Tuesday, March 1, 2011

{ Marathi kavita } उखाणे..........त्याच्या आणि तिच्यासाठी


 
कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
 
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा
 
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा
 
नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू
 
चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप
 
पाव शेर रवा पाव शेर खवा
...चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
दही,साखर,तुप
...राव माला आवडतात खुप
 
बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस
 
मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ
 
सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?
 
हिरव्या शालुला जरिचे काठ
चे नाव घेते, सोडा माझी वाट
 
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास
 
एक होति चिऊ, एक होता काऊ,
.. ना घास भरवला तर मि काय खाऊ?
 
 
लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे
 
 
कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!
  
 
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश
 
 
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान
 
 
सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन
 
 
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
 
एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि
 
 
केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत
 
 
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा
 
एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .
 
दोन वाति एक ज्योति,दोन शिम्पले एक मोति ----रावाचि मि सौभाग्यवति.
 
ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
---- नाव घेते सौभाग्य माझे
 
 
श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी
 
 
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट
 
****************************************************************************************************
 
मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे
 
 
निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान
 
काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
 
 
भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !
 
 
खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..
 
 
उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम
 
 
पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे
 
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
 
 
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
 
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती
 
 


--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
prapawar4u@gmail.com


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.