सकाळ पेपर ,मालक प्रतापराव पवार जे शरद पवार यांचे धाकटे भाऊ आहेत.नोंदीनुसार प्रतापराव पवार मालक दिसत असले तरी खरे मालक शरद पवार आहेत हे सर्व मराठी लोकांना माहित आहे ...
सकाळ पेपरच्या संपादकच्या हुजरेगीरीचा उत्तम नमुना
यादवबाबा, अण्णांना सुबुद्धी दे सकाळ वृत्तसेवा Thursday, December 01, 2011 AT 02:30 AM (IST) Tags: editorial, anna hazare आम्ही सांगू तसाच लोकपाल हवा, हा हेका लोकशाहीशी विसंगत आहे; परंतु अण्णा तो सोडायला तयार नाहीत. आपण सांगू ती व्यवस्था, सांगू तो कायदा हा त्यांचा अहंकार योग्य नाही. एखादा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला, की तो शंभर टक्के बरोबर आहे, असे त्यांना वाटायला लागते. अर्थात, हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. काही वेळेला मूळ स्वभाव बदलला जात नाही, असे संत तुकारामांनीही म्हणून ठेवलेय. हा अभंग अण्णांना तोंडपाठ असणार म्हणून तो येथे देत नाही. शिवाय, तुकोबारायांचे भक्त असलेले आणि नंतर देवत्व लाभलेले यादवबाबा यांचे भक्त स्वतः अण्णा आहेत. त्यामुळे यादवबाबा यांच्याकडे धाव घेऊन "अण्णांना सुबुद्धी दे' असे काही वेळा म्हणावे लागते. त्यात यश येईलच असे नाही; पण धाव घेण्यात गैर काय आहे? तर, आता अण्णांनी पुन्हा दोन आंदोलनांची घोषणा केली आहे. त्यांत आहे एक इशारा आंदोलन. अकरा डिसेंबरला ते जंतरमंतरवर होणार आहे. नंतरचे खरे म्हणजे दीर्घ आंदोलन 27 डिसेंबरला रामलीला मैदानावर होणार आहे. मुद्दा तोच, समर्थ लोकपाल पाहिजे. सरकारी लोकपाल असमर्थ आणि अण्णांचाच लोकपाल तेवढा समर्थ आहे, हे कधीपासून सांगण्यात येत आहे. आपल्याला जे हवे तेच मिळाले पाहिजे, असा अण्णांचा आग्रह असतो. या आग्रहामुळे ते साऱ्या व्यवस्थेला खिजगणती ठरवतात. आता किरण बेदींचेच बघा ना! त्या टीम अण्णामधील महत्त्वाचा आधार आहेत. म्हणजे चौकडीतील महत्त्वाचा कोन. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यमान व्यवस्थेनुसार या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करायला हवा आणि निर्णय न्यायालयाने द्यायला हवा; पण आता ही व्यवस्था नाकारून टीम अण्णाच या प्रकरणाचा तपास करणार आणि "दूध का दूध, पानी का पानी' ठरवणार. मग कायद्याचे काय करायचे आणि न्यायालयीन व्यवस्थेचे काय करायचे? बरे तर हा न्याय फक्त बेदींनाच का? त्यांच्यासाठीच अण्णा स्वतः न्यायालय, स्वतःच कायदा व्हायला निघाले आहेत काय? सभ्यपणातूनही काही वेळा हुकूमशहा जन्माला येतो असे म्हणतात. मग आता काय घडत आहे? कोर्टही आपण, कायदाही आपण, फिर्यादीही आपण आणि आरोपीही टीम अण्णातील एक सदस्य. शुद्धीकरणाचा असा हा अफलातून मार्ग अण्णांनी शोधून काढला आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे तो लोकपालाच्या कक्षेत कुणाला आणावे आणि कुणाला आणू नये, हा. टीम अण्णाला वाटते, की सरकारी एनजीओ आणायला हव्यात. बेदी किंवा केजरीवाल चालवत असलेल्या म्हणजे खासगी एनजीओ आणू नयेत. सरकारने साऱ्याच एनजीओ लोकपालाच्या कक्षेत आणायचे ठरवले आहे. खरे तर सामान्य माणूस या निर्णयाचे स्वागत करेल; पण अण्णा करणार नाहीत. आपल्या देशात सेवेच्या नावाखाली नवे एनजीओ-राज तयार होत आहे. वेळीच त्याची दखल घेतली नाही, तर उद्या लोकशाहीची जागा हे एनजीओ घेणार आहेत. त्या दिशेने त्यांची पावले पडत आहेत. आंदोलन एनजीओ करणार आणि लोकशाहीची जागाही तेच बळकवणार, असे दिसते. सर्वांत जास्त एनजीओ महाराष्ट्रात आहेत. सुमारे पाच माणसांमागे एक एनजीओ आहे. हे सारे समाजसेवेसाठी जन्माला आले आहेत की स्वार्थासाठी, याचा फैसलाही कधी तरी यादवबाबांच्या मंदिरात बसून करायला हवा; पण अण्णा तो करणार नाहीत, कारण दातही आपले आणि ओठही आपले, असे घडते आहे. तलाठ्यापासून पंतप्रधानांपर्यंत सारेच लोकपालाच्या रडारावर यायला हवेत, असे अण्णांना वाटते. क्षणभर ते बरोबर आहे असे मानले, तर मग आपली लोकशाही, आपली घटना आणि न्याय व्यवस्था गुंडाळून ठेवायची का, असा प्रश्न निर्माण होतो. या साऱ्या व्यवस्था नियंत्रणाखाली ठेवायच्या असतील, तर मग स्वर्गातील देवच बोलवावे लागतील. सर्वगुणसंपन्न असा लोकपाल कोठून आणणार आणि आणला तर तो सदासर्वकाळ स्वच्छच राहील की एक दिवस तोही "दाग अच्छे लगते है' असे म्हणेल, याची खात्री कोण देईल? टीम अण्णा ती जबाबदारी घेईल असे म्हणायचे तर या टीमवरील काही डागही आता दिसत आहेत. सरकारने ते शोधले की सरकार भ्रष्ट आणि अण्णांच्या टीमने शोधले की टीम शिष्ट, असा न्याय जन्माला घातला गेला आहे. प्रश्न एकच आहे आणि तो म्हणजे आपल्याला लोकशाही पाहिजे की लोकपालशाही पाहिजे! जगातल्या अनेक समूहांना आणि राष्ट्रांना लोकशाहीची तहान लागलेली असताना अण्णा मात्र "लाओ लोकपालशाही' असे आपल्या भरड्या हिंदीतून सांगताहेत. म्हणूनच आता "यादवबाबा, अण्णांना सुबुद्धी दे' असे म्हणावे लागत आहे. सारा देश, साऱ्या व्यवस्था, सारी घटना लोकपालाच्या हातात देऊन मोकळे व्हा, असे म्हणणे हे हेकेखोरपणाचे, बालीश आणि हुकूमशाही वृत्तीचेही आहे. आपण स्वच्छ आहोत म्हणून लोकशाहीच्या गळ्याला नख लावून अतिरेकी लोकपाल आणा, असे कोणी सांगत असेल, तर लोकांनीच ते रोखायला हवे. |
--
-----------------------------
Rules of the Group:
-----------------------------
1. Please do not forward SPAM or Advertisement.
2. Do not dispute in terms of sex, cast, creed or religion.
3. Use of abbusive words is strictly prohibited.
4. No Adult Stuffs should be Posted in this Group.
5. Any views or opinions presented in this email are solely those of the author and do
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
You received this message because you are subscribed to the Google Groups "aurangabadhangout" group.
To post to this group, send email to aurangabadhangout@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to aurangabadhangout-unsubscribe@googlegroups.com
For more options, visit this group at http://groups.google.co.in/group/aurangabadhangout
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.