आला आला शेतकर्या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा
आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर
लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा
बांधा कवड्याचा गेठा
आंगावर्हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन
उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा
वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्या हातीं
याच्या जीवावर शेतीं
उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचार्याचाज मिंधा
चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल
आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन
कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकर्या तुझं रीन !
- बहीणाबाई चौधरी
Related Posts:
- माझं इठ्ठल मंदीर [hana-code-insert name='ad' /] माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर टाय वाजे ...
- आला पह्यला पाऊस [slider title="आला पह्यला पाऊस - Click Here"] [ad#co-1] आला पह्यला पाऊस शिपडली भुई ...
- उपननी उपननी [slider title="उपननी उपननी - Click Here"] [ad#co-1] उपननी उपननी आतां घ्या रे पाट्या ...
- आतां उजाडेल ! खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल आतां उजाडेल ! शुभ्र ...
- तुझं आणि माझं जमणार तरी कसं? तुझं आणि माझं जमणार तरी कसं? तुला लागतो चहा ...
- वाटच्या वाटसरा [hana-code-insert name='ad' /] वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी ! नशीबीं दगड गोटे काट्याकुट्याचा ...
- जडाच्या जांभया रडण्याचेंही बळ नाही; हसण्याचेही बळ नाही; मज्जा मेली; इथें आतां जीवबाची कळ नाही. संस्कृतीला ...
- संवाद – संतोष आणी अमॄता, तु जातीयेस तर जा .. जातीयेस तर जा पण मी मात्र हालणार नाही या झाडापासुन.. वाळलेलं म्हणत ...
- हो…………… त्याच वाटेने येणं झालं माझं [slider title="हो…………… त्याच वाटेने येणं झालं माझं"]हो…………… त्याच वाटेने येणं ...
- पिलोक ( प्लेग ) [slider title="पिलोक ( प्लेग ) - Click Here"] [ad#co-1] पिलोक पिलोक आल्या पिलोकाच्या
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.