Sunday, November 28, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} काही कविता




जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही........
___________________________________________________________________
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे,

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे

उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे

मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे
आठवणीने दे............................
_____________________________________________________________
माझ्या मनाच घरट अगदी वेड आहेत
सारे अनोळखी तरी तयांस आपलेसे आहेत

माझ्या मनातील घरट सग्या सोबतीसाठी खूप छान आहेत
त्याच्याकडे आपल्या सगळ्याचे स्वागत आहेत

मी अलीकडे खूप हसतो खूप बोलतो खूप खेळतो
मनातल ते सगळे बिनधास मित्रांना सांगून टाकतो

निस्वार्थी असा इथे कुणाचा स्वभावच नसतो
खर बोलणे हा आजकाल कुणाचा धर्मच नसतो

मनातील मनात जगन खरच खूप छान असत
त्यामुळेच सर्वांसाठी माझे इथे मनापासून स्वागत असत
 




--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.