Monday, June 21, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} कृष्ण कमळ

 



कृष्ण कमळ



मिपावर `बकुळ फुले`, `मोगरा` वाचल. म्हटल आपण ही वहाव एक फूल..
कृष्ण कमळ.

ह्या फूलाला नाव कुणी दिल माहित नाही पण आहे मात्र अगदी योग्य. म्हणजे कृष्णासारख कमळ किंवा कमळातला कृष्ण.
कृष्णासारख कमळ…
कमळाची पाकळी पाहिलीत तर ती नैवेद्द घेण्यासाठी आपण जसा हाताचा द्रोण करू तशी असते. मधे फुगीर बाहेर गेलाला भाग आणि कडा जराश्या आत वळलेल्या. तश्याच पाकळया या फुलाच्या बाहेरील बाजूला असतात.
कृष्ण आणि कमळ यांचा एक संबंध म्हणजे कॄष्णाला `कमलनयन असलेला` असं ही म्हट्ल जात.कमळाच्या पाकळीच्या आकारासारखे ज्याचे डोळे लांबट आहेत तो कमलनयन.
पद्मनाभ ,पद्महस्त ही पण कृष्णचीच नाव आहेत.

कृष्ण काळा.पण आपला देव! मग त्याला `काळ` कस काय म्हणायच ? म्हणून तो निळा.
ह्या फुलाचा रंग ही निळा. कृष्णासारखा. कमळ, ते ही निळं!
हा निळा म्हणजे आकाशी निळा नाही तर गडद, काळपट निळा.जांभळाच म्हणा हव तर. कृष्णप्रिय मोरपिसामधे एक जांभळी छटा असते तशी छटा.
कमळातला कृष्ण …
मोरपिसाला जसे धागे,रेषा-रेषा असतात अगदी तश्याच या निळ्या कमळाच्या पाकळाच्या आत बारिक लांबर्‍ पाकळ्या दिसतात .मोजणी केल्यास साधारणपणे १०० असतात.ते कौरव.त्याच्या आतल्या बाजूला ५ पांडवही दिसतील.आणि मध्यावर तीन लोक (स्वर्ग, मृत्यू , नरक) माथ्यावर पेलणारा श्री कृष्ण.
कौरव,पांडचासहीत उभा असलेला कृष्ण या कमळात पहायला मिळतो .म्हणून हे कृष्ण कमळ.
अस ही म्हणतात की मधला कृष्ण आणि बाजूने गोल फेर धरलेल्या त्या शेकडो गोपिका.

एका मंदिरात दूर्मिळ अस चित्र मी पाहिल आहे-- ह्या कृष्णकमळाचा हार परीधान केलेले भगवान श्री कृष्ण. ते ही मोरावर बसलेले! निळ्या रंगांच्या सर्व छटा त्यात होत्या. तो निळी कांती असलेला निलकांत,निळी कमळं, निळा मोर.
सुरेख निळी निळाई! केवळ अवर्णनिय!

हिंदूंनी जसा या फूलाचा संबंध त्यांच्या देवाशी लावला तसाच ख्रिश्चनांनी ही या Passion Flower वर केलेल्या कथा आहेत.येशू ख्रिस्ताला सूळावर चढवले त्या वेळाचा अनुभव (Passion for suffering) कथन करण्यासाठी आणि तो अधिक श्रवणिय करण्यासाठी या फूलाच्या रचनेचा उल्लेख केला जातो. अधिक माहिती जलावर मिळते.

एकदा असच रेल्वे स्टेशनच्या बाहेर फूटपाथवरच्या गजरेवालीला सांगितल की "मिळाल तर आण कधी तरी ".
मग दोन तीन दिवस पुन्हा पुन्हा चौकशी केली.
"बाये , त्येच काय माळरान आस्त व्हय गुलाबावानी? लई नाजूक आस्त त्ये. येल अस्ती बग त्येची.तोडून आनायच म्हन्जी जिव नसल्यागत होईल बग"गजरे वाली उत्तरली.
माझ्या आग्रहाखारत आणली ही ५-६ फूल. आणि म्हणाली ," पैश्ये नको ग.मी नाय मोजले या कमळाला पैश्ये. आशीच आनली इचारून बाजूवालीला. घे तूले कमळं"
खरोखरच माना टाकल्या होत्या त्या नाजूक फूलाने. मला अपराधी वाटल जरा.

खरतर कमळाच देठ कस जाड असतं. या कमळाच हिरव देठ फूलासारखच नाजूकस. आणि हे फूल `कमळ `असल तरी पाण्यातल नाही तर वेलीवरचं!
रंग जितका आकर्षक तितकच याचा वास ही मोहक असतो. काहीसा मंद.अगदी जवळ जाऊन घेतला तर तरच येणारा. पण मनाला धुंद करणारा.पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा.
म्हणूचच या फूलाचे आयुर्वेदातही महत्व आहे. थकवा,अस्वस्थता घालवण्यासाठी आणि रक्त दाबावर उपाय म्हणून या फूलाचा वापर केला जातो.मानसिक ताणावरच्या औषधात ही या सुगंधी फूलाचा वापर होतो.
अस असल तरीही गुलाबाचे गालिचे, शेवंती ताटवे, झेंडूचे रान, मोग-याच्या बागा, सूर्यफूलाची शेती पहिली आहे पण कृष्ण कमळाचे असे घाऊक उत्पादन नाही पाहिले.
आणि जस गणपतीला जास्वंद, हनुमानाला रूई, देवीला वासाची फूले किंवा शिवाला बेल आणि दत्ताला तुळस वाहिली जाते,तस वनमाळी कृष्णाला अमूक हेच फूल आवडत अस काही वाचण्यात आल नाही.
तरीही हे कमळ श्रीकृष्णाचच!




--
प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत घेण्याची तयारी आणि आत्मविश्वास या गोष्टी आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात ...................................

Thanks & Regards
      Chai Tu


--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.