सिनेमे पाहून वाटते
त्यांच्यासारखे संसार असावेत आपले
त्यांना काय हो त्याचे मिळतात पैसे
आमचे मात्र महिना अखेरीस खिसे रिकामे
लग्नाआधी असतात दोघे प्रियकर प्रेयसी
जवळ घेऊन एकमेकांना पितात एकच पेप्सी
संसाराचे चटके लागल्यावर होते मात्र फजिती
वाटू लागते बरी होती लाग्नाआधीचीच 'ती'
विसरतो आपण बरेचदा वेळ हा
एकमेकांचा एकमेकांसाठी काढायचा असतो
आपल्यातला वाद हा आपणच मिटवायचा असतो
गोड भावना या फक्त कवितेत असतात
औपचारिक संसारात सुवर्णमध्य साधायचा असतो
प्रत्येकाने हा मोतीचुराचा
लाडू खायला हवा
दोन मनांचा समन्वय कायम
साधायला हवा
समजूतदारपणा आणि विश्वास
यावर हा संसार उभा असावा
दोघांपेक्षा तिसरा असा त्यात कोणी नसावा
कर्तव्याची बंधने पाळताना
एकमेकांवर जीवापाड प्रेम करावे
आलटून पालटून दोघांनीही
मग झुकते माप घ्यावे
परिस्थितीची कास धरून
स्वप्नांना वाट करावी
संसाराची हि जुगलबंदी
चटकदार लोणच्यासारखी अशीच मुरावी
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.