तो आणि ती भाग..१५ --स्थळांची लागली रांग; 'त्याचा' संताप संताप...
Posted On Monday, 27 Dec 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागल्यावर तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. अगदी सातासमुद्रापार राहणाऱ्या भारतीयांनीही प्रपोजल्स पाठविली; पण ती लग्नासाठी तयार झाली नाही. तिचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं. मात्र, यातून जन्माला आलं एक षड्यंत्र. लग्न टाळण्यासाठीचं... तिला आकर्षक पगाराची नोकरी लागल्यावर स्थळांची अक्षरशः रांग लागली. अगदी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामधून "एनआरआय' लोकांची स्थळं चालून येऊ
तो आणि ती भाग..१४ --'कॅम्पस इंटरव्ह्यू'ने सुखी स्वप्नांना तडा
Posted On Monday, 06 Dec 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
अभ्यास करून पास होता येतं, चांगले मार्क्स कमविता येतात; पण घसघशीत पगाराची नोकरी मिळविण्यासाठी व्यक्तिमत्त्वविकास आणि संभाषणकौशल्य अत्यंत आवश्यक आहे, हे त्याला पहिल्यांदा कळलं. तो खडबडून जागा झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण समाधानकारक यश मिळालं नाही. बघता बघता पदवी मिळाली आणि "पीजी'चे सोपस्कारसुद्धा पार पडले. कॉलेजचे दिवस अगदी चटकन सरतात. म्हणतात ना, सुख क्षणिक असतं आणि दुःख सरता सरत नाही.
तो आणि ती भाग..१२ --बॉंबस्फोटाने पाडला 'व्हॅलेंटाइन'चा नवा पायंडा
Posted On Thursday, 15 Jul 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
बॉंबस्फोटानं त्यांचा "व्हॅलेंटाइन डे'चा प्लॅन उधळून लावला. पण त्याचं दुःख नव्हतं. येत्या रविवारी "व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि रक्तदान केलं. कारण म्हणतात ना, रक्तदान हेच जीवनदान! तो "जेएम रोड'वर मित्रांसोबत गप्पा छाटत बसला होता. अगदी निवांत. हातात आइस्क्रीमचे कोन. तोंडात "व्हॅलेंटाइन डे'च्या गप्पा. यंदा "
तो आणि ती भाग..१० --फर्स्ट आउटिंग ऽ इंडियन सिलिकॉन व्हॅली
Posted On Monday, 05 Apr 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
मुंबई, बंगळूर, हैदराबाद, ब्रिटन आणि अमेरिका तरुणाईला कायम भुरळ पाडत आली आहे. बहुमजली चकचकीत इमारती, बहुराष्ट्रीय कंपन्या, मॉडर्न लाईफ स्टाईल कॉलेजजीवनापासूनच खुणावत असते. दोघांनाही बंगळूर बघायचे होते. कारण हीच त्यांची फस्ट अँड फॉरमोस्ट आउटिंग होती... सांस्कृतिक महोत्सवाची धुंदी ओसरल्यावर कॉलेज कट्ट्यांवर गप्पा रंगतात त्या सहलीच्या. कुठे जायचे, कसे जायचे, कोणते स्थळ चांगले, कोणते अगदी नाक मुरडावे
तो आणि ती भाग..९ --सांस्कृतिक महोत्सवात चित्तवेधक एकांकिका
Posted On Tuesday, 30 Mar 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
अभिनय हा त्यांचा प्रांत नसतानाही उपजत हुशारी, दुर्दम्य आत्मविश्वास, सळसळता उत्साह, अपार कष्ट उपसण्याची तयारी ठेवून रसिकराजाचे निखळ मनोरंजन केले. तिनेही आळशी मनोवृत्तीला भीक न घालता त्याच्या प्रयत्नांचे चीज करून दाखविले. आपल्या उणिवांकडे काणाडोळा न करता मानवी क्षमतांचा कस लागेल, असा सराव केला. विजयश्री खेचून आणली. यंदा कॉलेजात होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.
तो आणि ती भाग..८ --कॉलेजच्या प्रिन्सेसने घातला घोळ
Posted On Monday, 29 Mar 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
कॉलेजच्या प्रिन्सेसने त्यांच्या साध्या-सरळ आयुष्यात मोठी खळबळ निर्माण केली. त्याचं प्रिन्सेससोबत हसून बोलणं, कॉलेजमध्ये फिरणं, हात मिळवणं हिच्या चांगलंच जिव्हारी लागत होतं. तशी तिने उघड नाराजी व्यक्त केली नसली, तरी मनात सात्त्विक संताप खळबळत होता. कालांतराने त्याने उग्र रूप धारण केलं. शेवटी प्रकरण एक तर "ती' नाही तर "मी' येथवर येऊन पोचलं. कोणत्याही कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव म्हणजे अतिउत्साही
तो आणि ती भाग.७ --सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन
Posted On Friday, 26 Mar 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
तांबड्या, पिवळ्या रंगाचा शालू अंगावर ल्यालेल्या ढगांवर मान ठेवून मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे मनोहारी दृष्य बघून दोघेही पुरते स्तंभित झाले होते. एकमेकांच्या साक्षीने सूर्यास्त बघण्याचा विलक्षण अनुभव ते मनाच्या तिजोरीत मौल्यवान दागिन्याप्रमाणे साठवून घेत होते. थोड्याच वेळात तिचा मोबाईल गुणगुणू लागला. ती पुरती घाबरली. कपाळावर घामाचे दवबिंदू फुटले. क्षणात ते ओघळू लागले. आता लगोलग घरी जाण्याशिवाय
तो आणि ती भाग..६ --पहिली सोनेरी भेट ऽ सिंहगड फोर्ट
Posted On Thursday, 25 Mar 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
त्या दोघांनी सिंहगडावर जाण्याचा बेत रचला. परतीच्या प्रवासात खडकवासल्यात थांबण्याचा प्लॅन होताच. त्याच्यासोबत एकटीने पुण्याबाहेर जाण्याच्या विचारांनी ती पुरती "एक्साइट' झाली होती. अर्थात, त्याचंही स्वप्न सत्यात उतरलं होतं. पहिल्यावहिल्या सिंहगड भेटीच्या कल्पनेने दोघेही भलतेच खूष होते. वारीला जाणाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा देहू-आळंदीला भेट दिली नाही, तर त्यांना चैन पडत नाही. तसेच काहीसे पुण्यातील
तो आणि ती भाग..५ --पहिलं प्रेम अन् 'गाजर का हलवा'
Posted On Wednesday, 24 Mar 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
त्यानं तिचं प्रेम म्हणजेच आयुष्यभर साथ निभावण्याचा प्रस्ताव स्वीकारला. प्रेमाची मुळाक्षरं गिरवताना थोडी मनांची ओढाताण झाली खरी; पण मनाजोगं उत्तर मिळाल्याने ती भलतीच खूष होती. हळवी संवेदनशीलता जपताना निखळ प्रेमाच्या बंधामुळे तिचा जीवनाचा प्रवास सुखकर झाला होता. "त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला
तो आणि ती भाग..४ --गुलाबी थंडीला प्रीतीची झालर!
Posted On Tuesday, 23 Mar 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना. ठाम निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्याने त्याचं मन खजील झालं होतं; पण दिलेला शब्द मोडणारा तो मुलगा नव्हता. त्याने निर्णय घेतला. तोही अगदी ठाम... पुन्हा
तो आणि ती भाग..३ --प्रेम हे प्रेम असतं...'
Posted On Monday, 22 Mar 2010 By Jaydeep Patil. Under तो आणि ती, विजय लाड
<!-- /* Font Definitions */ @font-face {font-family:Mangal; panose-1:0 0 4 0 0 0 0 0 0 0; mso-font-charset:1; mso-generic-font-family:auto; mso-font-pitch:variable; mso-font-signature:32768 0 0 0 0 0;} /* Style Definitions */ p.MsoNormal, li.MsoNormal, div.MsoNormal {mso-style-parent:""; margin:0in; margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:12.0pt; font-family
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.