--- On Tue, 15/6/10, Mahadev Ghare <maha_ghare@yahoo. co.in> wrote:
From: Mahadev Ghare <maha_ghare@yahoo. co.in>
Subject: [Marathi_Katha] झक्कास जेवण्यासाठी (Hotels at Pune imp information for you)
To:
Date: Tuesday, 15 June, 2010, 4:56 PM
| | १. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३० झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण. मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे. २. आवारे लंच होम - पुणे ३० चिकन/मटण थाळी. सन १९०१ पासुन सातत्याने गर्दी खेचणारी ही मांसाहारी खानावळ केवळ अप्रतिम चवीचे चिकन मटण देते. एका हाताने नाक डोळे पुसत आणि दुसर्या हाताने रस्सा भुरकत जेवण्याची इथली मजा औरच. पत्ता: अलका टॉकिजच्या चौकातून कुमठेकर रस्त्यावर आल्यानंतर काहीसं पुढे येऊन उजव्या हाताला पहात जावं, कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावर ताबडतोब दिसेल, जोंधळे चौक ३. निसर्ग [मासे] पत्ता: कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ला डावीकडे वळाल्यावर एक सर्कल लागते तिथे उजव्या हाताला ४. गोमंतक पत्ता: डेक्कन जिमखाना परिसर. पुनम हॉटेल च्या लगतच्या (उजव्या हाताला) इमारती मधे एकदम वरच्या मजल्यावर ५. मालवण समुद्र [मासे] मोरी मसाला आणि भरलेले पापलेट. पत्ता: पिंपरी चिंचवड नाट्यगृहाच्या शेजारी. चिंचवड टेल्को समोर. (टाटा मोटर्स) ६. हॉटेल आशिर्वाद, पुणे मासे आणि कोळंबी थाळी साठी चांगलेच प्रसिद्ध आहे. पत्ता: डेक्कन वरुन कुमठेकर रस्त्यावर या. सिटि प्राईड शुजच्या चौकात उजवीकडे वळा. उजवीकडची दुसरी इमारत. गुरुवार बंद. ७. स्वराज्य मालवणी जेवण खासच पत्ता: टिळक रोड वरून, एसपी कॉलेजच्या चौकात, निलायम टॉकीजच्या दिशेने वळा. निलायम टॉकीजच्या चौकात कुणालाही विचारा. ८. जनसेवा ९. जयश्री १०. दुर्गा [बिर्याणि] पत्ता: टिळक स्मारक मंदिरासमोरच्या बोळात आणि दुसरे मंडईत आहे कुठेतरी ११. कलकत्ता बोर्डिंग हाउस [मासे] पत्ता: जंगली महाराज रस्ता १२. कलिंगा [मासे] मत्स्यावतारांसाठी बेष्ट... लाल करी अप्पम किंवा नीर डोसा याबरोबर झकास लागते. पत्ता: नळस्टॉप चौकाच्या मागच्या बाजूला, जुने टेक महिंद्रा - शारदा सेंटर च्या समोर किंवा नवीन पर्सिस्टंट च्या बाजूला. १३. हॉटेल सौंदर्य मटण केशरी बिर्याणी पुणेरी मटण (पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात. ) पत्ता: डेक्कनवर रानडे इन्स्टिट्युट समोर ओरिजिनल, लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील १४. हॉटेल सर्जा [हे लता मंगेशकरांचे आहे.] चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत. "स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात. (औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत) पत्ता: "सर्जा रेस्तरॉं', 127-2 सानेवाडी, आयटीआय रस्ता, औंध,पुणे - 411007 १५. समुद्रा रेस्तरॉं गोवन तसेच मालवणी पद्धतीने बनविलेले मासे व कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले पदार्थ. मत्स्यप्रेमींसाठी इथे गोवन आणि मालवणी अशा दोन्ही पद्धतीने तयार केलेले मासे. फिश प्लॅटर फिश करी खिमा गोली पुलाव पत्ता: म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे - 411052. 09422943742 (म्हात्रे पूल संपला, की डावीकडे वळून डीपी रोड) १६. वाघोली गावातील हॉटेल कावेरी बोल्हाईचे मटण पत्ता: एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे. १७. दोराबजी अँड सन्स इथे चिकन बिर्याणी जबरा दालगोश, चिकन किंवा मटण सालीगोश, मटण किंवा चिकन धनसाक, पात्रा फिश, शामी कबाब आणि "कस्टर्ड' हे पारशी पदार्थ पत्ता: वेस्ट साइड शेजारचं आणि जुनं इस्ट स्ट्रीट वरचं 845, दस्तूर मेहेर मार्ग, सरबतवाला चौकाजवळ, पुणे 411001. 020-26145955, 020-26834595 १८. सिगरी रेस्तरॉ कबाब, उत्तर भारतीय पदार्थ- अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब पत्ता: "सिटी टॉवर्स' इमारत, ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001. वेळ- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० ते रात्री ११ १९. "बोरावकेज बिर्याणी हाउस' पाया सूप, मटण दालचा व राइस, चिकन खिचडा, चिकन दम बिर्याणी, रमजान स्पेशल चिकन, खिचडा, व्हाइट गोश, जंगबादी गोश, चिकन-मटण हंडी, चिकन-मटण मसाला, खिमा पराठा, चुल्हा मटण पत्ता: 254, चिरंजीव अपार्टमेंट, शॉप न. 7, कर्वे रोड, कोथरूड, पुणे-411029, 020-25442279 २०. हॉटेल वाझवान 'ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत. तबकमाझ, गुश्ताबा, मुर्ग याखनी, रवा, सर्वांत शेवटी- दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्मिरी खीर. पत्ता: बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की वाझवान. २१. हॉटेल अभिषेक पत्ता: म्हात्रे पूलाकडून संत गुळवणी महाराज चौकातून स्वप्नशिल्प सोसायटीकडे जाणारा रस्ता. २२. चायनीज रूम पत्ता: चायनीज साठी, कर्वे रस्त्यावरील २३. ऑफ बीट पत्ता: कर्वे रस्त्यावरून झाला कॉम्प्लेक्स च्या चौकात डावीकडे पिज्झा हट कडे वळालं (स्वप्नशिल्प सोसायटीच्या रस्त्याला/कोथरूड सिटिप्राईड थिएटर कडे) की उजव्या बाजूस आहे १ल्या मजल्यावर. २४. हॉटेल सदानंद पत्ता: कर्वे रस्त्यावरचं मॅक्डोनल्ड च्या आधी आहे, यांचचं पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर बाणेरपाशी दुसरं आहे. २५. हॉटेल गुडलक पत्ता: डेक्कन २६. हॉटेल खैबर, हॉटेल पूनम पत्ता: दोन्ही, डेक्कन २७. हॉटेल निमंत्रण पत्ता: बिबवेवाडी रस्त्यावरचं, पुष्पमंगल कार्यालयाजवळचं २८. हॉटेल सृष्टी [मासे] पत्ता: सदाशिव पेठेतलं. टिळक स्मारक मंदिरासमोर एक रस्ता जातो पेरूगेट(पो.चौ.)कडे... १. जर तुम्ही स.प महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजेच टिळक रस्त्याने आलात, अलका टॉकिजच्या दिशेने, तर तुम्हाला उजवीकडे वळता येणार नाही (टि.स्मा. चौकात)... २. त्यामुळे स.प महाविद्यालयावरून थोडं पुढे आलात की डाव्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे त्याला लागूनच एक छोटी गल्ली टि. स्मा कडे जाते...त्यातून पुढे जा आणि उजव्या हाताला वळा, जसा रस्ता जातो तसं...मग तुम्ही आपोआप सिग्नल पाशी याल्...सिग्नल ओलांडून सरळ जा. ३. उजव्या हाताला दुर्गा हॉटेल आहे...त्याच लायनीत उजव्या बाजूलाच 'सृष्टी' आहे...सिग्नल पासून हार्डली १०० मी. २९. हॉटेल कोयला [द हैद्राबाद हाउस] हैदराबादी बिर्याणी, एकदम निजामी थाटाचं पत्ता: कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड ३०. कोकण एक्स्प्रेस पत्ता: कोथरुड, दशभुजा गणपती वरुन सरळ महर्षी कर्वे पुतळ्याकडे या[२किमी], दोन रस्ते फुटतात, डावीकडचा रस्ता घ्या, तेथुन १किमी वर आहे. रस्त्याला लागुनच आहे. ३१. मिर्च मसाला पत्ता: इथली सोलकढी पण चांगली असते, कोथरुड ३२. न्यु मराठा कोल्हापुर दरबार एकदम झकास मटण थाळी. सोलकढी खलास असते. पत्ता: यांच्या पुण्यात दोन शाखा आहेत. एक सदाशिव पेठेत, ज्ञानप्रबोधिनी च्या समोरच्या बोळात आणि दुसरी मोरे विद्यालय बस-स्टॉप च्या थोड आधी. ३३. शीश महल इराणी पध्दतीचे खाद्यपदार्थ मिळतात. चेलो कबाब विशेष छान. हवा असल्यास हुक्का पण मिळतो (निरनिराळ्या स्वादांमधे) पत्ता: ए.बी.सी. फार्म्स, कोरेगाव पार्क ३४. सिंहगडावर जवळपास सगळे ढाबे (विशेष करुन बाळुचा ढाबा) इथे मस्त पैकी गावरान चिकन आणि भाकरी हाणायची ३५. पुरेपुर कोल्हापुर कोल्हापुरी पद्धतीने बनवलेल मटण पत्ता: पेरुगेट पोलिस चौकीजवळ आणि दुसरे मेहेंदळे गैरेज जवळ, अभिषेक हॉटेल शेजारी, कोथरुड ३६. शेतकरी नॉनव्हेज सुक्कं मटण , कडक भाकरी, खिमा फ्राय, पांढरा आणि तांबडा रस्सा हवे असेल तर जोडीला सुरमई फ्राय. तांबड्या रस्श्यात कडक भाकरी चुरून वरून सुक्के मटण हाणा इथे. *[याची एक खासियत: लता मंगेशकर, आशा भोसले, श्रीकांत मोघे वगैरे सारखे मोठे लोक्स इथे जेवायला आले त्याचा एक छोटासा अल्बमही बघायला मिळेल. आशा भोसलेंचा एक छानसा अभिप्राय सुद्धा वाचल्याचा आठवतोय. तसेच, 'यहां शराब पीना मना है' सारख्या टिपिकल ढाब्याच्या सुचना ही .. Smile] पत्ता: निलय कॉम्लेक्स शेजारील गल्ली, संतोष हॉल जवळ, आनंदनगर, नरवीर तानाजी रस्ता,(सिंहगड रोड), पुणे. ३७. रानमळा गरम गरम चुलीवरचे non veg मिळते.....khup sahi asate..... पत्ता: चाफेकर चौकाजवल जो जकात नाका आहे , तिथुन सरळ गेल्यावर जो कच्चा रस्ता लागतो, तिथे आहे ३८. हॉटेल नागपुर इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय. पत्ता: टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे. साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे. हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे पहात असलेले असतील!!!!! ३९. जंजिरा एक मासे खाण्या साठी चांगले हॉटेल आहे.. पत्ता: अलका टॉकिज वरुन खाली गांजवे चौकात आला कि हे हॉटेल लागते.... ४०. यज्ञकर्म उपहारगृह चमचमीत निरामिष आणि चटकदार सामिष पदार्थांची रेलचेल पत्ता: सहवास कॉर्नर, कर्वेनगर, पुणे ४११ ०३८. १) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला 'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे. २) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.) ३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे. पत्ता इतका व्यवस्थित देवुनही चुकलात तर याद राखा. ४१. मालवणी सोलकढी पत्ता: कर्वे नगर मधे, 'मातोश्री' वृद्धाश्रमाच्या पुढे ४२. मल्लाका स्पाइस पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी (थाई) ४३. बाँबे ब्राझरी पत्ता: बोट क्लब रोडवर ४४. मेन लँड चायना पत्ता: बोट क्लब रोडवर ४५. प्रेम्स पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी ४६. ल मेरिडियन इथलं 'अंगारे' (बहुतेक) हे भारतिय रेस्तराँ फारच जबरी आहे ... तंदुर प्रॉन्स तर एकदम जबरी .. पत्ता: पुणे स्टेशनच्या मागच्या बाजुला. ४७.आर्थर्स थिम पत्ता: कोरेगाव पार्कात 'ओशो' आश्रमाशेजारी [फ्रेंच] ४८. चिंगारी पत्ता: ए बी सी फार्म शेजारी, कोरगाव पार्क जवळ ४९. सिझलर्स साठी - योको - ढोले पाटील रोड वर झामुज - ढोले पाटील रोड वर | | |
__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.