----------
Sent via Nokia Email
------Original message------
From: मराटी सुपर स्टार <marathi.superstar@gmail.com>
To: <kavyatarang@yahoogroups.com>
Date: Wednesday, June 15, 2011 9:03:03 AM GMT+0530
Subject: { Marathi kavita } गोडी मराठी माध्यमाची!
गोडी <http://www.marathiasmita.com/> मराठी माध्यमाची!
- <http://www.marathiasmita.com/> रवींद्र मांजरेकर
<http://www.marathiasmita.com/>
कुटुंबातील सदस्यांचा दबाव, मित्रमंडळींतील मतभेद या सगळ्यांवर मात करून अखेर मराठी माध्यमाच्या शाळेचा रस्ता पाल्याने धरला... ही हल्लीच्या काळात कठीण गोष्ट होऊन बसली आहे. तरीही ही वाट काही पालकांनी धरली. त्यांची त्यामागची भूमिका नेमकी कोणती? पाल्याच्या भवितव्याचा प्रश्न त्यांना सतावत नाही का? आजच्या जीवघेण्या स्पधेर्च्या युगात आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे शर्यतीच्या आरंभबिंदूपासून कित्येक कोस पाल्याला मागे खेचून आता धाव म्हणण्यासारखे नाही का? अशा अनेक प्रश्ानंचा घेतलेला शोध...
............
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. तो आकार कसा घेतो हे त्याच्या पालकांवर, आजूबाजूच्या परिस्थितींवर अवलंबून असते. या सगळ्या जडणघडणीत एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे शिक्षणाच्या माध्यमाचा!
मुलाच्या शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, या सोप्या प्रश्नाला मातृभाषेचे असे शास्त्रीय उत्तर आहे. पण आपल्याकडे तर इंग्रजी माध्यमांत मुलांना टाकण्याचे, त्यांच्यासाठी स्वत: इंग्रजाळलेलेपण स्वीकारण्याचे आणि मग ते इंग्रजाळलेलेपण जमेल तसे निभावत न्यायचे, अशी ओढाताण सुरू असल्याचे दिसते. परिस्थितीशी केलेल्या तडजोडीच्या नावाने कढ काढायचे आणि मातीच्या गोळ्याला इंग्रजी संस्कारांनी घडवायचे. समाजाच्या बहुतांश थरात स्थिरावलेल्या या समजाला छेद दिला जातोय काही विचारी पालकांकडून. अर्थात, ही काही क्रांती नाही. खरेतर मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अशा क्रांतीचीच अपेक्षा आहे. पण त्या क्रांतीची बीजे म्हणता येतील, हे आचरण आहे. कुटुंबातील सदस्यांचा दबाव, मित्रमंडळींतील मतभेद या सगळ्यांवर मात करून अखेर मराठी माध्यमाच्या शाळेचा रस्ता पाल्याने धरला... ही हल्लीच्या काळात कठीण गोष्ट होऊन बसली आहे. तरीही ही वाट काही पालकांनी धरली. त्यांची त्यामागची भूमिका नेमकी कोणती? पाल्याच्या भवितव्याचा प्रश्न त्यांना सतावत नाही का? आजच्या जीवघेण्या स्पधेर्च्या युगात आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे शर्यतीच्या आरंभबिंदूपासून कित्येक कोस पाल्याला मागे खेचून आता धाव म्हणण्यासारखे नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
मातृभाषेतून शिक्षण घेणे हे आमच्या मुलीच्या आणि आमच्या सोयीचे आहे. म्हणून हा मार्ग आम्ही निवडला. घरातील वातावरण मराठी आहे. ज्ञानार्जनासाठी इंग्रजी वापरत असलो तरी ती आमच्या घराची व्यवहाराची भाषा नाही. म्हणून मग अशा घरातील सगळ्यात छोट्या सदस्यावर परभाषेचे ओझे कशाला, अशा विचारानेच आम्ही आमच्या सुरूचीला मराठी शाळेत घातल्याचे विघ्नेश आणि सुवर्णा दामले यांनी सांगितले. तिला इंग्रजी बोलता येईल का, इतरांच्या तुलनेत ती मागे पडेल का असे प्रश्न आम्हालाही पडले. पण त्याला उत्तर आहे. आता मराठी शाळांमध्येही अगदी लवकर इंग्रजीचे शिक्षण सुरू होते. त्यासाठी जी बाह्य मदत करायला हवी, ती आम्ही जाणीवपूर्वक करू, असे मत विघ्नेश दामले यांनी मांडले.
नितीन आणि चित्रा केळकर यांनीही अशीच भूमिका मांडताना, वेगळा दृष्टीकोनही दिला. मी मानसशास्त्राची प्राध्यापक आहे. या विषयाचा माझा अभ्यास असल्याने मातृभाषेतून शिक्षणास आमची प्रथम पसंती आहे. त्यात आमच्या ऋतुपर्णला ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत आम्ही घातले त्या सरस्वती सेकंडरी शाळेत त्याचे वडील, मोठी बहीण चिन्मयी यांनीही शिक्षण घेतले आहे. त्या शाळेचा लौकिक आम्हाला माहिती आहे. केवळ शिक्षण नव्हे तर क्रीडा संकुलासारख्या सुविधांतून संपूर्ण व्यक्तिमत्त्वांची जडणघडण त्या संस्थेत होईल, असा विश्वास वाटल्यानेच मराठी शाळाच निवडण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे चित्रा केळकर म्हणाल्या. अर्थात, केवळ मराठी शाळा पाहिजे म्हणून नव्हे तर, चांगला पर्याय उपलब्ध असल्याने आम्ही त्या शाळेची निवड केली. परंतु, एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की, आमच्यासारख्याच इतरही सुशिक्षित पालकांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवायला हवे. सोबतचे विद्याथीर्ही तशाच कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीतून आलेले असावेत. पाल्यांच्या समरसतेच्या दृष्टीकोनातून ते महत्त्वाचे आहे, असे मत नितीन केळकर यांनी मांडले.
पालकांना <http://www.marathiasmita.com/> वाटणारी भीती आणि त्यावर करायची उपाययोजना याच्याविषयी सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि खासगी शाळा महासंघाचे निमंत्रक सुरेंद दिघे यांनी प्रकाश टाकला. चांगल्या दर्जाच्या मराठी शाळा, ज्याचे इतर पालकांना आकर्षण वाटते त्या इंग्रजी शाळांप्रमाणे क्रमिक पुस्तकांबरोबरीनेच होणारे इतरही उपक्रम, चौथीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण आणि त्यानंतर इंग्रजीचा यथायोग्य सराव या गोष्टी जुळून आल्या तर मराठी शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याचे धाडस पालक करतील. गेल्या काही वर्षांत मंदावलेली ही गती आता पुन्हा वाढू लागली आहे. शाळेचाही स्वत:च्या प्रगतीचा एक रोडमॅप हवा. आम्ही तसा रोडमॅप तयार केला आणि तो भावी पालक व हितचिंतकांसमोर ठेवला. त्यातूनही ती गती वाढली आहे. शाळेच्या वेळानंतर जर्मन, जपानी आणि फेंच भाषा, त्याही सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार, प्रयोग सुरू केलाय. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सुशिक्षित, सुजाण मराठी कुटुंबांतील पाल्यांना आणणे ही एक लढाई आहे आणि ज्यांना मराठी भाषेचे व शाळेचे अस्तित्व टिकवायचे आहे त्यांनी या लढाईत उतरायलाच हवे, असे दिघे यांनी स्पष्ट केले.
चांगला <http://www.marathiasmita.com/> पर्याय होता म्हणून मराठी शाळा निवडली हे या पालकांच्या मानसिकतेचे सूत्र आहे. पार्ल्याच्या विकास परांजपे यांनी त्यांचा मुलगा उन्मेष याला पार्ल्याच्या एका मराठी शाळेतून काढून वांद्याच्या महात्मा गांधी विद्यामंदिर अंतर्गत नुकत्याच सुरू झालेल्या विवेकानंद गुरूकूलमध्ये दाखल केले. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीस आदर्श मानून मिलिंद चिंदरकर यांनी हा वेगळा प्रयोग सुरू केला. त्यात प्रत्येक वर्गात ३५ विद्यार्थ्यांची एकच तुकडी आहे. स. ७ ते सायं. ७ या वेळेत विद्याथीर् योगासनांपासून संध्याकाळच्या मैदानी खेळापर्यंत सर्व प्रकारच्या उपक्रमात भाग घेतात. ज्ञानासोबतच खेळ, सामाजिक भान आदींद्वारे सर्वांगीण विकास हे या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे. पार्ल्यातून माझ्यासह, सुमित राघवन, महेश फडके अशा आठ समविचारी लोकांनी हा प्रयोग स्वीकारला. मातृभाषेतून मिळालेले शिक्षण प्रभावी असते आणि आपली भाषा शिकल्यावर इतर भाषाही सहज शिकता येतात, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. इंग्रजी शाळा फार काही ग्रेट नाहीत. मराठी भाषेत शिकवण्याची इच्छा असूनही तसा पर्याय मिळत नसल्याने मराठी पालक इंग्रजीचा स्वीकार करतात, असे मत परांजपे यांनी मांडले.
शाळेची <http://www.marathiasmita.com/> गुणवत्ता आणि दर्जा यांचा अभ्यास करून पालक पाल्यासाठी शाळेची निवड करतात. ज्यांना मराठीतून पाल्याचे भवितव्य घडवायचे आहे, अशांसाठी पर्याय उपलब्ध होऊ लागल्याने भविष्यात मराठी शाळांकडील ओढा वाढू लागेल, अशी अपेक्षा या चचेर्नंतर निश्चितच वाटू लागते.
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.