Thursday, May 12, 2011

{ Marathi kavita } राहुल गांधींना अटक व सुटका श्रेयासाठी चढाओढ

 

राहुल गांधींना अटक व सुटका

वृत्तसंस्था

Thursday, May 12, 2011 AT 12:40 AM (IST)

 

ग्रेटर नोएडा - उत्तर प्रदेश सरकारच्या भूसंपादन धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या उग्र आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारास अटक करण्यात आली व रात्री उशिरा त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. सुमारे तीन तास हे अटकनाट्य सुरू होते.


उत्तर प्रदेशातील भट्टा पारसौल गावात राहुल गांधी पहाटे चारच्या सुमारास पोलिसांना हुलकावणी देऊन दाखल झाले होते. तब्बल २० तासांपेक्षा जास्त वेळ धरणे धरल्यानंतर रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक केली. राहुल गांधी यांच्या शिवाय कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह, उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षा रिटा बहुगुणा, राज बब्बर यांनाही उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. 


राहुल यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने दिल्लीला रवाना केले. डीएनडी महामार्गावरून राहुल यांना पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सराई केल खान आंतरराज्या बसस्थानकाजवळ नेऊन सोडले.

यमुना महामार्ग प्रकल्पासाठी मायावती सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी अल्पदरात संपादन करून त्या चढ्या भावाने विकल्या होत्या. त्यामुळे दिल्लीपासून जवळच असलेल्या ग्रेटर नोएडा परिसरात संतप्त शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. आंदोलनावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत दोन पोलिसांसह चौघांचा मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती चिघळली होती. 

 

दिग्विजयसिंहदेखील त्यांच्यासमवेत होते. राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते आंदोलनस्थळी येतील याची खात्री असल्याने राज्य पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, राहुल भल्या पहाटे आणि मोटारसायकलने येतील, याचा अंदाज नसल्याने पोलिस त्यांना थांबवू शकले नाहीत.

राहुल गांधी गावात आल्याची खबर पोलिसांना नव्हती. शेतकऱ्यांशी चर्चा करीत असल्याचे पाहिल्यानंतरच पोलिसांना ते आल्याची माहिती मिळाली. या भेटीदरम्यान राहुल गांधींसमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. एका महिलेने पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचून दाखविला. काही जणांनी पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या जखमा राहुल गांधी यांना दाखविल्या. या वेळी राहुल गांधी यांनी मायावती सरकारने केलेल्या अन्यायाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला जाईल, असे आश्‍वासन दिले. शेतकऱ्यांनीही आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले. तसेच शेतकरी आणि पोलिस यांच्यामध्ये उडालेल्या धुमश्‍चक्रीची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भट्टा पारसौल गावातच शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करत होते.

"एसपीजी'चे सुरक्षाकवच असलेल्या राहुल यांना असलेला धोका पाहता त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांना प्रशासनातर्फे करण्यात आली. त्याचबरोबर पूर्वसूचना न देता आल्याबद्दल सुरक्षा देण्यात असमर्थताही व्यक्त केली. तर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, या भूमिकेवर राहुल गांधी ठाम होते. न्यायालयीन चौकशीचा अहवाल येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले जाऊ नयेत. तसेच अटकेतील शेतकऱ्यांची तातडीने मुक्तता केली जावी, अशीही मागणी त्यांनी केली.

श्रेयासाठी चढाओढ
दरम्यान, राज्य सरकारविरोधातील जनमत संघटित करण्याचे श्रेय मिळविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. राहुल असे आंदोलन करून "नौटंकी' करीत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते मोहनसिंग यांनी केली. तर, भट्टा पारसोल येथे राहुल यांचे विनासायास पोचणे यातूनच कॉंग्रेस आणि मायावतींची हातमिळवणी झाल्याचे सिद्ध होते, असा आरोप भाजपचे नेते राजनाथसिंह यांनी केला.

फोटो गॅलरी

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.